बृहज्जातक - अध्याय १

सृष्टीचमत्काराची कारणे समजून घेण्याची जिज्ञासा तृप्त करण्यासाठी प्राचीन भारतातील बुद्धिमान ऋषीमुनी, महर्षींनी नानाविध शास्त्रे जगाला उपलब्ध करून दिली आहेत, त्यापैकीच एक ज्योतिषशास्त्र होय.


मंगलाचरण

ज्या शंकरानें आपल्या मस्तकीं चंद्राला धारण केलें आहे अशा भगवान् शंकरा मूर्तिरुप व अनेक प्रकाशमान् किरणांनी युक्त अर्थात् त्रैलोक्यदीप प्रकाशात्मक स्वरुप जीवन्मुक्तांचा मार्गरुप, यज्ञकर्त्याचा यज्ञ, आत्मवेत्यांच्या आत्मा, आकाशांतील ज्योतिःसमूहांचा राजा, ज्योतिर्गणित आणि देवांचा स्वामी, उत्पत्ति, स्थिति, लय कारक आणि वेदांनी अनेक प्रकारांनी ज्याचें वर्णन केलें आहे असा सहस्त्ररिश त्रैलोक्यप्रदीप भगवान् श्रीसूर्यनारायण आम्हांस उत्कृष्ट वाणी व बुद्धि देवो.

प्रयोजन

होरातंत्र हें अर्थपूर्ण भाषा, शास्त्रीय तत्त्वें आणि गूड कल्पना यांनीं युक्त असता होराशास्वरुप महासागर तरुन जाण्यांत आजवर अनेक विशाल बुद्धीच्या विद्व प्रयत्न निष्फल झाले आहेत. तथापि सर्वांना अल्प प्रयत्नानें होराशास्त्र अवगत यासाठीं थोडक्यांत पण अनेक वृत्तांनी युक्त व ज्यांत विपुल तत्त्वार्थांचा आदर संग्रह आहे अशा ह्या ग्रंथास मी प्रारंभ करतों.

होरा शब्दाची उत्पत्ती

'' अहोरात्र '' या शब्दांतील पहिलें '' अ '' हें अक्षर व शेवटचें ' हें अक्षर यांचा लोप करुन बाकी राहाणारा '' होस '' शब्द त्याचेंच नांव '' होरा. '' होरा शब्दाची व्याख्या क्वचित् केली जाते. पूर्वजन्मांत केलेलें चांगलें किंवा वाईट जें कांही कर्म ( प्रारब्ध किंवा भोक्तृत्व ) त्याचा ह्या जन्मीं होणारा परिपाक होय.

 

मेषादी राशींचे त्रिंशांश-त्यांचे स्वामी व राशी गंडांत

प्रत्येक राशीचे सारखे ३० भाग ( प्रत्येक भाग १ अंशाचा ) करुन त्यास त्रिंशांश असें नाभाभिधान दिलें आहे. परंतु त्या प्रत्येक अंशास्त्र स्वतंत्र अधिपति मीनला नसून अधिपंतिसाठीं त्या ३० अंशांचे ५ विभाग केले आहेत. त्यांतही समराशी आणि विषम राशी यांच्या विभागांचे स्वामी निरनिराळे आहेत. ते खाली दर्शविले आहेत.

मेष - मिथुन - सिंह, तुळ, धनु आणि कुंभ ह्या विषम राशी असून यांच्या अंशांचा त्रिंशांश स्वामी गुरु, १८ ते २५ अंशांचा स्वामी बुध आणि २५ ते ३०स्वामी शुक्र याप्रमाणें त्रिंशांश स्वामित्व जाणावें.

वृषभ - कर्क - कन्या - वृश्चिक - मकर - मीन ह्या समराशी होत. समराशीचे त्रिंशांशी २० ते २५ अं. पर्यंत शनि आणि २५ ते ३० अं. पर्यंत मंगळ याप्रमाणें समजावें.

त्रिंशांश कुंडली मांडतांना जन्मलग्नादिकांचे व ग्रहांचे स्पष्टांशावरुन वरीलप्रमाणें जो त्रिंशांश येईल तो प्रथम त्रिंशांश समजावा.

विषम अगर सम यांपैकी ज्या राशीचें लग्न अगर ग्रह असेल तो कोणत्या अशांशांत मांडावयाच्या तें खालीलप्रमाणेः--

विषम --- मंगळ, --- शनि, गुरु, बुध --- शुक्र

मेष, --- कुंभ, धनु, मिथुन तुळ

सम --- मंगळ, शनि --- गुरु बुध शुक्र

वृश्चिक मकर मीन कन्या वृषभ.

कर्क - सिंह, वृश्चिक - धनु, मीन व मेष ह्या जोड राशींचा अनुक्रमें समाप्तीचा व भाचा संधिकाल यास गंडांत असे म्हणतात.

 

 

राशींच्या दुसर्‍या काही संज्ञा

मेष -- किय, वृषभ -- तावुरि, मिथुन -- जितुमु, कर्क -- कुलीर, सिंह -- लेय, कन्या -- पाथोन, तूळ -- जूक, वृश्चिक -- कौपी, धनु -- तौक्षिक, मकर -- आकोकेर, कुंभ -- हद्रोग, मीन -- अंत्यभ अशा मेषादि राशींच्या आणखीं संज्ञा आहेत. ॥८॥

 

इं. क ( संबंध राशिचक्र ३६० अंशांचे, त्यांत १२ राशी म्हणून प्रत्येक राशि ३० - ३ असते )

प्रत्येक राशीचे सारखे ३ भाग केले असतां एक - एक भाग १५ अंशांचा होती अशा प्रत्येक भागास होरा असें म्हणतात. अर्थात् एका राशींत २ होरा असतात.

क्षेत्र ( गृह ) होरा, द्रेष्काण, नवांश, द्वादशांश, त्रिंशांश अशा ( षड्वर्ग ) प्रकारांनी शुभाशुभफलांचा निर्णय करतात. ह्या ६ प्रकारांना शास्त्रकर्त्यांनी '' वर्ग '' असे नामाभिधान ठेवले आहे. '' होरा '' ही संज्ञा बहुधा सर्व ठिकाणी व सर्व ज्योतिषी राशीच्या अर्ध्या भागासच लावतात. क्वचित् लग्नासही लावतात असें ग्रंथकार म्हणतात परंतु तशी प्रथा कोठेंही आढळून येत नाही. हे ६ प्रकार अगर बर्ग ज्या राशीचा नावाचे असतात त्या राशीचा जो स्वामी ( अधिपति ) तोच त्या वर्गाचा अधिपति असतो.

दिवाबली, रात्रिबली शीर्षोदयादी राशी

अर्थ -- मेष, वृषभ, धनु, कर्क, मिथुन आणि मकर ह्या राशी रात्रिबली व बाकीच्या दिवाबली समजाव्या. रात्रिबली लग्नास पृष्ठोदय राशी आणि दिवाबली लग्नास शीर्षोदय राशी म्हणतात. त्यांतील मीन व मिथुन हीं दोन लग्नें पृष्ठोदय व शीर्षोदय अशीं दुहेरी आहेत. म्हणून त्यांस उभयोदय अशी संज्ञा दिली आहे.

होरा देष्काणादी सिद्धी

मेषादि बारा राशीपैकी ( १ - ३ - ५ - ७ - ९ - ११ ) ह्या विषमराशी असून त्यातील काही क्रूर ( उग्र ) आहेत व वृषभादि ( २ - ४ - ६ - ८ - १२ ) ह्या सम राशि असून त्यांतील वृश्चिक राशीशिवाय बाकी सर्व सौम्य स्वरुपाच्या आहेत.

मेष, कर्क, तुला आणि मकर ह्या चर राशि होत. वृषण, सिंह, वृश्चिक आणि कुंभ ह्या स्थिर राशी समजाव्या. मिथुन, कन्या, धनु आणि मीन ह्या राशी पूर्वाधी स्थित व उत्तराधी चर असतात. म्हणून त्यांस द्विःस्वभावराशि म्हणतात.

मेष, सिंह आणि धनु ह्या पूर्व दिशेच्या राशी होत. वृषभ, कन्या, मकर ह्या दक्षिण दिशेच्या; मिथुन, तुला, कुंभ ह्या पश्चिम दिशेच्या व कर्क, वृश्चिक, मीन ह्या उत्तर दिशेच्या राशी समजाव्या. त्यांचे जे अधिपती ते दिशाधिपति होत.

मेषादि विषमराशींत पहिला होरा सूर्याचा व दूसरा चंद्राचा आणि वृषभादि समराशींत पहिला होरा चंद्राचा व दुसरा सूर्याचा, अर्थात् होराधिपति तेच ग्रह होतो.

राशीचा जो स्वामी तोच ख्या राशीच्या पहिल्या द्रेष्काणाचा अधिपति. राशीपासून पांचव्या स्थानाचा जो अधिपति तो त्याच्या दुसर्‍या द्रेष्काणाच्या स्वामी आणि यापासून नवम स्थानाचा अधिपति तो त्याच्या तिसर्‍या द्रेष्काणाचा स्वामी असते.

क्षेत्र - राशि - लग्न हें कुंडलींतील पाहिलें स्थान, त्यापासून पुढें बाराही स्थानें अनुक्रमानें समजावीं. त्यांना तनु, धन, सहज, सुहत् इत्यादि संज्ञा अनुक्रमानें आहेत.

मतांतराने होराधिपती

पूर्वी होरानिर्णय सांगितला आहे व तो सर्वमान्य आहे. तथापि पहिला होरा लग्नाधिपतीचा व दुसरा एकादश - स्थानधिपतीचा, त्याचप्रमाणें पहिला द्रेष्काण लग्नाधिपतीचा, दुसरा द्वादश - स्थानाधिपतीचा व तिसरा एकादश -- स्थानाधिपतीचा असें क्वचित् -- कांही आचार्याचें मत आहे. परंतु तें प्रचारांत नाहीं. ॥१२॥

ग्रहांच्या उच्च व नीच राशी, उच्चांश, नीचांशादि येणेंप्रमाणें

 

रवि चंद्र मंगळ बुध गुरु शुक्र शनि

उच्चराशी मेष वृषभ मकर कन्या कर्क मीन तूळ

उच्चांश १० ३ २८ १५ ५ २७ २०

नीच राशी तूळ वृश्चिक कर्क मीन मकर कन्या मेष

नीचांश १० ३ २८ १५ ५ २७ २०

 

ग्रह आपल्या उच्च राशींत उच्चांशांत असतां त्यास परमोच्च म्हणतात व नीच राशींत नीचांशांत असतां परम नीच अशी संज्ञा आहे. वर दिलेले उच्चांश व नीचांश त्या त्या राशींत परम उच्चांश व परमनीचांश समजावे.

वर दिलेल्या अंशाखेरीज बाकीच्या अंशांत पण त्याच राशींत ग्रह असतां फक्त उच्च राशीचा किंवा नीच राशीचा समजावा.

( ह्यापुढील वचनांत नवांशाच्या प्रवृत्तीची माहिती आहे. फलज्योतिषांत नवांशांना फार महत्त्व आहे. त्याचा नक्षत्रचरणांशीं संबंध आहे. )

नवांश प्रवृत्ती, वर्गोत्तम व मूलत्रिकोण

१ - ४ - ७ - १० ह्या चर राशींचा पहिला नवांश, २ - ५ - ८ - ११ ह्या स्थिर राशींचा त्यांच्या नवांश प्रवृत्तीपासूनचा ५ वा नवांश आणि ३ - ६ - ९ - १२ ह्या द्विःस्वभाव राशींचा त्यांच्या नवांश प्रवृत्तीपासूनचा ९ वा म्हणजे शेवटचा नवांश हे वर्गोत्तमासंज्ञक नवांश होत. त्याचें फल शुभ समजलें जातें. ज्या राशीचा जो नवांश तो वर्गोत्तमा.

जो राशि तोच नवांश असतां त्यांस वर्गोत्तम संज्ञा आहे. जसें -- मेषलग्नाचा मेष नवांश, वृषभेचा वृषभ नवांश इ० इ०

रवि - सिंह, चंद्र - वृषभ, मंगळ - मेष, बुध - कन्या, गुरु - धनु, शुक्र - तुला, शनि - कुंभ, ह्या राशीही त्या त्या ग्रहांची मूलत्रिकोणस्थानें होत.

 

कुंडलींतील द्वादश ( १२ ) स्थानांची नांवें

कुंडलींतील लग्नादि द्वादशस्थानांस अनुक्रमानें ( १ ) तनु ( ) कुटुंब ( ३ ) सहज ( ४ ) सुहत् ( ५ ) पुत्र ( ६ ) शत्रु ( ७ ) पत्नी ( ८ ) मृत्यु ( ९ ) धर्मं ( १० ) कर्म ( ११ ) आय ( १२ ) रिःफ अशा संज्ञा आहेत.

३ - ६ - १० - ११ ह्या स्थानांस उपचय अशी संज्ञा आहे. ( केचिन - मतानें ही स्थानें कायमचीं उपचयसंज्ञक नसतात. पण हें मत प्रचलित नाही. )

 

कुंडलींतील १२ स्थानांच्या आणखी कांही संज्ञा

लग्नादि १२ भावांस किंवा स्थानांस ( १ ) कल्प ( २ ) धन ( ३ ) पराक्रम ( ४ ) गृह ( ५ ) प्रतिभा ( ६ ) क्षत ( ७ ) मदन ( ८ ) रंघ्र ( ९ ) गुरु ( १० ) मान ( ११ ) लाभ ( १२ ) व्यय अशा आणखी संज्ञा आहेत.

कुंडलींत लग्नापासून - तनुस्थानापासून - चवथ्या व आठव्या ह्या दोन स्थानांस चतुरस्र, सातव्या स्थानास द्यून आणि दशमस्थानास '' आज्ञा '' अशा संज्ञा आहेत.

 

कुंडलीतील १ - ४ - ७ - १० ह्या चार स्थानांस केंद्र - कंटक किंवा चतुष्टय अशा संज्ञा आहेत.

प्रथमस्थानी नर ( मनुष्य ) राशि, चतुर्थस्थानीं जलचर राशि, सप्तमस्थानी कीठक राशि, दशमस्थानीं पशु राशि विशेष बलवान् व बलाढ्य असतात.

कुंडलींतल्या स्थानांच्या आणखी संज्ञा

चार केंद्रांच्या नजिकच्या पुढच्या ४ स्थानांस म्हणजे कुंडलीतील २ - ५ - ८ - ११ या स्थानांस पणफर आणि पणफरांच्या पुढच्या ४ म्हणजे कुंडलीतील ३ - ६ - ९ - १२ ह्या स्थानांस आपोक्लिम अशा संज्ञा आहेत.

चतुर्थ स्थानास -- हिबुक, अंबु, सुख, वेश्म, सप्तम स्थानास जामित्र, पंचम स्थानास त्रिकोण, दशमस्थानास कर्म -- मेषूगण अशा अधिक संज्ञा आहेत.

लग्नाचे बलिष्ठत्व व राशींचे संख्यामान

कुंडलीतील लग्न व त्याच्या स्वामी, गुरु किंवा बुध यांनी युक्त किंव दृष्ट असेल तर तें लग्न बलिष्ठ होतें. त्याव्यतिरिक्त इतर ग्रहांनी युक्त किंवा दृष्ट असतां लग्न निर्बल, कुंडलीच्या केंद्रस्थानीं दिवसा मनुष्यराशी, रात्री चतुष्पादराशि, आणि दिवस व रात्र यांच्या संधींत इतर राशि असतां ती लग्नें बलिष्ठ होतात. ( कुंडलीतील प्रत्येक स्थानास बलिष्ठत्वचा हा नियम लागू आहे. याखेरीज जे योग ते निर्बलत्वदर्शक. ) राशिचक्राच्या पूर्वार्धात म्हणजे मेषराशीपासून कन्याराशिअखेरपर्यंत क्रमानें २०।२४।२८।३२।३६।४० याप्रमाणें राशींच्या संख्येचें मान वाढत जातें आणि त्याच्या उलट म्हणजे तूळ राशिपासून मीनअखेरपर्यंत ४०।३६।३२।२८।२४।२० याप्रमाणे अनुक्रमें उतरतें संख्यामान आहे.

सहज - स्थानास दुश्चिक्य, आणि नवम भावास तप, त्र्याद्य म्हणजे त्रिकोण अशा संज्ञा आहेत.

मेषादि राशींचे वर्ण व वेशीस्थान

मेष - रक्तासारखा लाल, वृषभ - शुब्र पांढरा, मिथुन - पोपटासारखा हिरवा, कर्क - फिक्का तांबडा, पिवळा सिंह - धूम्र शुभ्रवर्ण, कन्या - चित्रविचित्रवर्ण, कुंभ - करडा, मीन पांढराशुभ्र. याप्रमाणे द्वादश राशींचे मेषादि वर्ण आहेत.

मेषादि प्रत्येक राशीची प्रवृत्ति स्वतःच्या अधिपतीच्या दिशेकडे असते. सूर्य ज्या राशीस असतो त्याच्या पुढच्या राशीस वेशी अशी संज्ञा आहे.

N/A

References : N/A
Last Updated : March 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP