अनायुष्य
अर्थ -- संध्यासमयीं जन्म असून लग्नगत होरा चंद्राची असतां पापग्रह कोणत्याहि राशींच्या अंत्य नवमांशी स्थित असतील तर, किंवा चंद्र व पापग्रह चारी केन्द्रस्थानी धरुन असतील तर, जन्म घेणारास मृत्युयोग जाणावा.
अनायुष्य ( इंद्रवज्रा )
अर्थ -- दशम भवनाचे आरंभापासून पुढें तृतीय भवनापर्यतचे चक्रार्षस ' पूर्वार्ध ' व चतुर्थ भवनाचें आरंभापासून नवम भवनातापर्यतचे चक्रार्षास ' अपराधे ' म्हणावे. चक्राच्या पूर्वार्षी क्रूरग्रह व अपराधीं सौम्यग्रह असतां, जन्मलग्न कीटक राशीस असेल तर, किंवा सर्व पापग्रह लग्नांच्या किंवा सप्तम स्थानाच्या समीपवर्ति असतील तर, बालकास मृत्युयोग जाणावा.
शीघ्रमरण ( अनुष्टप )
अर्थ -- जन्मकालीं लग्न, सप्तम गृह व चन्द्र ही पापग्रहांनी युक्त असून चन्द्रस्थानी शुभग्रहांची दृष्टि नसेल तर, तत्काळ मरण जाणावे,
शीघ्रमरण
अर्थ -- जन्मकालीं क्षीण चन्द्र व्ययभवनी आणि लग्नी व अष्टम भवनीं पापग्रह असतां केन्द्रस्थानीं व कोणी ( नवपंचम स्थानांत ) शुभग्रह नसेल तर त्वरित मरण जाणावे.
मृत्युप्रद योग
अर्थ -- जन्मकाली चन्द्र क्रूरयुक्त सप्तम, द्वादश, अष्टम किंवा लग्नीं असून, शुभग्रह चारी केन्द्रस्थानें सोडून असतील व त्यांची चन्द्रावर दृष्टि नसेल, तर तो योग मृत्युदायक होय ( शुभग्रह केन्द्री असल्यास अरिष्टाभाव )
मृत्युप्रद योग ( पृथ्वी )
अर्थ -- जन्मकालीं चन्द्र षष्टाष्टम भवनीं पापदुष्ट असेल, तर शीघ्र मरण, शुभदृष्ट असेल तर, आठ वर्षे -- आणि शुभदृष्ट व पापदृष्ट असा मिश्र असल्यास चार वर्षे -- आयुष्य, ( या योगांत चंद्रावर कोणत्याहि ग्रहांची दृष्टि नसेल तर अरिष्टभंग )
शुभग्रह षष्टाष्टम स्थानी असून त्यावर बलवत्तर पापग्रहाची दृष्टि असल्यास एक महिना आयुष्य, तसेंच लग्नाधिप सप्तम स्थानी असूत तो पापग्रहाकडून पराजय पावला असल्यास बालक एक महिन्याच्या आंत मृत्यु पावेल.
मरणयोग ( मंदाक्रांता )
अर्थ -- जन्मकाली लग्नीं क्षीण चन्द्र आणि चार केन्द्रस्थानें व अष्टमस्थान येथें पापग्रह असतील तर, किंवा अनेक पापग्रहांच्या मध्यगत झालेला चन्द्रे अष्टम्म, चतुर्थ किंवा सप्तम भवनी असेल तर बालकास मृत्यु. पापग्रहाच्या मध्यगत असा चन्द्र लग्नीं असतां. पापग्रह सप्तम किंवा अष्टम भवनीं असून चन्द्रावर बलवत्तर शुभग्रहांची दृष्टि नसल्यास मातेसहित बालक मरण पावेल. ( चन्द्रावर बलवान ग्रहांची दृष्टि असल्यास बालक मात्र मरण पावेल. )
जन्मतःच मरण
अर्थ -- शुभदृष्ट नव्हे असा चन्द्र जन्मकाली राशींच्या अंतीम नवांशी असतां, नवमपंचम स्थानी पापग्रह असतील तर, किंवा लग्नी चन्द्र व सप्तम भवनी पापग्रह असतील तर बालक शीघ्र मरण पावेल.
मातेसह मरणयोग ( हहिणी )
अर्थ -- जन्मकाली ( लग्नी ) चंद्र पापयुक्त म्हणजे शनीनें युक्त असून मंगळ आठवा असल्यास बालक व जननी यांस मृत्यु. चन्द्राऐवजी रवीस असाच योग असतां त्या उभयतास शस्त्रापासून मरण. रवि किंवा चन्द्र लग्नी असून नवमपंचम व अष्टम स्थानी बलवत्तर पापग्रह असतां लग्नी शुभ ग्रहाची स्थिति किंवा दृष्टि नसल्यास माता व अपत्य यांस मृत्यु जाणावा.
शीघ्रमरण ( अपरवक्राः )
अर्थ -- जन्मकाली द्वादशस्थानी शनि, नवमस्थानी सुर्य, लग्नीं चंद्र, किंवा अष्टम स्थानीं मंगळ असतां तेथें बलवत्तर गुरुची दृष्टि नसल्यास प्राण्यास शीघ्र मरण सांगावें.
बाल्यादशेंत मरणयोग ( पुष्पिताग्रा )
अर्थ -- जन्मकालीं पापयुक्त चंद्र, पंचम, सप्तम, नवम, द्वादश, अष्टम आणि लग्न, यापैकी एका भवनी असतां शुक्र, बुध, गुरु यांतून बलिष्ट अशा ग्रहांची चंद्रावर दृष्टि किंवा त्याच्याशीं योग नसतां बालकास मरणयोग जाणावा.
कालनिर्णय ( भ्रमरविलासिनी )
अर्थ -- जेथें अरिष्टयोग असतां जन्म घेणारा प्राणी केव्हां मरेल हें सांगितलेलें नाहीं तेथें --
चंद्र हा जन्मकाली बलिष्ट पापग्रह ज्या राशीत असतील, तेथें जेव्हा येईल किंवा जन्मकाळीच्या चन्द्रराशीस अथवा लग्नराशीस जेव्हां तो प्राप्त होईल. किंवा तो जेव्हा पुढें बलवत्तर दृष्टीच्या कारणानें पापग्रहाचें आटोक्यांत असेल त्यावेळी तो प्राणी मरण पावेल. असें पूर्वमुनींनी सांगितले आहे.