|
पु. बाहु ; हात . [ का . रट्टे = हात ] पु. टोला ; तडाखा ; जोराचा धक्का ; धबका . ( क्रि० मारणें , लगावणें , बसणें , लागणें ). ( कामाचा ) नेट किंवा दडपण . ( काळजीमुळें मनावर दाब . ( क्रि० पडणें , बसणें ). मुसंडी , ( लहान अरुंद मार्गानें जातांना ) ( क्रि० मारणें ) ओबडधोबड , विद्रूप वस्तु . अवाढव्य , अचाट राक्षसी खच ; ढिगारा ( वस्तूंचा ). अतिशय दाब अगर चिरडून टाकण्यास समर्थ असा धक्का . [ ध्व . ] रट्टे , घट्टे , खाणें पडणें - सराव होणें ; टक्केटोणपे खाणें . रट्टे , रट्टा , देणें - हातानें मारणें ; तडाखा मारणें . रट्टावून - क्रिवि . रेटून ; भक्कम ; पूर्ण . स्टेशन अद्यापि रट्टावून कोसभर आहे . मघाशीं रट्टावून जेवलों , आतां भूक नाहीं .
|