Dictionaries | References

टाळू

   
Script: Devanagari

टाळू

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   .

टाळू

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  The fore part of the head, sinciput. The roof of the mouth.
टाळूवर मिरे वाटणें   To exercise absolute sway over.
टाळूस-टाळेस-टाळवेस टिपरू न लागूं न देणें   To prate a pace; to rattle away. To disallow and not to suffer to lie (some charge).

टाळू

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  डोक्याच्या वरचा पुढचा भाग   Ex. टाळूवर लागलेला मार जीवघेणा ठरू शकतो
ONTOLOGY:
भाग (part of)संज्ञा (Noun)
 noun  नवजात मुलाच्या डोक्याचा वरील पुढचा कोमल भाग   Ex. आई नवजात बाळाच्या टाळूवर थोड्या थोड्या वेळाने तेल टाकत होती.
ONTOLOGY:
शारीरिक वस्तु (Anatomical)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
   see : तालू

टाळू

  स्त्री. १ डोक्याचा वरील पुढचा भाग ; मस्तकाग्र ; कवटी . २ टाळूवर ठेवलेले केंस . ३ तालुप्रदेश ; तोंडाच्या वरच्या जबडयाचा आंतील भाग . ४ ( चित्रा नक्षत्राच्या लोखंडी चरणांत पडलेल्या पावसानें ) जमिनीचा बनलेला चिकटजाड थर ; ( सामा . ) जमीनीचा टणक थर , भाग . ( क्रि० धरणें ). विहिरीची टाळू खणली , पाणी भरभर लागलें . ५ तबल्याच्या शाईचा मध्यभाग . [ सं . तालु ]
०चा   ( सापाचा विषारी दांत , टाळूपाशीं असतो आणि तो त्याला फार जपतो त्यावरून ) अतिशय आवडती वस्तु ; जिवाचा कलिजा . टाळू भरणें , टाळवेस लावणें - ( बायकी ) लहान मुलाच्या टाळूस तेल लावणें किंवा न्हाणासाठीं तेल माखणें ( मुलाच्या १२ व्या दिवसापासून ६ महिनेपर्यंत सकाळीं न्हातांना व रात्रीं निजतांना सरासरी ५ तोळे तेल ताळूंत जिरवितात . पुढें सहा महिन्यानंतर एक वर्षपर्यंत रोज न्हातांना २॥ तोळे तेल जिरवितात ).
दांत   ( सापाचा विषारी दांत , टाळूपाशीं असतो आणि तो त्याला फार जपतो त्यावरून ) अतिशय आवडती वस्तु ; जिवाचा कलिजा . टाळू भरणें , टाळवेस लावणें - ( बायकी ) लहान मुलाच्या टाळूस तेल लावणें किंवा न्हाणासाठीं तेल माखणें ( मुलाच्या १२ व्या दिवसापासून ६ महिनेपर्यंत सकाळीं न्हातांना व रात्रीं निजतांना सरासरी ५ तोळे तेल ताळूंत जिरवितात . पुढें सहा महिन्यानंतर एक वर्षपर्यंत रोज न्हातांना २॥ तोळे तेल जिरवितात ).
०भरणें   ( चांभारी ) टांचेखालचा भाग उचलून देणें . मढयाच्या टाळूवरचें लोणी खाणारा - अतिशय कृपणनीच .
०वर   घालणें , वर ओतणें - काम होणें ; गरज भागणें ; साहाय्य करणें .
तेल   घालणें , वर ओतणें - काम होणें ; गरज भागणें ; साहाय्य करणें .
०वर   वाटणें - एखाद्यावर पूर्ण ताबा चालविणें , अंमल गाजविणें .
मिरें   वाटणें - एखाद्यावर पूर्ण ताबा चालविणें , अंमल गाजविणें .
०वर   फिरविणें - फसविणें ; बुडविणें . टाळूस , टाळेस , टाळवेस टिपरूं लागूं देणें - १ आपल्या अंगावर येणारी बाजू मोठें शब्दपांडित्य करून उडवून देणें ; काथ्याकूट करणें . अघळपघळ पण मुद्दा सोडून बोलणे . २ आरोप शेकूं न देणें ; सहनकरणें .
हात   फिरविणें - फसविणें ; बुडविणें . टाळूस , टाळेस , टाळवेस टिपरूं लागूं देणें - १ आपल्या अंगावर येणारी बाजू मोठें शब्दपांडित्य करून उडवून देणें ; काथ्याकूट करणें . अघळपघळ पण मुद्दा सोडून बोलणे . २ आरोप शेकूं न देणें ; सहनकरणें .

टाळू

   टाळू भरणें
   टाळूस लावणें
   लहान मुलाच्या टाळूस तेल लावून न्हाऊंमाखूं घालणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP