Dictionaries | References

मसलत

   
Script: Devanagari
See also:  मस्लत

मसलत     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Holding counsel upon; planning, determining, considering. 2 A plan, plot, scheme, a concerted design. 3 Counsel or advice. v सांग. 4 Clever contrivance or management. Ex. हा लोकापासून मोठ्या मसलतीनें पैका ओरपतो. म0 पडणें To be a difficult question; to be a matter demanding serious deliberation. Ex. तुम्ही करा म्हणतां पण मला मोठी म0 पडली.

मसलत     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  Planning. A plan; counsel.

मसलत     

 स्त्री. 
विचारविनिमय करणें ; योजना , बेत , निश्चय करणें .
युक्ति ; बेत ; कट ; डाव ; हिकमत . मोंगलाई मसलत = कपटव्यवहार .
सल्ला ; योग्य विचार ; उपदेश . ( क्रि० सांगणें ).
हुशारीनें केलेली योजना , प्रयत्न . हा लोकापासून मोठ्या मसलतीनें पैका ओरपतो .
मोहीम ; स्वारी . भागानगर व विजापूर दोनी मसलती तरुन हस्तगत जालीं . - मराचिसं १९ .
अंगीकृत कार्य . सर्वांनी एक जागा राहून मसलत बुडवावी हें ठीक नाहीं . - भाब ८ .
युद्धाची तयारी ; फौजफाटा . करवीरकरांची मसलत म्हणजे थोडी असा समज हुजूर आहे , परंतु यांचा फैल उत्कृष्ट . - ख ११ . ५७६४ . - वि . योग्य ; इष्ट ; उचित . याउपर इकडे येणें मसलत नाहीं , माळव्यांत रहावें . - ऐच १७ . [ अर . मस्लहत ]
०पडणें   पंचाईत पडणें ; पेचांत सांपडणें ; युक्ति , इलाज केलाच पाहिजे असा प्रसंग प्राप्त होणें . तुम्ही करा म्हणतां पण मला मोठी मसलत पडली .
०दार   गार - वि . सल्लागार ; मंत्री ; मनसुबदार . मसलतबाज मसलती - वि .
धूर्त ; चतुर ; कावेबाज ; धोरणी .
मसलतदार पहा .
०शीर  पु. सल्लागार निखालस तुम्हीच मस्लतशीर सोबतीस दुसरें कोणही नाहीं . - ख ८४५ . - वि . मोहिमशीर ; मोहिमेवर असलेला . खावंद मसलतशीर असल्यास तुम्ही एक दोन सालचा अगाऊ ऐवज सरकारांत द्यावा . - रा १ . ३३६ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP