मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|सार्थ श्रीएकनाथी भागवत|अध्याय तिसरा|
श्लोक ३९ वा

एकनाथी भागवत - श्लोक ३९ वा

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


अण्डेषु पेशिषु तरुष्वविनिश्चितेषु प्राणो हि जीवमुपधावति तत्र तत्र ।

सन्ने यदिन्द्रियगणेऽहमि च प्रसुप्ते, कूटस्थ आशयमृते तदनुस्मृतिर्नः ॥३९॥

अंडज स्वेदज जारज । चौथें जाण गा उद्भिज ।

त्यांचे ठायीं प्राणु सहज । आत्मयोगें सदा वर्ते ॥७२३॥

प्राणयोगें आत्मा वर्ततां । त्यासी ’जीव’ म्हणती तत्त्वतां ।

त्या प्राणासी न बाधिती देहावस्था । मा जीवाचे माथां त्या कैंच्या ॥७२४॥

देहेंद्रियामाजीं वर्ततां । आत्मा अलिप्त देहावस्था ।

तो कैसा म्हणती आतां । ऐक त्याही दृष्टांता सांगेन ॥७२५॥

आत्मा जागृतिदेहीं वर्ते । तैं सविकार मानिती त्यातें ।

तोचि सांडूनि देहेंद्रियांतें । स्वप्नीं वर्ते पूर्वानुध्यासें ॥७२६॥

देहेंद्रियाविहीन । केवळ ’लिंगदेह’ जाण ।

निजात्मा देखे स्वप्न । जागृत्यभिमानसंकल्पें ॥७२७॥

तें उपरमल्या स्वप्न । देहाभिमान झालिया लीन ।

सर्वविकारविहीन । सुषुप्तिकाळीं पूर्ण परमात्मा उरे ॥७२८॥

देहेंद्रियासीं अभिमान लीन । कोणीही स्फुरेना स्फुरण ।

तरी तें झालें सर्व शून्य । आत्मा चिद्‍घन नाहीं म्हणसी ॥७२९॥

जरी सुषुप्तीसी आत्मा नाहीं । तरी सुखें निजेलों होतों पाहीं ।

हें उपजे ज्याच्या ठायीं । तो सर्वथा नव्हे कहीं शून्य ॥७३०॥

जो मी जागृतीं जागता । तोचि मी स्वप्नातें देखता ।

तोचि मी सुषुप्तीं सुखभोक्ता । एवं तिहीं अवस्था साक्षी जो ॥७३१॥

जो अवस्थात्रयीं साक्षी पूर्ण । तो सर्वथा नव्हे शून्य ।

तोचि परमात्मा परिपूर्ण । शुद्ध चिद्‍घन तो राया ॥७३२॥

सुषुप्तीं ब्रह्मानुभवो आहे । तरी कां पुढतीं संसारु पाहे ।

तेथ अविद्येसीं अहं लीन राहे । यालागीं होये भवभ्रमु ॥७३३॥

ते अविद्या अहंकारेंसीं नाशे । तैं जगद्रूपें ब्रह्मचि भासे ।

जन्ममरणांचा ठावोचि पुसे । जीव समरसे परब्रह्मीं ॥७३४॥

तेथ हेतुमातु दृष्टांत । प्रमाण-प्रमेयविवर्जित ।

परमात्मा सदोदित । परब्रह्म निश्चित परमानंदें ॥७३५॥

तेथ सुखावरी सुख नांदे । आनंदु भोगिजे आनंदें ।

जग दुमदुमी परमानंदें । स्वानंद बोधें संपूर्ण ॥७३६॥

निरसोनियां निजमाया । ऐसा अनुभवो मुनिवर्या ।

कैं हो‍ईल म्हणसी राया । तैं भजावें यदुवर्या निष्कामभावें ॥७३७॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP