न वस्तव्यं त्वयैवेह मया त्यक्ते महीतले ।
जनोऽधर्मरुचिर्भद्र भविष्यति कलौ युगे ॥५॥
म्यां सांडिलिया महीतळी । प्रबळ बळें वाढेल कळी ।
आजीच तूवां निघिजे तत्काळीं । जंव तो कळी नातळे ॥२६॥
कळी आतळेल जेव्हां । जनीं अधर्मु वाढेल तेव्हां ।
कुविद्येच्या उठती हांवा । सैंघ धांवा निंदेच्या ॥२७॥
न लभे स्वार्थाची कवडी । तरी करिती निंदेच्या कोडी ।
ऐसी कलियुगीं वस्ती कोडी । तूवां अर्ध घडी न रहावें ॥२८॥