बृहज्जातक - अध्याय ४

सृष्टीचमत्काराची कारणे समजून घेण्याची जिज्ञासा तृप्त करण्यासाठी प्राचीन भारतातील बुद्धिमान ऋषीमुनी, महर्षींनी नानाविध शास्त्रे जगाला उपलब्ध करून दिली आहेत, त्यापैकीच एक ज्योतिषशास्त्र होय.


अर्थ - मंगळ व चंद्र यांच्यासंबंधाने स्त्रीस आर्तव ( प्रतिमासी ) प्राप्त होते. त्यांत चन्द्र स्त्रीच्या अनिष्ट ( उपचयराशीशिवाय - ३ - ६ - १० - ११ ) राशीस गेला म्हणजे स्त्री ऋतुमती होते. स्त्रीच्या इष्ट राशीस चन्द्र असून तेथों सूर्य, मंगळ किंवा गुरु यांची अथवा शुभग्रहांची दृष्टि असेल तर स्त्री पुरुषाशी संयुक्त होते.

( रजोदर्शनी चन्द्रावर मंगळाची दृष्टी असावी लागते, नाहीपेक्षां रजोदर्शन संभवत नाहीं. )

यासंबंधानें सारावलीकारादिकांनीं म्हटले आहे.

'' अनुपचराशिसंस्थे कुमुदाकारबांधवे रुधिरदृष्टे ॥ प्रतिमासं युवतीना भवतीह रजो ब्रुवंत्येके ॥६॥ इंदुर्जल कुजोऽग्निर्जलामिश्रं त्वग्निरेव पित्तं स्यात् एवं रक्ते क्षुभिते पित्तेन रजः प्रवतंते स्त्रीषु ॥२॥

एवं यद्भवति रजो गर्भस निमित्तमेव कथितं तत् ॥ उपचयसंस्थे विफलं प्रतिमासं दर्शनं तस्य ॥३॥

'' पुरुषोपचयगृहस्थो गुरुणा यदि दृश्यते हिममयुखः ॥ स्त्रीपुरुषसंयोगं तत्र वदेदन्यथा नैव ॥१॥'' '' उपचयभवनेश - शभृददृष्टो गुरुणा सुहद्भिरथवाऽसौ पुंसां करोति योगं विशेषतः शुक्रसंदृष्टः ॥१॥'' '' ऋतुविरमे स्नातायाः पचयस्थः शशी भवति ॥ बलिना गुरुणा दृष्टो भर्त्रा सह संगमश्च तदा ॥१॥ राजपुरुषेण रविणा विटेन भौमेन वीक्षिते चंद्रे ॥ सौम्येन चपलमतिना भृगुणा कांतेन रुपवता ॥२॥ भृत्येन सूर्यपुत्रेणाऽऽयाति स्त्री तु संगम हि तदा ॥ एकैकेन फल स्थाददृष्टेनाऽन्यैः कुजादिभिः पापैः ॥३॥ सर्वैः स्वगृहं त्यक्त्वा गच्छंति वेश्यापदं युवती ॥

 

सुखदुःखरुप संभोग ( इंद्रवज्रा )

अर्थ - संभोगलग्नापासून किंवा प्रश्नलग्नापासून सप्तमस्थानी इष्टानिष्ट ग्रहांची जशी दृष्टि किंवा योग असेल, त्या मानाने, सुखरुप किंवा दुःखरुप असा स्त्रीचा पुरुषाशी संयोग जाणावा. तेथें अनिष्ट ग्रहांचा संबंध असतां रोषांत आणि इष्ट ग्रहांचा संबंध असतां हास्यविलासांत संभोग होतो.

त्याप्रमाणेंच सप्तमभाव ज्या राशीस असेल त्या राशीच्या जातीचे स्त्री - पुरुष भोगकाली ज्या प्रकारानें परस्पराशीं संयुक्त होतात, त्या प्रकारानेंच य उभयतांचा समागम जाणावा.

गर्भयोग

अर्थ -- संभोगकाळी सूर्य, चंद्र, शुक्र आणि मंगळ स्वनवांर्शी असावे, किंवा गुरु लग्नी किंवा नवमपंचम असावा, म्हणजे गर्भसंभव होतो. पण चन्द्रकिरणे जशी अंधाच्या उपयोगाची नव्हेत त्याप्रमाणेंच हें योग बीजहींन मनुष्यास ( सहा प्रकारच्या षंढास ) फलद्रूप होत नाहींत.

स्त्रीपुरुषांचा संभोगास प्रतिकूलयोग

अर्थ -- संभोगसमयीं सूर्यापासून किंवा चन्द्रापासून, शनि किंवा मंगळ सप्तम असेल तर रोगप्रद आणि द्वितीय -- द्वादश असेल तर मृत्युप्रद शनि व भौम यांतून एकाचा सूर्याशीं किंवा चंद्राशी दृष्टीसंबंध अथवा योगसंबंध असतां मरण हें योग सूर्यपक्षीं पुरुषास व चंद्रपक्षी स्त्रीस फलद्रूप होतात. ( हे योग स्त्रीस गर्भधारण झाल्यास संभवतात )

झालेला गर्भ कोणास सुख देईल

अर्थ -- गर्भसंभवकालीं दिवसा सूर्य विषम राशीस असतां पित्यास शुभ आणि शुक्र समराशीस असतां मातेस शुभ. पण रात्रौ शनि विषम राशींस असत. पित्यास व चंद्र समराशीस असता मातेस शुभ. आतां दिवसा सांगितलेला ग्रह दिवसा त्याच विषम किंवा सम राशीस असेल तर पित्याच्या ऐवजी चुलत्यास व मातेच्या ऐवजी मावशीस शुभप्रद होय.

विषम राशीस सांगितलेलें ग्रह सम राशीस व सम राशीस सांगितलेले ग्रह विषम राशीस असतील तर ते अनुक्रमें पित्यास व मातेस अनिष्टप्रद होत.

विषम राशीस सांगितलेले ग्रह सम राशीस व सम राशीस सांगितलेले ग्रह विषम राशीस असतील तर ते अनुक्रमें पित्यास व मातेस अनिष्टप्रद होत.

पित्यास सांगितलेला ग्रह मातेस सांगितल्याप्रमाणें व मातेस सांगितलेला ग्रह पित्यास सांगितलेल्या ग्रहाप्रमाणे आल्यास शुभ, तेथें अशुभ व अशुभ तेथे शुभ, अशी फळें पिंत्यास व मातेस अनुक्रमें जाणावी.

दिवसा सूर्य व शुक्र आणि रात्री शनि व चंद्र अनुक्रमें तातसंज्ञक मातृसंज्ञक असतात.

रात्री सूर्य व शुक्र आणि दिवसा शनि व चंद्र अनुक्रमें '' चुलता '' '' मावशी '' - एतत्संज्ञक जाणावे.

स्त्रीस अशुभ योग

अर्थ -- गर्भाधानकाळीं लग्नी पापग्रह ( येणारा ) असेल आणि तेथें शुभ ग्रहांची दृष्टी नसेल किंवा त्या लग्नीं शनि असून त्याजवर क्षीण चंद्राची अथवा संगलाची दृष्टी असेल तर गर्भ धारण करणारी स्त्री मरण पावेल. आधान. लग्नाच्या मागील राशीत २९ अंश तो ग्रह असेल तर तो उदयाभिलाषी समजावा

स्त्रीस मरण ( वैतालिमा )

अर्थ -- आधानकाळीं लग्नीं चन्द्र असून, किंवा चन्द्र इतर कोठेंहि असून यांचे मागे व पुढें अशा दोन्ही राशीस पापग्रह असोन लग्नी शुभ ग्रहावी दृष्टी किंवा स्थिति नसेल तर, स्त्री गर्भासहित मरण पावेल.

स्त्रीस मरण ( वैतालिका )

अर्थ -- आधानकाळीं चन्द्रापासून चतुर्थस्थानी क्रूर ग्रह किंवा ( आधान ) लग्नास अष्टमस्थानी मंगळ असेल तर, किंवा आधानलग्नापासून चतुर्थ भावास व द्वादश भावास सूर्य असोन चंद्र क्षीण असेल तर, स्त्रीस पूर्वीप्रमाणे मरणयोग जाणावा.

गर्भस्त्राव वगैरे ( वैतालिका )

अर्थ -- गर्भसंभवकाळीं लग्नीं मंगळ व सप्तम स्थानीं सूर्य असतां गर्भतीस शस्त्राघातापासून मरण प्राप्त होईल. तसेंच आधानकाळीं एखादा ग्रह पिडीत असेल तर ज्या काळी याजकडे मासाधिपत्य येईल त्या काळीं तो गर्भं पतन पावेल.

भौमादिक पाच ग्रह युद्धामध्ये पराजित असतां किंवा धूमकेतूने आक्रांत झाले असतां, तसेंच ग्रहणामुळें सूर्यचन्द्र, ग्रस्त असतां अथवा पापग्रहांनी युक्त अथवा दुष्ट असतां त्यांस पिडीत म्हणतात.

 

गर्भपुष्टि

अर्थ -- आधानकाळीं चन्द्र व लग्न याशीं शुभ ग्रह युक्त असतं ते त्यापासून नवम, पंचम, सप्तम, द्वितीय, चतुर्थ किंवा दशम स्थानीं तृतीय किंवा एकादशस्थानीं असतील व लग्नीं आणि चन्द्रावर सूर्याची दृष्टि तर गर्भ पुष्ट राहील.

 

पुत्रकन्यादिगर्भस्दरुप

अर्थ -- आधानकाळीं विषम राशीस व विषम राशीच्या नवांशीलग्न सूर्य, गुरु व चन्द्र बलवत्तर असतील तर पुरुषजन्म आणि ते समराशींस समराशीच्या नवांशी असतील तर स्त्रीजन्म तसेंच गुरु व सूर्य विषपस्य असता पुरुषजन्म व चन्द्र, शुक्र आणि मंगळ समस्य असता स्त्रीजन्म. हेंच ग्रह द्विस्वभाव राशीस बुधानें दुष्ट असतील तर जुळी अपत्ये होतील; ती त्या त्या ग्रहाच्या स्वभावाप्रमाणे मिश्र - मुलगा व मुलगी अशी निपजतील.

स्त्रीपुरुषात्मक जन्म

अर्थ -- आधानलग्नापासून ( लग्न सोडून ) इतर विषमभावास शनि असतां पुरुष गर्भ असतो. याप्रमाणे पुरुष व स्त्रिया याचें जन्मयोग सांगितलें. या सर्वांच्या बलाबलाचा विचार चांगला करुन भावो अपत्य अमुक होणार म्हणून सांगावे.

क्लीवयोग

अर्थ -- समराशिस्थ चन्द्र व विषमराशिस्थ सूर्य यांचो परस्परांवर दृष्टी असेल किंवा शनि समराशिस्थ व विषमराशिस्थ बुध, हे परस्परास पहात असतील किंवा विषमराशिस्थ मंगळ समराशिस्थ सूर्यास पहात असेल किंवा चंद्र व लग्न हीं विषमराशीस असतां तेथें मंगळाची दृष्टि असेल किंवा समराशिस्थ चंद्र व विषमाराशिस्थ बुध यांजवर मंगळाची दृष्टी असेल; किंवा पुरुषराशीच्या नवांशी शुक्र, चन्द्र व लग्न असेल, तर हे योग गर्भ नपुंसक होण्यास कारण होतात. ( येथें मंगळ समराशिस्थ असला पाहिजे असे बादरायणांचे मत आहे ).

 

द्विगर्भयोग व त्रिगर्भयोग

अर्थ -- समराशीस चन्द्र व शुक्र आणि विषय राशीस बुध, गुरु, मंगळ लग्न ही असतील तर किंवा लग्न व चन्द्र समराशीस असतां तेथें पुंग्रहाची पुरुष ग्रहाची ) दृष्टी असेल तर - गर्भ जुळा ( स्त्री व पुरुष असा ) निपजतो.

वरील दोन्ही प्रकारांत विषमराशीस सांगितलेला विषय ते ग्रह समराशीस वलिष्ठ असता घडेल तर हेंच फळ सांगावे.

सर्व ग्रह व लग्न द्विस्वभाव नवांशीं असून, स्वांशगत बुधाची त्यावर दृष्टी असल्यास तीन गर्भाची उत्पत्ति होते. त्यापैकी बुध मिथुनांशीं असल्यास दोन पुरुष व कन्याशीं असल्यास दोन स्त्रिया, याप्रमाणे निश्चय करावा.

लग्न व बुधासुद्धां सव ग्रह द्विस्वभाव नवांशावाचून इतरत्र कोठें कोठें असें असतील तर, ते ज्या नवांशी असतील त्या राशीच्या लिंगाशी सदृश्य गर्भोप्तत्ति जाणावी.

 

बहुगर्भसंभव

अर्थ -- धनुलंग्नाचां धनुर्नवांश सुरु असून ग्रह धनुर्नवांशीं कोणत्याहि राशीस बलिष्ट असतां, बलिष्ट अशा बुधशनींची जन्मलग्नांवर दृष्टी असेल तर, पुष्कळ गर्भ एकत्र निपजतात.

गर्भवशा व गर्भाधिपति

अर्थ -- गरोदर स्त्रीच्या गर्भमासाचे अधिपति व दशा खाली दिल्या आहेत.

मास दशा स्वामी

१ ला कलल शुक्र

२ रा धन मंगळ

३ रा अकुर गुरु

४ था अस्थि सूर्य

५ वा चर्म चंन्द्र

६ वा नख केश शनि

७ वा चेतना बुध

८ वा आधानलग्नपति

९ वा चन्द्र

१० वा सूर्य

मासाधिपतीचें बलाबलाप्रमाणें त्या त्या मासी गर्भावर शुभाशुभात्मक परिणाम आढळतात.

 

असाधारण्य

अर्थ -- बुध, नवम, पंचम असून अन्यग्रह कोठेंहि बलहीन असें असतील गर्भास जुळें मुख, जुळें पाय, जुळें हात इत्यादि असतील. चन्द्र वृषभ राशीस असून गंडांतीच्या नवाशांस अशुभ ग्रह असतील तर गर्भ मुका होईल; परंतु त्या गंडांताशस्थ ग्रहावर शुभदृष्टी असल्यास काळेकरुन वाणी उत्पन्न होईल.

व्यंगजन्म

अर्थ -- शनि व मंगळ बुधनवांशीं किंवा बुधाच्या राशीस असतील तर सदंत जन्म, चन्द्र कर्क राशीस लग्नीं असून, तेथें शनि, मंगळ याची दृष्टी असेल तर कुबडा. मीन राशीस लग्न असता तेथे शनि चंद्र व मंगळ यांची दृष्टि असेल, तर पागळा, चन्द्र व पापग्रह गंडांतोच्या नवांशी असतील तर मूर्ख. येणेंप्रमाणे पिंड निपजेल.

वर सांगितलेल्या योगांवर शुभ दृष्टी नसेल तेव्हां मात्र ही फळे घ्यावी.

व्यंगता

अर्थ -- मकर राशीचा अंत्य ( कन्या ) नवांशी लग्नी असून त्यावर शनि चन्द्र आणि सूर्य यांची दृष्टि असेल तर खुजा. लग्नीं चालूं द्रेष्काणी पापग्रह असल्यास, पहिल्या द्रेष्काणी भुजहींन -- दुसर्‍या द्रेष्काणी पादहीन आणि तिसर्‍या द्रेष्काणी मस्तकहीन असा पिंड निपजेल.

व्यंगता

अर्थ -- सिंह राशीस लग्नी सूर्य, चन्द्र असोन तेथें शनिमंगळाची दृष्टी असेल तर नेत्रहीन; आणि त्यावर सोम्यासोम्य ग्रहांची दृष्टी असेल तर फुलें पडलेल्या डोळ्यांचा ( बद्रुदाक्ष ) द्वादशस्थानीं चन्द्र असतां डाव्या डोळ्याने व सूर्य असतां उजव्या डोळ्यानें अंध. परंतु याच योगावर सौम्य ग्रहांची दृष्टी असतां अशुभ फलांचा निरास होतो.

जन्मळाळ

अर्थ -- आधानकाळी चन्द्र ( अंशकलाविकलात्मक ) ज्या द्वादशांशी असेल त्या राशीस दहावें मासी तो येईल त्या वेळी तो राशी दिवाबल असल्यास दिवसा -- रात्रीबल असल्यास, रात्री -- आधानकाळीं चन्द्र जितके अंश कला होता तितक्या घटकापळांवर त्या गर्भाचा जन्म होतो.

सल

अर्थ -- लग्नगत नवांश शनीचा असून, शनि सप्तम असेल, तर वर्षानीं गर्भ जन्मेल. शनीच्या ऐवजी चन्द्राचा योग असल्यास पुढे बारा वर्षानी पिंडास जन्म होईल.

या अध्यायांतील योग आधानकाळाबद्दल आहेत, पण यांचा युक्तीनें उपयोग केल्यास हे जन्मकाळास सुद्धां लागू पडतील.

गर्भप्रश्नासंबंधाने देखील या अध्यायाचा चांगला उपयोग होईल.

N/A

References : N/A
Last Updated : March 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP