बृहज्जातक - अध्याय १७

सृष्टीचमत्काराची कारणे समजून घेण्याची जिज्ञासा तृप्त करण्यासाठी प्राचीन भारतातील बुद्धिमान ऋषीमुनी, महर्षींनी नानाविध शास्त्रे जगाला उपलब्ध करून दिली आहेत, त्यापैकीच एक ज्योतिषशास्त्र होय.

The horoscope is a stylized map of the planets including sun and moon over a specific location at a particular moment in time, in the sky.


जन्मस्थ मेषराशीचे स्वरुप

अर्थ -- मेषराशिस्थ जन्माचें स्वरुप -- गोल व आरक्त असे नेत्र, ऊनऊन, शाकभाज्यासह अल्प असे भोजन, शीघ्र प्रसन्न, भ्रमणशील, कामी, गुडध्यामध्ये दुर्बल, अस्थिरधन, शूर, स्त्रीप्रिय, सेवाचतुर ( खुशामती ) नखें वाईट, डोक्यांस व्रण, गर्वीष्ट, बंधुमुख्य, तळहातावर ' शक्ति ' ( सूक्ति ) तुश्य चिन्ह, अतिचपल, जलभीरु.

जन्मस्थ वृषभराशीचें स्वरुप

अर्थ -- कांतिमान, खेळत चालणें, मांड्या व तोंड विशाळ, पाठ तोंड पाश्वंभाग यावर कांहीं चिन्ह, त्यागशील, क्लेश सहनकर्ता, प्रभु, ककुद ( प्राधान्य किंवा छत्रचामर युक्त ) कन्या संतति, कफाळू, प्रथमचें धन, पुत्रादिकांनी हीन, भाग्यशाली, क्षमाशील, प्रखर जठराग्नि, स्त्रियास प्रिय, मित्र, मध्य व अन्त्य वयामध्ये आनंदी, असे वृषभ राशिस्थ जन्माचें स्वरुप.

जन्मस्थ मिथुनराशीचें स्वरुप

अर्थ -- स्त्रियांच्या अभिलाषी, रतिसाहित्यकुशल, आरक्त नेत्र, शास्त्रज्ञ दूत ( जासूद, वकील ) वाकडें कपाळ, बुद्धीकुशल, हास्य, मर्म व द्यूत यातें जाणणारा, उत्तम स्वरुप, प्रियवचन, अधिक भोजनाची प्रीति, गीत प्रिय, नृत्यज्ञ, नपुंसकांशीं प्रीति, नाक उंच असे मिथुनराशिस्थ जन्माचें स्वरुप आहे.

जन्मस्थ कर्कराशीचें स्वरुप

अर्थ -- तिरपे व जलद चालणें, उंचकाठीं, स्त्रोवश, सुमित्र, दैवज्ञ ( ज्योतिषी ) पुष्कळ गृहें, धनास चन्द्रासारखें क्षयवृद्धी, ठेंगू, गळा मांसल, प्रीतीनें वश, मित्रवत्सल पाणी व वर्गाचे यांची प्रीति असें कर्कराशिस्थ जन्माचे फळ आहे.

जजन्मस्थ सिंहराशीचे स्वरुप

अर्थ -- उग्र, हनुवटीचा भाग स्थूल, विशाल तोंड, पिंगट डोळें, अल्प संतति, स्त्रीद्वेष्टा, मांस बनपर्वत याचें ठायी प्रीति, अकारणीं सत्वर कोपणारा, सुधा, तृषा, उदर, दंत, मन यांच्या पिडांनीं संतप्त, दाता, पराक्रमी, स्थिरवृद्धी, अभिमानी, मातुभक्त असें सिंहराशिस्थ जन्माचें स्वरुप आहे.

जन्मस्थ कन्याराशीचे स्वरुप

अर्थ -- सलज्जित पाहाणे व आळसत चालणें, स्कंद व भुजा हीं शिथिल, आनंदी, सुकुमार, सत्यशील, कलानिपुण, पंडित, धार्मिक बुद्धीमान, रतिप्रीय, परगृह व परधन यांही युक्त विदेशवास, प्रियभाषण, कन्या संतति, अल्प पुत्र, असें कन्याराशिस्थ जन्माचें स्वरुप व गुण जाणावे.

जन्मस्थ तुलाराशीचे स्वरुप

अर्थ -- देव, ब्राह्मण, साधु यांचें ठायीं पूजनप्रीति, महाज्ञानी, शुचिर्भूत, स्त्रीस वश, अति उंच शरीर व अति उंच नासिका, अवयव कृश व असमर्थ, फिरणारा, सधन, व्यंग, देवघेवीमध्ये कुशल, देवाचे एक व सभ्य एक अशी दोन नावे ज्यास, रोगिंष्ट, बंधूवर उपकार कर्ता परंतु त्यांनी निर्मासना करुन टाकलेला असे तूळ राशिचे स्वरुप आहे.

जन्मस्थ वृश्चिकराशीचें स्वरुप

अर्थ -- वक्षःस्थळ व नयन हीं विशा, मांड्या, पोटर्‍या व गुडघें हीं गोंडाळ; पिता, माता व गुरु यापासून वेगळा, बालपणीं रोगी, राजकुळांत पूज्य पिंगट, क्रूर स्वभावी, मच्छ, वज्र, पक्षी अशी चिन्हे असलेला, गुप्त पापरत असें, वृश्चिक राशीचे फल आहे.

जन्मस्थ धनुराशीचे स्वरुप

अर्थ -- मुख, ग्रीवा हें अत्यंत दीर्घ ( लांबोळें किंवा स्थूल ) पितृद्रव्यप्राप्ति उदार, कवि, बलवान भाषणचतुर, दंत, कर्ण, ओष्ठ, नाक हीं सर्वच मोठालीं, कर्मशील, शिल्पज्ञ, खांदे अस्पष्ट, नखें वाईट, पुष्ट भुजा, अत्यंत तेजस्वी, धर्मज्ञ, बंधुद्वेष्टा, बलात्कारे अवश, सामोपचारानें वश असे धनराशीचे वर्णन आहे.

जन्मस्थ मकरराशीचें स्वरुप

अर्थ -- स्वस्त्री व पुत्रादिकांचे नेहमी कोड पुरविणारा, धर्मध्वज, शरीराखालचा भाग कृश, नेत्र उत्तम कमर सूक्ष्म, वचन पाळणारा, भाग्यशाली, आळशी, शैत्ययुक्त, फिरणारा, सत्वगुणाधिक्य, काव्यकर्ता, लोभी, अगमनीय व बृद्ध अशा स्त्रीशी आसक्त असे मकर राशीचे फल आहे.

जन्मस्थ कुंभराशीचें स्वरुप

अर्थ -- मान उंटासारखी पुढें आलेलीं, शिरा विशेष, केस कठोर उंच शरीर, पाय पोटर्‍या, मांड्या, पाठ, तोंड, कमर, पोट हीं विस्तीर्ण परस्त्री परधनासक्त व पापरत, क्षयवृद्धी पावणारा, उटणी व पुष्पें यावर प्रीति, सुमित्र मार्गश्रम सोसणारा असें कुंभ राशिचे फल आहे.

जन्मस्थ मीनराशीचें स्वरुप

अर्थ -- जलधन व परधन भोक्ता, स्त्री व वस्त्रें यांत निमग्न, गोंडस्र सुंदर असें शरीर, नाक उंच व कपाळ विस्तीर्ण, शत्रूस पराजित करणारा, स्त्री व सुंदर नयन, कांतिमान, निधि ( गुप्त ) धन भोगणारा आणि ज्ञानी असें राशिचे स्वरुप आहे.

या फलांचें तारतम्य

अर्थ -- राशि बलवान असून तिचा स्वामीहि बलवान आणि चन्द्रहि बलवान असें तिघेंहि बलवान असतील तर वर सांगितलेली सर्व फलें होतील अन्य असल्यास चन्द्राचे गुणाप्रमाणें ( कमीजास्त ) याच प्रकारे यापुढें सांगण्याची ग्रहफलें त्याविषयीहि जाणावें.

N/A

References : N/A
Last Updated : March 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP