ग्रहरुपाने कालावयव पाहण्याचे ग्रहांचे अधिकार
अर्थ - क्रूर ग्रह अत्यंत बलवान असोन, सौम्य ग्रह बलहीन असतील अगर नपुंसक ग्रह ( बु. श. ) केन्द्री असतील किंवा ( जन्म अथवा प्रश्नलगवर ) नपुंसक ग्रहांची दृष्टी असेल, तर अशा योगांवर वियोनि ( मनुष्येत्तर ) स्थावर जंगमाचा जन्म संभवतो. या योगांत, चन्द्र ज्या द्वादशांशराशींत असतो, त्या राशींस अनुरुप अशा प्राण्यांचा जन्म झाला असें जाणावें. जसे -
चन्द्र मेष द्वादशांशी असल्यास -- मेंढा, बकरा वगैरे.
चन्द्र वृषभ '' '' -- गाय, म्हैस, इ.
चन्द्र कर्क '' '' -- खेकडा, कासव इ.
चन्द्र सिंह '' '' -- सिंह, वाघ, मांजर.
लांडगा, कुत्रा, मूषक इत्यादि.
चन्द्र वृश्चिक '' '' -- साप, विंचू वगैरे षट्पदाविक प्राणी
चन्द्र धनु उत्तरार्ध '' '' -- घोडा, गाढव इ.
चन्द्र मकर पूर्वांर्ध '' '' -- हरण, सांबर, मोर इ.
चन्द्र मकर उत्तरार्ध '' '' -- सुसर, बेडूक इ.
चन्द्र मीन द्वादशांशी असल्यास सर्व जातीचे मासे वगैरे.
आणखी कारणे ( वैतालिका )
अर्थ - बलिष्ठ असे पापग्रह आपल्याच नवांशी असतील आणि दुसरे ग्रह ( सौम्य ) परकीयांच्या अशी अगदी बलहीन असतील आणि लग्न वियोनिसंज्ञक असेल, तर वियोनिचा जन्म झाला असे सांगावें.
राशिपरत्वें चतुष्पदाचा अंगविभाग
अर्थ - मेष - मस्तक, वृषभ - मुख आणि गळा, मिथुन - पुढचे पाय व दे, कर्क - पाठ, सिंह - हदय, कन्या - पार्श्वभाग, तुला - कुशी, वृश्चिक - गुहय, धनु - मागचें पाय, मकर - उपस्थ व वृषण, कुंभ - ढुंगण आणि मीन - पुच्छ येणेंप्रमाणे सर्व वियोनिमाचा - परंतु प्राधान्येकरुन चतुष्पादांचा -- राशीपरत्वें अंगविभाग आहे. ( जन्मकालीं ज्या अंगसंबंधी राशीत पापग्रह असेल, त्या अंगास व्यंगता किंवा घात आहे असे समजावे )
वियोनिवर्ण न विचार ( वैश्वदेवी )
अर्थ - वियोनीच्या जन्मकाली किंवा तो काल न मिळाल्यास तत्संबंधक प्रश्न झाला असेल त्या काली, लग्नी ज्या राशीचा नवांश चालू असेल, त्या राशीच्या वर्णाशी सदृश असा त्या वियोनीचा रंग सांगावा.
किंवा लग्नी कोणी ग्रह असल्यास त्याच्या, नाहींपेक्षा तेथें ज्या ग्रहांची बलवत्तर दृष्टि असेल, त्याच्या वर्णाशीं मिळता असा त्या वियोनीचा वर्ण सांगावा. पाठीवरील रेषा सप्तमस्थ ग्रहाचें रंगाप्रमाणें सांगावी.
पक्षांचा जन्म ( वंशस्थ )
अर्थ - तात्कालिक द्रेष्काण पक्ष्याचा असतां किंवा चर राशीचा नवांश चालू असून तेथें बलवत्तर ग्रह स्थित असतां किंवा चालू नवांश मिथुन किंवा कन्या असून तेथे बलवत्तर ग्रहाचा योग असतां, जर तेथें शनीची दृष्टि असेल, किंवा शनीच तेथें असेल, तर स्थलज पक्ष्यांचा जन्म आणि तेथें शनीच्या ऐवजी चन्द्राची दृष्टी किंवा योग असतां जलज पक्ष्यांचा जन्म संभवतो.
वृक्षजन्म
अर्थ -- लग्न, चन्द्र, गुरु आणि सूर्य बलहीन असते ल, तर ( पृच्छक राशीचा असल्यास जलांत -- स्थलचर राशीचा असल्यास स्थळांत -- वृक्षजन्म झाला. इत्यादि प्रकार तात्कालीन नवांशाच्या अनुरोधाने जाणावा.
आतां प्रश्नकालाच्या नवांशाचा स्वामी ज्या राशीचा स्वामी असेल, तत्संख्यातूल्य वृक्षांचा उद्भव झाला असे जाणावें. नवांशाधिपति २ राशींचा स्वामी असेल, तर जी रास विशेष बलवान असेल त्या राशीइतकी संख्या जाणावी असे अन्य आचार्याचे मत आहे.
वृक्षांचा प्रकार
अर्थ -- प्रश्नकालीन नवांशपति सूर्य असल्यास उत्तम गाभा ज्यास आहे. अशा वृक्षास, शनि असल्यास हीन वृक्षास, चंद्र पुष्कळ रस ( डिंक ) ज्यांत आहे अशास, मंगळ कांटेर्या झाडास, गुरु पुष्कळ फळांच्या वृक्षास, बुध फलहीन वृक्षास आणि शुक्र पुष्कळ फुलांच्या वृक्षांत -- उत्पन्न करितो. याप्रमाणें लग्न नवांश वेळ साधून त्या त्या जातीचे वृक्षादि लावावे.
पुनः चंद्र स्निग्ध ( कांतिमान ) वृक्षांस व मंगळ तीक्ष्ण ( उग्र ) वृक्षांस उत्पन्न करितो.
जातिप्रकार
अशुभ राशीस शुभ ग्रह असतां उत्तम वृक्ष निकृष्ट भूमीत उत्पन्न होतात आणि शुभ राशीस अशुभ ग्रह असतां हीन जातीचें वृक्ष उत्तम जमिनीत उगवतात. तात्पर्य, ग्रहांप्रमाणे वृक्षाची जाति व राशीप्रमाणे भूमीची जाति निश्चित करावी.
परनवांशी नवांशपति असल्यास तो स्वाशराशीपासून जितकाल्या राशीस असेल, तितक्या संख्ये इतक्या निरनिराळ्या जातीचे वृक्ष निपजतात. ( परनवंश म्हणजे दुसर्या ग्रहांचा समजावा. )