Dictionaries | References

तैनात

   
Script: Devanagari

तैनात     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : नियुक्त

तैनात     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
.

तैनात     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  A military charge or command. Stipend or salary. Custody, charge direction of, control over.

तैनात     

ना.  दिम्मत , बरदास्त , व्यवस्था ;
ना.  चाकरी , नोकरी , सेवा ;
ना.  अधिकार , दाब , हुकमत ;
ना.  पगार , वेतन .

तैनात     

 स्त्री. १ लष्करी अधिकार ; लष्करावरील हुकमत . २ रोजमुरा ; पगार ; नेमणूक . ३ ताबा ; हवाला ; दिम्मत ; काळजी ; बरदास्त ; व्यवस्था . ४ हुकुमत ; दाब ; अधिकार . ( वस्तु , व्यवहार , माणसे यांवर ). ५ सेवा ; चाकरी ; नोकरी . बाजीरावाने त्या शूर शिपायास आपल्या तैनातीत घेतले . ६ नेमणूक ; सरंजाम . - वि . स्वाधीन . चार पागा त्या बाईच्या तैनात केल्या आहेत . - मदबा १७७ . [ अर . तईनात ]
 स्त्री. तैनात म्हणजे सालीना किती नेमणुक द्याव याची त्यांची बेरीज यास तैनात सलीना ' असें म्हणतात . - भारतवर्ष मराठ्यांचे दप्तर १४ .
०जातबा  पु. अनेक तैनाती लोकांच्या तैनातीच्या ठरावाची अनेक कलमे ज्यात लिहिली आहेत असा कागद ; तैनातीच्या नेमणुका ज्यां नमूद आहेत ती वही , कीर्द . तैनाती वि . १ वेतनी ; पगारी ; तैनात असलेला . २ ( एखाद्याच्या ) अधिकारांत , हुकुमांत ठेवलेला ; स्वाधीन केलेला ; दुसर्‍याच्या ताब्यात दिलेली ( सैन्याची तुकडी ); सोपविलेला ; हवाली केलेला ; ताब्यांत दिलेला ( एखाद्याच्या निर्वाहाकरिता जिल्हा , शहर इ० ); तैनात केलेला . ३ मदतनीस ; दुय्यम ( वसुलीसाठी नेमलेला ).
०फौज  स्त्री. स्वतःच्या खर्चाने फौज ठेवून ती दुसर्‍याला लढाईच्या वेळी द्यावयाचा शिरस्ता . लॉर्ड वेलस्लीने देशी संस्थानिकांच्या संरक्षणासाठी त्यांच्या खर्चाने फौज ठेवविली ती . ( इं . ) सब्सिडियरी आर्मी .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP