बृहज्जातक - अध्याय १३

सृष्टीचमत्काराची कारणे समजून घेण्याची जिज्ञासा तृप्त करण्यासाठी प्राचीन भारतातील बुद्धिमान ऋषीमुनी, महर्षींनी नानाविध शास्त्रे जगाला उपलब्ध करून दिली आहेत, त्यापैकीच एक ज्योतिषशास्त्र होय.

The horoscope is a stylized map of the planets including sun and moon over a specific location at a particular moment in time, in the sky.


स्थानतः चंद्रफल ( मालिनी )

अर्थ -- विनय, वित्त, ज्ञान, वुद्धि, नैपुण्य ही फलें चन्द्र हा सूर्याचे केंद्री असला, तर अधम. जर पणफरस्थ असला तर ममध्य आणि आपोक्लिमस्थ असेल तर श्रेष्ठ होतात -- दिवसाचें जन्मावर गुरुची दृष्टी किंवा रात्रीचे जन्मावर शुक्रची दृष्टी असून चन्द्र हा स्वनवांशी किंवा मित्र नवांशीं असला तर ' वित्तवान आणि सुखी ' असा होतो.

अधियोग ( वसंततिलका )

अर्थ -- चन्द्रापासून, साहा, सात, व आठ ह्या स्थानीं सौंम्य ग्रह जर असतील तर तो ' अधियोग ' होतो. याची फलें ( बलानुसार ) सैन्यपति, सचिव, राजा अशीं होऊन, सौख्य, वैभवांनीं संपन्न, जिंतशत्रु, दीर्घायु, रोग व भयरहित असें जन्म पावणारे होतात.

अन्ययोग ( शार्दुलविक्रीडित )

अर्थ -- सूर्यावाचून कोणींहि ग्रह चन्द्राच्या द्वितींयस्थानें असला तर तो ' सुनफा योग ' होतो -- हैं योग बहुत आचार्यांनीं सांगितलें आहेत. चन्द्राचे द्वितीय द्वादशस्थानीं कोणीच ग्रह नसेल तर तो ' केमद्रुम ' योग होतो -- परंतु जर चन्द्राशीं युक्त किंवा त्यांच्या केन्द्रीं कोणी तरी ग्रह असला तर तो योग येत नाही. कित्येक केन्द्र नवांशीं पण हा योग सांगतात, परंतु तें प्रसिद्ध नाही.

सुनफादिकांचे प्रतिभेंद ( इंद्रवज्रा )

अर्थ -- सुनफा व अनफा यांचें भेंद प्रत्येकीं ३१ - ३१ आहेत आणि दुरुधरा योगाचें भेद १८० आहेत. तें ग्रहांचे फेरफार केल्यानें इच्छित भेद स्पष्ट होतात.

यांचे फळ ( मालिनी )

अर्थ -- सुनफा योगाचे फल -- स्वोपाजिंतद्रव्य, राजा किंवा राजातुल्य बुद्धी, द्रव्य, कीर्ति याही करुन युक्त -- अनफायोगाचें फल -- प्रभु, निरोगी, शीलवान, प्रख्यात, कीर्ति, विषयसुखी, सुवेषी, निर्वेध.

अर्थ -- दुरुरायोगाचें फल -- उत्पन्न भोगी, सुख भोगणारा, धन, वाहन, याही युक्त, उदार, आणि उत्तम सेवकांनी युक्त, -- केमद्रुमयोगाचें फल -- मलिन दुःखित, निर्धन; जांसूद, खळ ही फलें राजकुळांत असणारासहीं होतात.

ग्रहपरत्वें फळ ( वसंततिलका )

अर्थ -- वरचें योग ज्या ग्रहांनी उत्पन्न होतात त्यांची फलें खाली सांगितली आहेत.

मंगळ -- उत्साही, शौर्यवान, धनवान, साहसी.

बुध -- दक्ष, मधुरवचन, कलानिपुण.

गुरु -- धन, धर्म, सुख यांचा भोक्ता, राजपूज्य.

शुक्र -- कामासक्त, बहुधन, विषयोपभोगी.

शनि -- परवैभव, परसाहिन्ये यांचा उपभोक्ता, बहुत कार्य करणारा अध्यक्ष.

चन्द्र हा दृश्य गोलाचीं ( आकाशमार्गी ) असतां, दिवसास जन्म अशुभ व रात्रींचा जन्म शुभ -- तोच अदृश्य गोलार्थी ( पाताळमार्गी ) असतां दिवसा जन्म शुभ व रात्रींचा जन्म अशुभ असें जाणावें.

असामान्य शुभयोग ( वसंततिलका )

अर्थ -- चन्द्रापासून उपचयस्थानीं ( ३ - ६ - १० - ११ ) सर्व ग्रह शुभ असतील तर, ' द्रव्यवान ' -- आणि असेच लग्नापासून जर असतील तर, ' अतिशयित द्रव्यवान ' -- या प्रकारे जर दोनच शुभ ग्रह असतील, तर ' सामान्य द्रव्यवान ' -- याहून कमी असतां ' अल्प द्रव्यवान ' -- फलाविषयीं अन्य योग जरी अशुभ असलें तरी हें ग्रह प्रावल्येकरुन शुभ फल प्राप्त करितात.

N/A

References : N/A
Last Updated : March 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP