वर

अ./ना.  अभिवचन , आशीर्वाद , आश्वासन ;
अ./ना.  नवरा मुलगा ;
अ./ना.  पर्यंत ( आजवर );
अ./ना.  अनुरोधाने , दिशेने ( शत्रूवर चाल करून गेला );
अ./ना.  अधिक , जास्त ( लाखाच्या वर वस्ती आहे );
अ./ना.  आणखी , शिवाय ( भोजन दिले , वर दक्षिणा दिली );
अ./ना.  धरून , संबंधी ( स्वेच्छा मरणावर चार तास चर्चा झाली );
अ./ना.  कारणाणे , मुळे ( नेहरुंच्यावर काँग्रेस इतके दिवस चालली ).
The caul or afterbirth.
.
A boon or blessing; esp. in the gift of a Bráhman, Guru, saint, or god. v दे.
In comp. Best, excellent, excelling; as मनुष्यवर Best of men; देववर Excellent among the gods; द्विजवर, तरूवर, पशुवर, पक्षीवर.
Up to; up to the period of, or up to the extent or degree of. Ex. आजवर, उद्यां- वर, वर्षावर, शेवटवर, पायलीवर, मणवर, खंडीवर. 2 prep & ad See वरता prep & ad. वर येणें To get up; to rise into a passion.
क्रि.वि.  
वि.  
 स्त्री. प्रसृतीवेळची वार . वार पहा .
 पु. 
 पु. आशीर्वाद ; शुभदायक वचन ; ऋषि , देव , ब्राह्मण इ० नी दिलेला प्रसाद , देणगी . वर दमनऋषीने दीधला की तयाला । - र १४ . [ सं . ]
नवरा मुलगा ( लग्नांतील ). - ज्ञा ११ . ३ .
श्रेष्ठ . मी वर म्हणे सुधन्वा की साक्षांत तात अंगिरा ज्याचा । - मोसभा ५ . ९६ .
पर्यंत ; काल ; मर्यादा किंवा प्रमाण या पावेतो . उदा० आजवर ; वर्षावर ; पायलीवर ; खंडीवर .
०दान   
वर , आशीर्वाद देणे ; देणगी ; कृपेने केलेले दान .
अत्युकृष्ट ; अति सुंदर . वरतनु दमयंती नंदिनी हे त्रितीय । - नल ६५ .
पति ; नवरा . इंदिरावर = विष्णु पर पुरुषाचे पायी स्त्रियांनी सोडून आपला वर । - होला ६५ . [ सं . ]
उंच ; उच्च प्रदेशी ; उपरि . याच्या उलट खाली .
नंतर ; मागून . औरंगजेब मेल्यावर कोण गादीवर आला ?
एखाद्याच्या हातून हटकून घडणारी गोष्ट ; नेहेमीची , रुढ गोष्ट . चोरीचे त्याला वरदानच आहे .
पहिला ; अग्र . वरसुत दम नामा दांत नामा द्वितीय । - नल ६५ . ( समासांत ) देव - द्विज - मनुष्य - तरु - पशु - पक्षी - वर . [ सं . ]
०घोडा  पु. 
०दानी वि.  वर लाभलेला ; भाग्यवान ( वंश , कुल , व्यक्ति ).
वरात ; लग्नाला जातांना नवरा मुलगा पालखी , घोडा , गाडी इ० तून वाजतगाजत जातो ती मिरवणूक .
०कस  पु. वर्चस्व ; अधिकार ; सत्ता ; अंमल ( क्रि० बसवणे ; चालवणे ; चढवणे ; मिळवणे ). - वि .
अधिक ; जास्त . त्या सभेंत शंभरावर लोक नव्हते .
श्रेष्ठ प्रतीचे , कंसाचे ( सोने ).
०दी वि.  वर प्राप्त झालेला ( पुरुष , कुल , वंश इ० ).
शिवाय ; आणखी . आम्हाकडून काम करुन घेतलेच , वर आम्हाला शिव्या पण दिल्या .
मुंजा मुलाची मिरवणूक .
( सामा . ) सर्वश्रेष्ठ ; सर्वोत्कृष्ट . वरकसा जिणता जिणवेना । - दावि ३७९ .
०दक्षिणा  स्त्री. वधूचा पिता कन्यादानाची सांगता करण्यासाठी वरास देतो ती दक्षिणा ; हुंडा ; शुल्क .
मुळे ; कारणाने . पुरुषोत्तमरावांचे घर आपणांवरच चालले आहे . - इपं ३२ .
०प्रद वि.  अमीष्ट देणारा ; वरद . वरद पु . गणपति देवता . - वि .
अनुरोधाने ; लक्ष्यविषय करुन . वाघावर एकटा कसा चालला आहे तो पहा . या विषयावर चार घटका बोलत होता .
सर्वोंवर सत्ता गाजविणारा ; ताब्यांत ठेवणारा ; देखरेख करणारा . सर्व पशूंचा वरकस वाघ , पक्ष्यांचा वरकस बैरीससाणा , मुलांचा वरकस पंतोजी , उंदरांचा वरकस मांजर .
वरदाता ; प्रार्थिलेले देणारा . मग सहजे सत्कारवादु । तो पद्मकर वरदु । - ज्ञा १ . १३ .
०धवा  पु. नवरदेव ; वदधावा पहा . वटेश्वर चांगा वरधवा । तुम्ही नेऊनि मध्ये वैसवा । - चांगदेवगाथा .
०धावा  पु. 
०कसदार वि.  अंमल चालविणारा ; अमलदार ; तपासनीस . वरकस अर्थ ३ पहा . वरती वि . श्रेष्ठ . जे गतीहून वरती चढेना अधिक गती । - एभा ३१ . १५६ . वरांगना स्त्री . श्रेष्ठ स्त्री . [ वर + अंगना ] वराचे वि . श्रेष्ठ . बहुताती वराचे यादव । वरान्न न .
परंतु . हे सारे ते वर थोडे । आणीकही साधील गाढे । - ज्ञा १६ . ३५२ . वरता , वरी पहा . [ फा . वर ; सं . उपरि ; प्रा . उवरि तुल० ]
प्रासादिक ; कल्याणकारक . हा हरिविजय वरदग्रंथ । - ह २२ . २६९ .
कृपाळु ; दयाळु .
पक्वान्न . अन्न वरिष्ठ वरान्न । - एरुस्व १४ . १२५ .
नवर्‍यामुलास लग्नासाठी घेऊन येण्यावरितां वाजत गाजत निघालेला मुलीचा भाऊ किंवा त्याचा बदला .
०डोके   - उर्जितावस्थेस येणे . ताराबाईने नातवाला सातारची गादी साधून देऊन वर डोके काढलेले जिजाबाईला मानवले नाही . - भक्तमयूर केका ५ .
वरण . अवघ्यावरी वाढिले जाण । वरी वरान्न स्वादिष्ट । - एरुस्व १४ . १२५ . सोलीव डाळीचे वरान्न । - भुवन ११ . १२४ . [ वर + अन्न ] वराप्सरा - स्त्री . प्रमुख अप्सरा ( रंभा , मेनका इ० ). शक्रप्रेषित वराप्सरा नटल्या । - मोमंत्र २ . ४६ . [ वर + अप्सरा ] वरांवर - वि . श्रेष्ठांत श्रेष्ठ . हेंचि निज ज्ञान साचार । वरांवर वरिष्ट । - एभा १० . ७०६ . [ वरात वर ] वरासन - न . श्रेष्ठ आसन , स्थान . वरासनी पाषाण । तो न मानावा सामान्य । - तुगा २२६८ . [ वर + आसन ] वरिय - वि . श्रेष्ठ . आग्रहाचिया उजरिया । श्रेष्ठ देवता वरिया । - ज्ञा १७ . ९८ . [ सं . वरियस ]
०चतुर्थी   चौथ स्त्री . भाद्रपद शुद्ध चतुर्थी ; गणेशचतुर्थी . आम्ही वरदचतुर्थीचा चंद्र अवचिता । देखिला गोकुळी । - ह २५ . १३७ .
नवर्‍याला मूळ .
काढणे   - उर्जितावस्थेस येणे . ताराबाईने नातवाला सातारची गादी साधून देऊन वर डोके काढलेले जिजाबाईला मानवले नाही . - भक्तमयूर केका ५ .
०वाणी  स्त्री. आशीर्वाद ; शुभचिंतन . कीर्तनी रंग येतसे चौगुणी । वरदवाणी म्हणोनिया ।
( बडोदे ) वरपक्षाकडून वराची स्वारी वधूगृही येण्यास निघाली अशी खबर देण्याकरितां समारंभाने जाणारा वराचा धाकटा भाऊ किंवा बदला . - ऐरापुविवि ८३ . वर्‍हाड - नागपुरा - कडेहि हा वर्धाव पाठविण्याची चाल आहे .
०तोंड   - निर्लज्ज बनणे ; लाज न वाटणे .
०निश्चय  पु. वर निश्चित करणे , ठरविणे .
०हस्त  पु. 
करणे   - निर्लज्ज बनणे ; लाज न वाटणे .
०पडणे   ( वस्तू , गोष्टी ) तत्परतेने करुं लागणे . अलीकडे तो कादंबर्‍यांवर पडला आहे .
०पक्ष  पु. लग्नांत नवर्‍यामुलाचा बाप .
वर देण्यासाठी ( देवता इ० ने ) उचलेला हात ; दानशील ; औदार्यदर्शक हाताची ठेवण .
शिष्याना विद्या देणारा गुरु , सर्व आश्रित किंवा संबंधी यांना उन्नतीला पोंचविणारा , किंवा ज्याचा आशीर्वाद खरा ठरतो अशाला लावितात .
०पाहणे   लज्जा , शंका , भीति न वाटणे ; धीटपणा असणे ; उजागरीने बघणे . पापाला वर पाहण्याचा धीर होत नाही . - पुण्यप्रभाव १३७ . सामाशब्द -
०माई   माय मायी स्त्री . ( लग्नांत ) नवर्‍यामुलाची आई . जात्या वरमाय आळशीण । मग काय पहावी वर्‍हाडीण । - नव २१ . २९ .
०हस्त   -
०उपचार  पु. अव .
०मायपण  न. नवर्‍यामुलाची आई असण्याचा मान . - एभा ?
०मूठ  स्त्री. 
वरवर सभ्यपणा ; शिष्टपणा दाखविणे ; खोटी नम्रता ; शिष्टाचार .
ठेवणे   -
रोगनिवारणासाठी बाहेरुन शरीराला केलेले उपचार .
लग्नांत वधूवरांच्या वस्त्रांना एकत्र मारलेली गांठ सोडवणार्‍या मेहुणी वगैरे वधूपक्षीय स्त्रीला दिलेली देणगी .
पूर्ण कृपा करणे .
स्वतःसारखे करुन सोडणे ( निंदार्थी प्रायः उपयोग ).
वधूच्या पित्याने मुलगी वराला देतांना दिलेली देणगी ; हुंडा ; शुल्क .
०कडी   वर्चस्व ; वरचढपणा . राज्यांत मुधोजीची वरकडी झाली की आपला तो सूड उगवील अशी कारभार्‍यांस भीति पडली . - विवि ८ . ६ . ११० .
०करणी वि.  बाह्य ; औपचारिक ; कृत्रिम ; दिखाऊ ; वरकांती ; पोकळ ( भाषण , कृत्य , इ० ).
०मूळ  न. वराला बोलावणे . वरमूळा चालिल्या अहिवा नारी । - वसा ४८ .
०योजना  स्त्री. कन्येसाठी वराची केलेली योजना . वरावर पु . श्रेष्ठवर . भीमके अर्पूनियां अपार । कृष्ण वरावर पूजियेला । - एरुस्व १४ . ८७ . [ वर + वर ] वरावर , वरेकज स्त्री . लग्न जमविणे , जुळविणे . [ वर + आवर , वर + काज ] वरकज्या पु . लग्न जुळविणारा , मध्यस्थ इसम . वरोपचार पु . लग्नांत ( कांही ठिकाणी नंतरहि ) वराचे संस्कार व सोहळे . [ वर + उपचार ]
०कर्मी वि.  
वरकरणी पहा . याचे असले वरकर्मी बोलणे तुम्ही जमेस धरुं नका हो !
बाहेरचा ; आंत ज्याचा प्रवेश नाही असा ( रोग , औषध ).
मूळचा झरा नसलेले ( जल इ० ).
मूळ नसलेला ; उपरी ; स्थिरपणा , कायमपणा नसलेला .
पोकळ ; दिखाऊ ; खोटे .
०कर्मी   - पु . पोकळ , कृत्रिम आदर , भाव ; आदरसत्काराचा खोटा देखावा .
आदर   - पु . पोकळ , कृत्रिम आदर , भाव ; आदरसत्काराचा खोटा देखावा .
०कांती   कांतीचा वि .
दिखाऊ ; सुंदर ; सुरेख दिसणारा .
वरकरणी पहा . नाही शब्द रे बोललास वरकांतिचा । - प्रला १५६ .
०काम  न. प्रत्यक्ष बनावाचे काम न करतां त्याला साधनीभूत असणार्‍या गोष्टी करणे . उदा० स्वयंपाकाला लागणारे साहित्य पुरविणे , धुणेपाणी इ० .
०कोट  पु. थंडी , पाऊस इ० साठी कोटावर घालावयाचा लांब कोट . ( इं . ) ओव्हरकोट . उलट वरकोट आणि हातमोजे हा नेहमीचाच पोषाक होऊन बसला आहे . - सासं २ . २३४ .
०खर्च  पु. 
अधिक , योजलेल्यापेक्षां जास्त खर्च .
इतर किरकोळ खर्च .
०खाल   क्रिवि . खालवर ; उंचसखल ; विषमरीतीने .
०घडी  स्त्री. 
वस्त्राची घडी करतांना दर्शनी चांगला भाग यावा म्हणून अमळ बारीक विणून काढलेला पट्टा ; वरची चांगली बाजू .
( शिंपी - काम ) बाहेरच्या बाजूला असलेली दुमड . वरघडीच्या तळाची ट्रावझर करावयाची असल्यास पांच इंच कापड अधिक घ्यावे . - काटकर्तन ८ .
०घडीचा वि.  
बाह्य ; वरचा .
वरघडी असलेले ( वस्त्र ).
( ल . ) दिखाऊ ; भपकेदार .
कृत्रिम ; खोटे .
०घाट  पु. 
बाहेरचा आकार , घडण ; बाह्य स्वरुप .
घाटावरचा प्रदेश ; सह्याद्रीच्या पूर्वेकडील मुलूख .
०घाटी वि.  वरघाटासंबंधी ( माणूस , पदार्थ इ० ).
०घाटीण  स्त्री. घाटावरची स्त्री .
०घाला  पु. जोराचा हल्ला , घाला . षडरिपूवरता वरघाला । - दावि ३७९ .
०चढ वि.  सरस ; श्रेष्ठ ; जास्त ; वरच्या दर्जाचा .
०चढपणा  पु. सरसपणा ; श्रेष्ठपणा .
०चष्मा   श्मा पु .
वरचढपणा ; वर्चस्व ( क्रि० करणे ; होणे ). काकेशियन वर्गाचा दुसर्‍या वर्गावर नेहमी वरचष्मा असे . - मराठी ६ . ३०६ .
देखरेख करणारा ; तपासनीस ; वरचा अधिकारी .
वर्चस्व गाजविणारा ; अधिकार चालविणारा .
०जोर वि.  श्रेष्ठ . सीरजोर वरजोर जो हा । - दावि ३१० .
०डगला  पु. ( बडोदे ) वरकोट पहा . - खानो ३ .
०डोळ्या   ळा वि .
उलट्या - बाहुल्या असणारा ; अदूरदृष्टि ; नेत्रीरोगी . परपुरुषाते नयनी पाहे । उपजतां वरडोळी होये । - गुच ३१ . ८५ .
आढ्यताखोर ; रागीट .
टक लावून वर पाहणारा ; वर दृष्टि असणारा ( निंदार्थी उपयोग ).
०तगड   न . दागिन्यावरचा तगडाचा अंश .
०दळ  न. भाजीबरोबर चव येण्यासाठी शिजविलेली डाळ . [ वर + दाळ ]
०दळ  न. 
घरावर कौले , गवत इ० घालण्यापूर्वी वांसे , पांजरण इ० पसरतात ते .
वरचे कवच , साल . येक वरदळ बरे असते । कठिण अंतर्त्यागि दिसते । - ज्ञानप्रदीप ८३४ .
वरचा भाग . अंग साजिरे नाकहीन । वरदळ चांग चरण क्षीण । - एभा ११ . १२८५ .
मुलामा . हावभावाचेनि वरदळे । - भाए ३४५ . - वि .
वरवरचा ; बाहेरचा . दाऊनियां वरदळ वेष । मना अंगी आशापाश । - निगा २८० . वरदळभक्ती करोनिया नमन । - नव १८ . १६३ .
दांभिक . तुका म्हणे आम्हां तुमचेचि फंद । वरदळ छंद कळो येती । - तुगा ५०७ .
हलके ; नीरस ; किरकोळ . [ वर + दल ]
०दळ   स्त्रीन .
उपयोगांत , वहिवाटीत असलेले जिन्नस . चोर आले आणि वरदळ नेली .
नफा ; वर मिळणारा फायदा . लाख रुपये मूळ पुंजी . जे वरदळ मिळेल ते खातो .
०दळखर्च  पु. जास्त खर्च .
०दळ   - दौलत - स्त्री . सामान ; जंगम माल . वरदळ - ळे - क्रिवि . वरुन ; बाहेरुन . सेवन हे शिरसा धरी । अंतरी ही वरदळा । ३२२३ . तेंवि मनुष्य वेशाचे रुपडे । वरदळे दिसे चोखडे । - ज्ञाप्र ७५० . वरदळ सामान -
जिंदगीए   - दौलत - स्त्री . सामान ; जंगम माल . वरदळ - ळे - क्रिवि . वरुन ; बाहेरुन . सेवन हे शिरसा धरी । अंतरी ही वरदळा । ३२२३ . तेंवि मनुष्य वेशाचे रुपडे । वरदळे दिसे चोखडे । - ज्ञाप्र ७५० . वरदळ सामान -
जंगम माल .
किरकोळ मांल , सामान .
०दक्षिणा  स्त्री. चोरी इ० काने गेलेला पैसा , पदार्थ परत मिळविण्यासाठी व्यर्थ खर्चलेला पैसा .
०दूध  न. अंगावरील दुधाखेरीज इतर दूध ( लहान मुलांस दिलेले ). वरचे दूध .
०नट   क्रिवि . वरुन ; वरकांती . लई अंतरची खोल मोठी वरनट केवळ सात्विक दिससी । - होला ८९ .
०पंग   पंक वि . वरवरचा ; बाह्यात्कारी ( देखावा ). अथवा वरपंग सारा । पोटी विषयाच थारा । - तुगा २८३२ .
०पंकाचा   पंगीचा वि . क्रिवि . वरकरणी ; वरकांती पहा . की वरपंगी जेवि जारीण । दावी भ्रतारसेवा करुन ।
०पंकी   पंगी पांगी क्रिवि . वरवर ; बाह्यात्कारी ; बाह्यतः सामाजिक व धार्मिक रीति इंग्रजी शाळेतला मनुष्य वरपांगी पाळीत असतो . - टि ४ . ३७८ . [ वर + पंख ]
०पंगतीचा   वरपंकी पहा . वरकांती . हा स्नेह नाही वरपंगतीचा । - सारुह १ . ३६ .
०पिका   पीक वि . झाडावर पिकलेला ( फलादि पदार्थ ). याच्या उलट कोनपिका . वरपिका फणस असला तर मला दे . कोनपिका नको . [ वर + पिकणे ]
०बुजारत   क्रिवि . वरवर ; बाह्यतः [ वर + हिं . बुझारत ]
०बट्टा  पु. नाणे मोडतांना पडणारा बट्टा . बाहेरबट्टा पहा .
०वंचाई  स्त्री. बाह्य भपक्यावरुन झालेली फसवणूक . [ वर + वंचणे ]
०वंचाईचा वि.  वरकर्मी पहा .
०वर   वरता वरतीं क्रिवि . वि .
आंत प्रवेश न होतां - करतां ; बाहेरुनच ( खोदणे , चोळणे इ० ).
थोडे फार ; खोल नव्हे , अंतर्यामी नव्हे अशा रीतीने .
वरकांती - वरपांगी ; कृत्रिम ; खोटे . तो मला वरवर प्रेम दाखवितो . म्ह० वरवर माया करती आणि तोंड झांकून खाती .
०वर   - केल्यासारखे दाखविणे ; करण्याचे ढोंग करणे . वरवर बोलणे - रडणे - हांसणे - रागे भरणे - कृपा करणे इ० प्रयोग होतात .
करणे   - केल्यासारखे दाखविणे ; करण्याचे ढोंग करणे . वरवर बोलणे - रडणे - हांसणे - रागे भरणे - कृपा करणे इ० प्रयोग होतात .
०वर   - पुअव . बाह्य , दिखाऊ आदरसत्कार ; नुसता , पोकळ शिष्टाचार .
उपचार   - पुअव . बाह्य , दिखाऊ आदरसत्कार ; नुसता , पोकळ शिष्टाचार .
०वळा  पु. वर्चस्व ; बलाधिक्य . देखोनि वैरियांचा वरवळा । कांपिन्नली भीमकबाळा । - एरुस्व ८ . ५१ .
०वेष  पु. बाह्य ; वेष ; बुरखा ; ढोंग .
०शेर   सर सांड स्त्री . भरपूरपणा ; महामुरी ; तुडुंब होऊन सांडणे . - वि . भरपूर ; तुडुंब .
०सार   
०सार   पारसार स्त्री . ( व . ) संसारोपयोगी सामानसुमान , चीजवस्त .
०सोस  पु. श्वास ; ऊर्ध्व . ( क्रि० लागणे ). [ वर + श्वास ]
०वरचा वि.  बाह ; वरच्या भागाचा .
०चे   - न . लहान मुलाला आईच्या दुधाऐवजी - शिवाय गाईम्हशीचे जे दूध घालतात ते . - टि १ . २९७ . वरता - ती - ते - शअ . क्रिवि . सर्व अर्थी वर पहा .
दूध   - न . लहान मुलाला आईच्या दुधाऐवजी - शिवाय गाईम्हशीचे जे दूध घालतात ते . - टि १ . २९७ . वरता - ती - ते - शअ . क्रिवि . सर्व अर्थी वर पहा .
वर . त्याने जे समयी वरते बसावे ते समयी त्याची बुद्धि मोठी उदार व्हावी . - सिंहासनबत्तीशी १ .
आणखी .
अधिक . त्याहूनि कोटियोजना वरता । - भारा किष्किंधा ११ . ७९ .
हून ; पेक्षां . तरी स्त्री आणि स्त्रैणावरता । दुःसंग सर्वथा असेना । - एभा २६ . ३०२ .
श्रेष्ठ ; उच्चतर .
( किनार्‍याच्या बाजूने ) उत्तरेकडचा .
किनार्‍यापासून आंत . वरला - वरचा पहा . वरावरी - क्रिवि .
वरचेवर ; वारंवार . - तुगा . - शर .
झपाट्याने ; निमिषांत . वरि - री - शअ . क्रिवि . वर पहा .
वर ; उंच . तूं काइसयावरी आहासि ऐसे । पाहिले मियां । - ज्ञा ११ . २७५ .
आणखी . ऐसा जात्यंधु अधस्तु । वरि भवरोगी ग्रस्तु । - ऋ २ .
वरवर ; बाह्यतः सत्य धनंजय कर्मे रुपे दिसतो उगाचि वरि नरसा । - मोभीष्म ११ . ७२ .
पर्यंत . तैसे आस्थेच्या महापुरी । रिघतांति कोटिवरी । - ज्ञा ७ . १३ . देव जवळ अंतरी । भेटी नाही जन्मवरी । - तुगा .
( तृतियेचा प्रत्यय ) ने ; मुळे . तो निर्मत्सरु का म्हणिजे । बोलवरी । - ज्ञा ४ . ११३ . वरिवरी - क्रिवि . वरवर पहा . अवघे देखिले अधर्मरत । वरीवरी आचार दावित । जैसी शांति मैंदाची । - वरीव - वि . श्रेष्ठ ; उत्कृष्ट . प्रेमळ देखतांचि दिठी । मी घे आपुलिये संवसाठी । नव्हतां वरीव दे सुखकोटी । नये तरी उठाउठी सेवक होय । - एभा १४ . १५८ . वरिवा - पु .
वरचढपणा ; श्रेष्ठपणा . जिये आपुलियां बरवां । नंदनवनाते मागती वरिवां । - शिशु २४९ .
शोभा ; उत्कृष्टपणा . वरिष्ट - ष्ठ - वि . विद्या , वय इ० कानी श्रेष्ठ ; सर्वांत मोठा ; श्रेष्ठ . - ज्ञा १ . ३० . ईश्वर तो अति वरिष्ठ । येरु भूतभौतिक अति कनिष्ठ । - भाराबाला ११ . १६५ .
अत्यंत मोठे , जड . [ सं . वरिष्ठ ] वरीयान - वि . श्रेष्ठ ( मनुष्य , प्रश्न इ० ; ) अत्युत्तम ; अत्युत्कृष्ट . - पु . ( ज्यो . ) १८ वा योग . वरील - वि . वरच्या भागासंबंधी ; वरचा . वरुता - ते - शअ . क्रिवि . वर , वरता - ते पहा . पाळा मांडिला शरीरावरुता । - नव ११ . १२० . वरुन - शअ .
वरच्या भागापासून .
साहाय्याने ; साधनाने ; कारणाने . तुला म्यां शब्दांवरुन ओळखले .
परिणामतः ; प्रसंगाने ; मुळे . तूं सांगितल्यावरुन मी गेलो .
पुढून ; समोरुन ; जवळून . तो माझे गांवावरुन गेला .
पृष्ठभागास धरुन .
नंतर ; मागाहून . ( कालसापेक्ष प्रयोग ). स्नान केल्यावरुन भोजनास बसलो .
वर ; उपरि . झाडांवरुन पांखरे बसली . घोड्यांवरुन सगळी माणसे बसली . ( फक्त अनेकवचनांत प्रयोग ).
प्रमाणे . आपणांवरुन जग ओळखावे .
वरील बाजूस ; बाह्यप्रदेशी . अंतर्वसन बाह्यवसन कंचुकीवरुन प्रावरण । - ह ३४ . १६३ . वरौता - ती - वि . वर ; वरता पहा . - ज्ञा ४ . २०९ . वरौती एऔनी आनंदभरे । - दाव १८८ . सुकुमारपणे भूपति भृंग । धरोनि झेली वरौते । - मुआदि १८ . ३४ . वरौनी - वरुन पहा . वरौनि कापूरकेळी । भ्रमरांची झांक उठिली । - शिशु ६०५ .
n.  पितरों में से एक ।
 m  A bridegroom; a husband. A boon.
  Best.
prep   Upto See वरता.

Related Words

मान वर करणें-काढणें   चोर तर चोर आणि वर शिरजोर   वर येणें   खोटा तो खोटा आणि वर फुकाचा ताठा   (वर) नंबर मारणें   वर पाहणें   वर डोकें काढणें   माझेंच नाक वर   (वर) पाय येणें   पूज्य-(विद्या, स्त्रानसंध्या इ.वर) पूज्य पडणें   मिरगी-मिरगी वर येणें   खोगीर वर लादणें-चढविणें-ठेवणें   याचकाचा हात खालीं आणि दात्याचा हात वर असतो   बिब्बा-(वर) बिबा घालणें-फासणें   (वर) माती ओढणें   मात्रा वर असणें   वर्मस्पर्शापस्य वर शिरछेदु चांग   वर-वरपक्षाचें पारडें जड असतें   करायला गेली पर, तवई आली वर   (वर) पुष्पांजलि करणें-देणें   वर वर मिळताः लग्न कोण करता   रामोशी-रामोशाची जात, खालीं सागोती वर भात   शेण खालीं पडलें म्हणजे माती घेतल्याशिवाय वर येत नाहीं   कोठपर्यंत-पावेंतो-वर   काखा वर करणें   वार्‍या वर वरात, भुसावर चिठठी   घाईने वर चढतो, तो त्‍वरित खालीं येतो   कुठपर्यंत पावेतों-वर   भरली माझी डिचकोली, फाटली माझी चिंधकोली, असा माझा गोहो, नीत वर जावो   हौसेनं केला वर त्याला भरला हिंवज्वर   (वर) तलवार धरणें   चावडीबाहेर (वर) बोंब मारायला पाटलाची परवानगी नको   आधींच सोन्याचे, त्यांत (वर) जडाबाचें   ब0 वर येणें   आकाश वर पडणें   हौसेनें केला वर, त्याला भरला दिवसां खोकला रात्रीं ज्वर !   पाण्यांत म्हैस व वर मोल   पैचा घेतला गूळ, वर घातलें पाणी, देव केला, धर्म केला, धर पोरा। मार बचक, गूळच गूळ!   जिथपर्यंत-पावेतों-वर   मुंरकुंडी-(वर) मुरकुंडी-डया पडणें   जो वर पाहून चालतो, तो खड्‌यात पडतो   निठव्यांते घालून (वर) आठवें झांकण ठेवावें   बुधली वर आली   आवडीनें केली पर, ती आली वर   (वर)-अक्षत (ता) पडणें   मान वर न करणें   अग्नीशिवाय धूर येत नाहीं वर   बुडांत नाहीं तर वर कोठून येणार?   बोलण्याची भरभर, खालीं छपर वर घर   मिम्या-मिम्या झाल्या थोर, आतां पाहिजे वर   अग्नीशिवाय धूर येत नाहीं वर   (अ) चार दिशांस चार व वर सूर्य. (आ) शरीरांतील पांच अग्नि   अन्नाचा मारलेला खालीं पाही तरवारीचा मारलेला वर पाही   आकाश वर पडणें   आधींच सोन्याचे, त्यांत (वर) जडाबाचें   आवडीनें केली पर, ती आली वर   उगीच भरभर, खालीं छप्पर वर घर   (एखादें काम) लागाला येणें-लागीं लावणें-लागा वर येणें-मिळणें-जुळणें   एथर्यंत-पावेतों-वर-वरी   कुठपर्यंत पावेतों-वर   कुत्रें दीड दिवसांत काशीला जातें-जाईल, पण तंगडी उंच-वर केली नाही तर   करायला गेली पर, तवई आली वर   काख - काखा वर करणें   काखा वर करणें   कोठपर्यंत-पावेंतो-वर   कोळसा वर आणि आंत काळाच   खाका वर करणे   खातांना खातलीं नि वर मंगलां गातलीं   खालचें झांक अन्‌ मग कर वर नाक   खोगीर वर लादणें-चढविणें-ठेवणें   खोटा तो खोटा आणि वर फुकाचा ताठा   घरच्या भाकरी घर, दोन पैसे वर   घरधान्याचे हाल आणि फुकट्याचे वर गाल   घाईने वर चढतो, तो त्‍वरित खालीं येतो   चाक वर येणें   चावडीबाहेर (वर) बोंब मारायला पाटलाची परवानगी नको   चोर तर चोर आणि वर शिरजोर   छाती वर करून-काढून चालणें   छाया एटलां छापडां ने नळियां एटला घर, रांडी रांडो एम कहे के कुंवारा एटला वर   जेथपर्यंत-पावेतों-वर   जाणता वर   जिथपर्यंत-पावेतों-वर   जो वर पाहून चालतो, तो खड्‌यात पडतो   डोई (वर) काढणें   तेथपर्यंत-पावतों-वर   तळाशी पोहोचल्‍याशिवाय वर बुडबुडे येत नाहीत   तळीं भोंक, वर झांकण   नाक वर करणें-वर करुन चालणें-वर असणें   निठव्यांते घालून (वर) आठवें झांकण ठेवावें   पैचा घेतला गूळ, वर घातलें पाणी, देव केला, धर्म केला, धर पोरा। मार बचक, गूळच गूळ!   पडतील मघा, तर चुलीपाशीं (वई वई) हगा, नाहीं तर वर तरी बघा   पडलों तरी आपलें (माझें) च नाक वर   पैशानें मारलेला वर पहातो व अन्नानें मारलेला खालीं पाहतो   पाण्यांत म्हैस वर मोल करुन त्यांत काय फळ   पाण्यांत म्हैस व वर मोल   ब0 वर येणें   बगल-ला वर करणें   बुडांत नाहीं तर वर कोठून येणार?   बुधली वर आली   बाजू-वर बाजू बेतणें   ईश्वर गीता   ईश्वरकृष्ण   उड्डामरेश्वर   उनकेश्‍वर   केशवराज देशमुख   चामुण्डेश्वरी   ज्ञानेश्वर   ज्ञानेश्वरी   जोगेश्वरी   नवरात्र   बलभीम मोरेश्वर भट   भार्गवराम   मुक्तेश्वर   मुक्तेश्वरी   मध्वमुनीश्वर   योगेश्वरानंद   रूपकुँवरिजी   वेंकटेश्वर   वरदराज   वरदलक्ष्मी   वराह   वराह पुराण   वराहमिहिर   विन्ध्येश्वरी   विनायक दामोदर सावरकर   विश्वेश्वर   वीरेश्वर   शिवराम   संगीत स्वयंवर   सदाशिवराव परांजपे   स्वयंवर   सिद्धेश्‍वर   सीतास्वयंवर   हरिवरदा   
: Folder : Page : Word/Phrase : Person
  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person