मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|सार्थ श्रीएकनाथी भागवत|अध्याय तिसरा|
श्लोक २३ वा

एकनाथी भागवत - श्लोक २३ वा

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


सर्वतो मनसोऽसङगमादौ सङगं च साधुषु ।

दयां मैत्रीं प्रश्रयं च भूतेष्वद्धा यथोचितम् ॥२३॥

सर्वांपासोनि निःसंग । जरी मनीं होणें आहे चांग ।

तैं अवश्य धरावा सत्संग । असत्संग त्यागावा ॥५२॥

मुख्य असत्संग देहसंगती । त्याची समूळ करावी निवृत्ती ।

जगीं दाटुगी सत्संगती । जाण निश्चितीं नृपनाथा ॥५३॥

जेथें दया मैत्री प्रश्रयो पूर्ण । मुख्यत्वें हें त्रिविध लक्षण ।

अवश्य करावें आपण । सत्संग प्रमाण स्वहितासी ॥५४॥

सांडोनियां थोरपण । साधूसी लीन होआवें संपूर्ण ।

सांडोनियां देहाभिमान । त्यासी लोटांगण घालावें ॥५५॥

साधूपरता पूज्य पहा हो । जगीं नाहीं आन देवो ।

संतपूजनें देवाधिदेवो । स्वयमेवो संतुष्टे ॥५६॥

संतपदींचे रजःकण । शिरीं वंदावे श्रद्धेनें पूर्ण

संतांपुढें जाणपण । सर्वथा आपण न मिरवावें ॥५७॥

देखोनि संतसमुदावो । अनन्यगती भगवद्भावो ।

भगवद्भावें नम्र स्वभावो । ’प्रश्रयो’ पहा हो या नांव ॥५८॥;

नम्रता सेवितां संतचरण । येथें भूतदया वाढे पूर्ण ।

हें दयेचें निजलक्षण । सावधान अवधारीं ॥५९॥

भूतांसी कठिणपण । देखतां निघों पाहे प्राण ।

मा स्वयें करील आपण । हें सर्वथा जाण स्वप्नीं न घडे ॥३६०॥

जेणें आपणासी होय दुःख । तें भूतांसी करीना निःशेख ।

जेणें आपणासी होय सुख । तें आवश्यक करी दीना ॥६१॥

सर्व भूतीं दया समान । कदा न बोले कठिणपण ।

भूतांची पीडा निवारण । करोनि आपण सुखोपाय चिंती ॥६२॥

जीवमात्रीं दुरुक्ती बोलतां । जिव्हेच्या घेवों पाहे जीविता ।

भूतीं दुष्टपण चाळितां । समूळ निजचित्ता निर्दाळूं पाहे ॥६३॥

भूतांसी जेथ पीडा पावे । त्यातळीं जीव घालूं धांवे ।

जीवापरीस भूतें सर्वें । दयागौरवें पढियंतीं ॥६४॥

ऐसें जें कारुण्य पूर्ण । त्या नांव ’दया’ संपूर्ण ।;

आतां मैत्रीचें लक्षण । असाधारण तें ऐका ॥६५॥

सर्व भूतांचे ठायीं । सुहृदावांचोनि दुजें नाहीं ।

तरी न करितांचि मैत्री पाहीं । ठायींचे ठायीं अलोलिक ॥६६॥

जे विषयवियोगें न विटे । नाना विकल्पीं न तुटे ।

आलिया परम संकटें । ’मैत्री’ नेटेंपाटें सदा ग्राह्य ॥६७॥

या नांव गा मित्रभावो । प्राण गेलिया न तुटे पहा हो ।

देखतां कल्पांतकाळघावो । निजमित्रसमुदावो एकवटे कीं ॥६८॥

ऐसी आचरतां निजस्थिती । श्रद्धा उपजे सर्वाम भूतीं ।

त्या श्रद्धेची व्युत्पत्ती । यथानिगुती सांगेन ॥६९॥

नवल श्रद्धेचें लक्षण । ब्रह्मा मुंगी समसमान ।

तरी यथोचित विधान । सर्वथा जाण चुकेना ॥३७०॥

अर्घ्यपाद्यादि पूजन । सकळ दान आणि सन्मान ।

हे श्रद्धा ब्राह्मणीं संपूर्ण । एकासी तें जाण अन्नमात्रचि ॥७१॥

एका अन्न आच्छादन । एकासी ते कोरडे कण ।

तृण आणि जीवन । एका पयःपान यथोचित ॥७२॥

जेणें ज्यासी सुख संपूर्ण । तें तें करी उचित श्रद्धें जाण ।

अनुचित श्रद्धेचें विंदाण । दुःखकारी संपूर्ण सर्वार्थीं ॥७३॥

जेवीं ब्राह्मणा वाढिलें तृण । गाईस वाढिलें मिष्टान्न ।

श्वानासी बैसणें सिंहासन । साधूसी आसन थारोळा ॥७४॥

व्याघ्रासी पडिल्या लंघन । त्यासि अर्पूं नये गोदान ।

गाय गादल्या संपूर्ण । तैलाभ्यंजन करुं नये ॥७५॥

हो कां देह-इंद्रियें जरी एकें । तरी जिव्हाकर्म नव्हे नाकें ।

तेवीं एक भूतात्मा भूतवेखें । उचितोन्मुखें यजावा ॥७६॥

करितां यथोचित अर्पण । जरी क्रिया दिसे भिन्न भिन्न ।

तरी अंतरश्रद्धा अभिन्न । हें मुख्य लक्षण भागवतधर्मी ॥७७॥;

भूतीं भूतात्मा अभिन्नस्थिती । दया मैत्री साधूंची भक्ती ।

हेच आतुडे कैशा रीतीं । प्रबुद्ध तदर्थी उपाव सांगे ॥७८॥

तेचि नव श्लोकीं श्लोकोक्ती । समूळ भागवतधर्मस्थिती ।

प्रबुद्ध सांगे रायाप्रती । साधकां निजप्राप्ती साधावया ॥७९॥;

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP