ऋतुविषर्यय व मासतिथ्यानयन
अर्थ -- अयनांचे कारणामुळें ऋतूभिन्न होऊ लागल्यास चन्द्रास शुक्राचा. बुधास मंगळाचा, गुरुस शनीचा, अशी ऋतूची फेरबदल करावी -- प्रश्न लग्न प्रथम द्रेष्काणी असतां ऋतूचा पहिला मास तो जन्ममास घ्यावा -- तेंच लग्न दुसरे द्रेष्काणी असता दुसरा मास जन्ममास जाणावा -- तिसरा द्रेष्काण असला तर त्याचे दोन भाग करुन जन्ममासाची कल्पना करावी. -- व त्रैराशिकानें तिथि आणावी.
चांद्रमानानें तिथ्वादि काळज्ञान
अर्थ -- या तिथीविषयीं होराशास्त्रकुशल असे मुनिवर्ष हे, सूर्याचे भुक्त अंशाइतक्या तिथि घ्याव्या असे सांगतात -- प्रश्न लग्न हे रात्रिसंज्ञक असेल तर राशीस जन्म -- प्रश्न लग्नाचें भागाचे प्रमाणाने त्या दिवसाचा किंवा रात्रीचा इष्टकाळ हिशेबाने काढावा.
मास चंद्रराशि यांचा निश्चय
अर्थ -- कितीएक ( आचार्य ) प्रश्नकाळींच्या चन्द्राचें मुक्त नवमांशावरुन शुक्लांतसंज्ञक मास घेण्यास सांगतात व लग्न, पंचम, नवम यांतून जे उत्तम बली असेल या स्थानाचें राशीस चन्द्र कल्पावा किंवा प्रश्नकत्यांचे अंग स्पर्शादिकांवरुन कालांगाप्रमाणे त्या राशीस चन्द्राची कल्पना करावी ( अ. १ श्लोक ४ पहा )
मतांतरानें चंद्र राशी
अर्थ -- प्रश्नलग्नापासून जितक्याचें स्थानीं चन्द्रमा असेल, तितक्याचें राशीस जन्मकाळींचा चन्द्रमा कल्पावा -- परंतु जन्मलग्न मीन असेल तर मीनराशींसच चन्द्रमा योजावा -- तसेच प्रश्नकाळी भक्ष्य पदार्थ किंवा कांही आकृति दृष्टीस पडेल किंवा एकादा शब्द ऐकण्यांत येईल त्या प्रमाणावरुन चन्द्रराशीची कल्पना करावी.
जन्मलग्न - साधन
अर्थ -- प्रश्न लग्नाच्या नवमांशाप्रमाणे जन्मलग्न घ्यावें. किंवा सूर्य हा प्रश्नलग्नाचें द्रेष्काणापासून जितक्याके द्रेंष्काणी असेल तितक्याचें संख्येइतके जन्मलग्न कल्पावें. असे शास्त्र सांगते.
लग्नसाधन - पुढें चालूं
अर्थ -- प्रश्नलग्नी ग्रह असेल, स्यास किंवा ( कुंडलीत ) बलवान ग्रह असेल त्यास छायांगुलांनी भागावे. ( द्वारशांगुलात्मक शंकु किंवा शलाका ) व त्या भागाकारास पुनः बारांचा भाग द्यावा. अवशेष राहील ते मेषेपासून लग्न जाणावे -- प्रश्नकर्ता हा बसला असेल तर प्रश्नलग्नापासून सातवें जन्म लग्न व निजला असेल तर चतुर्थ स्थान राशी तेंच जन्म लग्न. उठून प्रश्न करील तर दशमस्थान राशी तेंच जन्म लग्न -- उभ्यानेंच प्रश्न करील तर प्रश्न लग्न तेंच जन्म लग्न असें जाणावे.
मतांतर ( शार्दुलविक्रीडित )
अर्थ -- प्रश्न लग्नास ( अंशकालात्मक ) खाली दाखविलेल्या अंकांनी गुणावें व प्रश्नलग्नीं कोणी ग्रह असतां त्याचें दाखविलेल्या अंकानीं पुनः त्या ( प्र. ल. ) स गुणावें. ( खाली श्लोक ११ स्तव )
मेष वृषभ मिथुन कर्क सिंह कन्या तूळ वृश्चिक धन मकर कुंभ मीन
७ १० ८ ४ १० ५ ७ १० ९ ५ ११ १२
सूर्य चन्द्र मंगळ बुध गुरु शुक्र शनि
५ ५ ८ ५ १० ७ ९
नवकदान नक्षत्रानयन व भावप्रश्न
अर्थ -- प्रश्न लग्नास सातांनीं गुपून सत्ताविसांनीं भागावे. बाकी राहील तें जन्मनक्षत्र किंवा बाकीसही नवांचा भाग द्यावा ( षटीपळांस्तव ) किंवा न दिल्यास तसेंच नक्षत्र घ्यावें. याचप्रकारे स्त्री, बंधु, पुत्र शत्रु या स्थानच्या राशीवरुन त्यांचीं नक्षत्री उत्पन्न करुन ( अनुभवास्तव ) पृच्छकांस सांगावी
मतांतरे वर्षादिकांचे साधन
अर्थ -- प्रश्नलग्नास वरचे ( नववें श्लोकांतील ) राशीगुणकांकांनीं गुणून वर्ष, ऋतु, मास, तिथी, दिवस, रात्र, नक्षत्र, लग्ननवमांशाकरितां ( दहावें श्लोकांतील ) सांगितलेल्या नवांचा भाग देऊन स्वकल्पनेने तें वर्षादिक उत्पन्न करावें.
अर्थ -- प्रश्नलग्नास दहांचा गुणक देऊन वर्ष, ऋतू, मास आणावें व आठांचा गुणक ( पुन्हा प्रश्नलग्नास ) देऊन पक्ष, तिथी इ. आणावे.
अर्थ -- दिवस रात्रींच्या जन्म व नक्षत्रानवन हे सातांचे गुणक्रमाने ( प्रश्नलग्नास ) नेहमी उत्पन्न करावें.
अर्थ -- इष्टकाळ, जन्मलग्न, होरा, नवमांशादिक हे प्रश्नलग्नास पाचाचा गुणक देऊन उत्पन करावे. या प्रकारे हे गुणक नष्टजातक उत्पन्न करण्यास्तव घ्यावें.
प्रकारांतरानें नक्षत्रसाधन
अर्थ -- पुच्छकाच्या नावांची अक्षरे ( संस्कार झालेलें नांव ) मोजून त्यास द्विगुणित करावें आणि त्यात छायांमुळें मिळवावी. त्या एकंदर संख्येस सत्ताविशांनीं भागून शेष राहील ते धनिष्ठादिकांपासून जन्मनक्षत्र मोजावें.
प्रकारांतरानें नक्षत्रसाधन
अर्थ -- पृच्छकाचें मुख त्या दिशेकडेच असेल त्यावरुन जन्मनक्षत्र आणावे. त्याचा प्रकार -- पूर्वेस २, आग्नेईस ३, दक्षिणेस १४, नैऋत्येस १०, पश्चिमेस १५, वायव्येस २१, उत्तरेस ९, ईशान्येस ८ याप्रमाणे मुखाचें दिशेचा अंक घेऊन त्यास पंधरांनी गुणावें, त्यांत ती दिशाहि मिळवावी ( पूर्वेपासून १ इ ) व त्या संख्येस सत्ताविसांचा भाग द्यावा. जे शेष राहील ते धनिष्टादिकांपासून जन्मनक्षत्र जाणावे.
नष्टजातक निर्णय
अर्थ -- हें नष्टजातक मी अनेक प्रकारांनी वर दाखविली आहे. सच्छिष्याही त्यांची यत्रेंकरुनच परीक्षा करावी व जे योग्य असेल तेंच ग्रहण करावे.