प्रव्रज्यायोग ( शार्दुलविक्रीडित )
अर्थ -- एका स्थानीं एकत्र असलेल्या ग्रहांमध्ये चार ग्रह जर पृथक बलिष्ट असलें तर ते ' प्रव्रज्या ( दीक्षा ) योग ' उत्पन्न करितात. त्यांत जे बलानें अधिक असतील त्यासारखी ती प्रव्रज्या होते. परंतु जो ग्रह पराजित ( दक्षिणेंस ) असेल त्याचें दशेमध्ये त्याची ती ' प्रव्रज्या नष्ट होते. कोणता ग्रह कोणती प्रव्रज्या ( दीक्षा ) देतो ते खालीं दाखविलें आहे.
ग्रह सूर्य चन्द्र मंगळ बुध गुरु शुक्र शनि
प्रव्र. बन्याधन बुद्धश्रा शाक्य भिक्षु आजिविक चरक निर्ग्रथ
अर्थ--- तपस्वी कापालि रक्तपट दंडी ना. स्वरु चक्र क्षय
सेवन -- अग्नि हर बौद्ध भागवत वेदांत ब्रह्य नग्न
प्रव्रज्येंची असिद्धी ( वैतालिका )
अर्थ -- रजीमध्ये अस्तंगत झालेले ग्रह ' दीक्षायोग करीत नाहींत ' जर ते तेथें बलिष्ट असतील तर ' तदभक्त ' मात्र होतो, परंतु जर ते तेथेंहि अन्य ग्रह दृष्ट असून पराजितहि असतील, तर ' दीक्षा मागण्याचा संभव '
प्रव्रज्याप्राप्ति ( शालिनी )
अर्थ -- जन्म म्हणजे चन्द्रस्थित राशी -- तिच्या स्वामीवर कोणत्याहि ग्रहाची दृष्टी नसून तो ( राशिस्वामी ) मात्र शनींस पाहात असेल, किंवा शनि बलहीन असतां त्या जन्मराशीच्या स्वामीस पाहात असेल तर, ' दीक्षा प्राप्त ' होईल - चन्द्र हा शनीच्या द्रेंष्काणीं -- किंवा शनि हा मंगळाच्या नवमांशीं असेल आणि त्यावर शनीची मात्र दृष्टी असेल तरी ' दीक्षा प्राप्त ' होईल.
राजदीक्षायोग ( मालिनी )
अर्थ -- गुरु, चन्द्र, लग्न हें शनीच्या दृष्टीनें युक्त असतील व बृहस्पति हा नवमस्थानीं असेल तर राजयोगी असतांहि ' शास्त्रकार ' होतो -- नवमस्थानीं शनि हा अन्य ग्रहांनी अदृष्ट असा असेल, तर राजयोग असतां दीक्षित होत्साता भूमिपतीहि होतो.