Dictionaries | References

गेली नाहीं तीर्था, नि फिटली नाहीं भ्रमणा

   
Script: Devanagari

गेली नाहीं तीर्था, नि फिटली नाहीं भ्रमणा     

[भ्रमणा=भ्रम, वेडी समजूत.] तीर्थासंबंधी जी आपली भावना असते की, तेथील सर्व परिस्‍थिति, सर्व व्यवहार, सरळ व पुण्यप्रदच असतील, ती आपण प्रत्‍यक्ष त्‍या तीर्थास गेलो व तेथील लांडीलबाडी अवलोकन केली म्‍हणजे लयास जाते व इतर सामान्य स्‍थळापेक्षां तेथे काही विशेष नाही असा प्रत्‍यय येतो. एखादे स्‍थळी आपले काम होईल किंवा अमूक एक मनुष्‍य खास आपले काम करील अशा समजावर आपण जातो, पण तेथे जातांच किंवा त्‍या मनुष्‍याविषयी विपरीत अनुभव आपणांस येतो. या अर्थाची ही म्‍हण आहे.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP