बृहज्जातक - अध्याय ५

सृष्टीचमत्काराची कारणे समजून घेण्याची जिज्ञासा तृप्त करण्यासाठी प्राचीन भारतातील बुद्धिमान ऋषीमुनी, महर्षींनी नानाविध शास्त्रे जगाला उपलब्ध करून दिली आहेत, त्यापैकीच एक ज्योतिषशास्त्र होय.


जन्माची लक्षणे पित्याच्या परोक्ष जन्म

अर्थ -- जर जन्मलग्नावर चन्द्राची दृष्टी असेल, तर पित्याच्या परोक्ष ( असमक्ष ) जन्म. सूर्य दशमभावाचे समीप - अलीकडे पलीकडे ( असोन ) चरराशीस असेल, तर पिता विदेशी असतां जन्म होतो.

पितुः परोक्ष

अर्थ -- जन्मलग्नीं शनि असतां किंवा सप्तमभावस्थ मंगळ असतां किंवा बुधशुक्राचे मध्यंतरी चन्द्र सांपडला असेल तर, याचा जन्म पितृपरोक्ष जाणावा.

सर्पाक्रांत जन्म

अर्थ -- चंद्र किंवा लग्न ( पापग्रहांचे ) मंगळाच्या द्रेष्काणी असेल व त्यांच्या द्वितीर्थकादशस्थानी शुभग्रह असतील तर, सर्प किंवा सर्पवेष्टित याचा जन्म होतो.

 

जुळ्यांचा जन्म

अर्थ -- जन्मकाळी लग्न -- मेष, सिंह किंवा वृषभ असून तेथें शनि किंवा मंगळ यांचा योग असतां चालू नवांश ज्या राशीचा, त्याच राशीच्या अंगावयवास ( अध्याय १ ला श्लोक ४ था पहा ) नालाचे वेष्टन असतां जन्म होतो.

 

व्यभिचार जात

अर्थ -- जन्मकाळी जर लग्नालां किंवा चन्द्राला गुरु पहात नाहीं, किंवा सूर्य व चन्द्र एकत्र असून तेथे गुरुची दृष्टी नाहीं किंवा चन्द्राशी पापग्रहाचा योग पुरुषसंगमापासून उत्पन्न झाला असे निश्चयपूर्वक सांगतात.

 

पिता कैदेत असता जन्म

 

अर्थ -- जन्मकाळी सूर्यापासून सप्तम, नवम किंवा पंचम स्थानी दोघे क्रूर ग्रह, कूरक्षेत्रीं असतील तर, सूर्य चर, स्थिर किंवा द्विस्वभाव राशीस असेल त्या अनुक्रमानें विदेशी - स्वदेशी - किंवा मार्गामध्ये -- बालकाचा पिता बंधांत होता असे जाणावें.

नीकेत जन्म ( वैतालिका )

अर्थ -- जन्मकाळी पूर्ण असा चंद्र कर्क राशीस असून बुध लग्नी व चतुर्थस्थानी सौम्यग्रह असतां किंवा लग्न जलचर राशीस असून सप्तमस्थानी चन्द्र असतां नीकेमध्ये जन्म जाणावा.

पाण्यावर जन्म

अर्थ -- जन्मकाळी लग्न व चन्द्र जलराशीस असतां किंवा लग्न जलराशीस असून तेथें पूर्ण चन्द्राची दृष्टि असतां किंवा जलराशिस्थ चन्द्र दशम, चतुर्थ अथवा लग्न वा स्थानी असतां -- तो जन्म पाण्याच्या आश्रयास झालेला असतो यांत शंका नाही.

कैदेत किंवा भुयारांत जन्म ( वैतालिका )

अर्थ -- जन्मकाली लग्न किंवा चंद्र यापासून व्ययस्थानी शनि असून तो दापदृष्ट असेल, तर माता प्रतिबंधांत असतां जन्म, शनि वृश्चिक किंवा कर्कराशीस लग्नीं असून चन्द्रदृष्ट असेल तर भुयारात वगैरे. ( जमिनीच्या अन्तर्भागांत ) जन्म.

 

क्रीडास्थानीं, देवालयांत वगैरे जन्म

अर्थ -- जन्मकाली शनि जलराशीच्या लग्नी असून तेथे अनुक्रमें बुधाची -- सूर्याची -- किंवा चन्द्राची -- दृष्टि असतां, क्रीडामंदिरांत -- देवालयात अथवा नापीक जमिनींत जन्म.

 

जन्मस्थानें

अर्थ -- जन्मकालीं लग्नीं मनुष्य राशीस शनि असतां, तेथें मंगळाची दृष्टि असल्यास स्मशानांत -- चन्द्रशुक्राची दृष्टि असल्यास रम्यस्थानी -- गुरुची दृष्टि असल्यास अग्निहोत्राच्या भूमीत -- सूर्याची दृष्टि असल्यास राजवाडा, देऊळ किंवा गोशाला यामध्ये बुधाची दृष्टी असल्यास शिल्पशाळेंत -- जन्म होतो.

 

जन्मस्थानें ( उपजागत )

अर्थ -- जन्मकाली राशि व त्याचा नवांश, यापैकीं जो बलवत्तर असेल त्याचे राशिशीलाच्या अनुरोधाने, तो चरात्मक असल्यास मार्गात, स्थिरात्मक असल्यास घरांत, वर्गोत्तम असल्यास स्वमंदिरांत, वगैरे ठिकाणीं प्राण्यांचा जन्म असतो.

सामान्य भवितव्य

अर्थ -- जन्मकालीं शनि, मंगळ एक राशींत असतां तेथून चंद्र नवम, पंचम किंवा सप्तम असा असल्यास, बालकास त्याची माता टाकून देईल; पण चंद्रावर बृहस्पतीची दृष्टि असतां त्यांतल्या त्यात तें बालक पुष्कळ दिवस सुखी राहील.

 

सामान्यतः भवितव्य

अर्थ -- जन्मकाली चंद्र पापदृष्ट, असा लग्नी असून मंगळ सप्तम असेल तर, बालकास मातेनें त्यागिल्यामुळें मृत्यु; शनि, मंगळ एकादशस्थ असून लग्नस्थ चन्द्रावर सौम्य ग्रहाची दृष्टि असेल तर, त्या सौम्य ग्रहाच्या शीलाशी सदृश अशा मनुष्याच्या हातीं तें बालक जाईल; तशा चंद्रावर पापग्रहाची दृष्टि असतां परहस्तो बालक गेला तरी आयुष्यहीन जाणावा.

 

जन्मस्थानें ( वसंततिलका )

अर्थ -- प्रसूतकालीं पितृसंज्ञक अगर मातृसंज्ञक इत्यादि ग्रह बलवशात (अ. ४ श्लो, ५ ) मातुलादि किंवा पितृसंबंधीं घरांत जन्म सांगावा. सर्व शुभग्रह नीचस्थ असल्यास झाडाखाली, प्राकारासमीप, पर्वताजवळ इत्यादि जन्म होतो. वरील योग असतां पुनः लग्न व चंद्र एका राशीत असोन त्याजवर सौम्यग्रहांची दृष्टि नसेल तर, जनरहित प्रदेशी जन्म जाणावा.

 

जन्मस्थानें व मातेस अशुभयोग

अर्थ -- जन्मकाली चंद्र -- शनीशीं युक्त किंवा धनीचें नवांशीं किंवा चतुर्थ भवनी जलराशीचे नवांशी किंवा शनीनें दृष्ट असेल -- असा असता अन्धकारांत जन्म. बरेंच ग्रह नीचस्थ असतील तर भूमिशयनीं जन्म, लग्न ज्याप्रमाणें उदय पावलें असेल ( अभिमुख किंवा पाठमोरे ) त्याप्रमाणें गर्भमोक्ष जाणावा. पापग्रह चंद्रापासून चतुर्थ किंवा सप्तम असल्यास तो योग मातेस क्लेशदायक होय.

पृष्ठोदय लग्नें पाठमोरी व शीर्षोदय लग्नें अभिमुख उदय पावतात. तशीच उभयोदय लग्ने अभिमुख व पराङमुख अशा दोन्हीं अंगांनी उदय पावतात.

प्राप्तलक्षणें ( इंद्रवज्रा )

अर्थ -- जन्मकाली चंद्रावरुन तेल, लग्नाप्रमाणें वात, सूर्यस्थित राशि चरस्थिर असेल, त्याप्रमाणें दीप व त्याची दिशा आणि केन्द्रस्थित ग्रहांमध्ये बलिष्ट असेल, त्याचें दिशेस सूतिकांग्रहांचें द्वार सांगावें.

उदाहरण -- पूर्णिमेस चंद्र पूर्ण असतो म्हणून तेलानें दीपपात्र जन्मकाली पूर्ण भरलें होते इत्यादि प्रकार सांगावा.

प्राप्तलक्षणें

अर्थ -- जन्मकाली बलिष्ट ग्रह शनि असल्यास जीर्ण, मंगळ असल्यास जळके. चंद्र असल्यास नवें, सूर्य असल्यास पुष्कळ लाकडांचें पण गैरमजबूत, बुध असल्यास चित्रविचित्र, गुरु असल्यास मजबूत, शुक्र असल्यास रम्य, चित्रविचित्र व नूतन. याप्रमाणें सूतिकाग्रह सांगावें.

त्याच वेळी राशिचक्राची जशी स्थिनि असेल, त्याप्रमाणें कल्पनेंनें सूतिकामंदिराची आसपासची धरें वर्गरे रचना सांगावी.

जन्म मंदिर किती मजल्याचें होतें किंवा त्याची दालनें किती होती, या संबंधानें लघुजातकांत असा उल्लेख आहे -

'' गुरु रुच्चे दशमस्थे द्वित्रिचतुर्भूमिकं करोतिं गृहं ॥

धनुषि सबले न्निशालं द्विशाल मन्येषु विमलेषु ॥१॥''

 

सूतिकास्थान ( वैटालिका )

अर्थ -- जन्मकालीं लग्न किंवा तद्गत नवांश मेष, कर्क, तुला, वृश्चिक व कुंभ यापैकी असल्यास घरांत पूर्व बाजूस धनु, मीन, मिथुन व कन्या यांपैकी असल्यास उत्तर बाजूस, वृषभावर पश्चिमेस, आणि मकर व सिंह असल्यास दक्षिणेंस याप्रमाणें सूतिकागृह सांगावें.

 

शय्यास्थान ( वैतालिका )

अर्थ -- जन्मकालीं मेष व वृषभ लग्नी किंवा नवांशावर सूतिकागृहांत पूर्व भागी, मिथुनावर आग्नेयभागी, कर्क सिंहावर दक्षिण भागी, कन्येवर नैऋत्यभागी, तूला वृश्चिकावर पश्चिम भागी, धनवर वायव्य भागी, मकर कुंभावर उत्तरभागी आणि मीनावर ईशान्यभागी, याप्रमाणें बाळंतिणीची शय्या जाणावी, तृतीय, षष्ठ, नवम व द्वादश, या भावराशीवरुन बाजेचें पाय सांगावें.

उपसूतिका ( अनुष्टप )

अर्थ -- चंद्र व लग्न त्यांच्या दरम्यान जितके ग्रह असतील, तितक्या उपसूतिका ( सुईणी ) सांगाव्या. पैकी दृश्य चक्रार्धात असतील तितक्या सूतिकागहाबाहेर व अदृश्य चक्रर्धात असतील तितक्या सूतिकागृहांत होत्या; पण दुसर्‍या कितीएक आचार्याचें मत यांच्या उलट आहे. ( चक्रार्धातील शुभाशुभ ग्रहानुसार उपसूतिकाचें रुप लक्षण वगैरे जाणावें.

 

स्वरुप ( दोधक )

अर्थ -- जन्मलग्नी नवांश असेल त्याचें स्वामी प्रमाणें अथवा सर्व ग्रहांत जो अधिक बलवान असेल त्याचे स्वरुपाप्रमाणे बालकाची शरीराकृति आणि चन्द्रगत नवांशाच्या स्वामीप्रमाणें वर्ण जाणावा. शिर इत्यादि अवयव राशींच्या ( अ. १ श्लो. १९ ) प्रमाणानें अनुक्रमेकरुन सांगावे.

भावपरत्वे अवयव -- १ मस्तक, २ मुख, ३ ऊर इत्यादि पहिल्या अध्यायांत ४ श्लोकांत सांगितल्याप्रमाणें घ्यावें.

तिलकादिक पाहण्यास देहविभाग

अर्थ -- जन्मकाली जें चक्रार्ध दृश्य असेल तद्गत राशीचें डावे देहार्ध व अदृश्य असेल तद्गत राशीचें उजवे अग जाणावें. लग्न प्रथम धरुन मागे व पुढे ७ राशीच्या अनुक्रमानें द्रेष्काणपरत्वें पुढील अंगे घ्यावीं ती अशी -- १ मस्तक, २ नेत्र, ३ कर्ण, ४ नाक, ५ गाल, ६ हनुवटी, ७ मुख, येणेंप्रमाणें पहिल्या द्रेष्काणी. १ कंठ, २ खांदे, ३ दंड, ४ कुशी, ५ हदय, ६ उदर, ७ नाभि. येणे प्रमाणें दुसर्‍या द्रेष्काणी आणि १ बस्ति ( ओंटी ) २ लिंग व गुह्य, ३ वृषभ ४ मांड्या, ५ गुडघे, ६ पोटर्‍या आणि ७ पावलें. येणेंप्रमाणें तिसर्‍या द्रेंष्काणी तिलकादिकांविषयी अंगविभाग जाणावा.

 

तिलकादि योग

अर्थ -- जन्मकालीं ज्या अंगराशीमध्ये पापग्रह असेल, त्या अवयवास व्रण व शुभ ग्रह असेल त्या अंगावर लांसे, मच्छ, तीळ वगैरे चिन्ह असतें. तो ग्रह स्थिर राशीस, स्थिरनवांशीं, स्वक्षेत्रा, स्वनवांशीं असेल, तर तो व्रण अगर तें चिन्ह जन्मतः असतें; किंवा त्या ग्रहाच्या दशेत उत्पन्न होते.

आगंतुक व्रण उत्पन्न होतात ते शनि असल्यास दगडानें अगर वात व्याधीपासून, मंगळ असल्यास शस्त्र, अग्नि, विष यांपासून; बुध असल्यास जमिनीवर आपटून, भिंत लागून इत्यादि सूर्य असल्यास लांकूड किंवा जनावरापासून चन्द्र -- ( पापग्रह असेल तर ) शिंगानें किंवा जलचर प्राण्यांकडून, याप्रमाणे जाणावें. इतर शुभ ग्रहांचे शुभ फल जाणावें.

व्रणादिकांचीं प्राप्ति

अर्थ -- जन्मकालीं एकाच भवनी बुधाशीं मिळन दुसरें तीन ग्रह असतील तर, ते शुभ असोत कीं अशुभ असोत - आपले शुभाशुभात्मक घटित फळ निश्चयेकरुन ( व्रण, तिलक, चिन्हें इत्यादि ) देतील. षष्टस्थानीं पापग्रह असल्यास तो त्या अवयवावर ( अध्याय १ ला श्लोक ४ प्रमाणे ) व्रण उत्पन्न करील. मात्र त्यावर शुभ ग्रहांची दृष्टि असतां तीळ व ग्रह समागम असल्यास लांसें वगैरे तरीं उत्पन्न करील.

N/A

References : N/A
Last Updated : March 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP