मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|सार्थ श्रीएकनाथी भागवत|अध्याय तिसरा|
श्लोक ११ वा

एकनाथी भागवत - श्लोक ११ वा

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


सांवर्तको मेघगणो वर्षति स्म शतं समाः ।

धाराभिर्हस्तिहस्ताभिर्लीयते सलिले विराटू ॥११॥

स्वर्ग आणि पाताळतळा । कवळूनि उठिल्या अग्निज्वाळा ।

तंव प्रळयकर्त्या मेघमाळ । क्षोभल्या त्या काळा अतिदुर्धरा ॥६५॥

म्हणाल तेथ मोठमोठे । वर्षों लागले थेंबुटे ।

तैसें नव्हे गा कडकडाटें । एकी धार सुटे अनिवार ॥६६॥

इतर पर्जन्याच्या धारा । त्या तैशा नव्हती नृपवरा ।

ऐक प्रमाणाच्या निर्धारा । तो समयो महावीरा अतिदुस्तर ॥६७॥

जैसी कां मदगजाची सोंड । तैशा धारा अतिप्रचंड ।

शत वर्षेंवरी अखंड । पर्जन्य वितंड पैं वर्षे ॥६८॥

विजु निजतेजें नभ जाळी । कडकडाटे दे आरोळी ।

काळाची बैसे दांतखिळी । ऐसा प्रलयकाळीं मेघ खवळे ॥६९॥

तेणेंउलथलें जळ सैंघ । जेथोनि वर्षत होते मेघ ।

त्यांतेंही विरवूनि सांग । जळमय चांग त्रैलोक्य झालें ॥१७०॥

अनिवार वर्षतां वेग । जेथें मेघांचेंही विरे अंग ।

या नांव ’सांवर्तक’ मेघ । अतिअमोघ वर्षावो ॥७१॥

तीर्थ क्षेत्र पवित्रोदक । सरिता समुद्र झाले एक ।

हारपले चंद्रसूर्यादिक । तिनी लोक बुडाले ॥७२॥

ऐशिया एकार्णवाचे ठायीं । विराट विराला गा पाहीं ।

साकार उरे ऐसें कांहीं । उरलें नाहीं नृपनाथा ॥७३॥;

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP