मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|सार्थ श्रीएकनाथी भागवत|अध्याय दुसरा|
श्लोक ४३ वा

एकनाथी भागवत - श्लोक ४३ वा

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


इत्यच्युताङिंघ्र भजतोऽनुवृत्त्या भक्तिर्विरक्तिभगवत्प्रबोधः ।

भवन्ति वै भागवतस्य राजंस्ततः परां शान्तिमुपैति साक्षात् ॥४३॥

यापरी अनन्य भक्ती । जे सर्वदा सर्वभूतीं करिती ।

ते भक्ती-विरक्ती-भगवत्प्राप्ती । सहजें पावती अनायासें ॥१९॥

राया हरिभक्तिदिव्यांजन । तें लेऊनि भक्त सज्जन ।

साधिती भगवन्निधान । निजभजनमहायोगें ॥६२०॥

करितां ऐक्यभावें निजभक्ती । उत्कृष्ट उपजे पूर्ण शांती ।

तेणें होये असतांची निवृत्ती । भक्तां ’पूर्णप्राप्ति’ परमानंदें ॥२१॥

यालागीं धन्य भगवद्भक्त । इंद्रियीं वर्ततां विषयीं विरक्त ।

देहीं असोनि देहातीत । नित्यमुक्त हरिभजनें ॥२२॥

भावें करितां भगवद्भक्ती । भक्त मुक्तीही न वांछिती ।

तरी त्यांपाशीं चारी मुक्ती । दास्य करिती सर्वदा ॥२३॥

हा भागवतांचा निजमहिमा । अनुपम नाहीं उपमा ।

भावें भजोनि पुरुषोत्तमा । परमात्मगरिमा पावले ॥२४॥;

अगाध भगवंताची भक्ती । भक्तांची उत्कृष्ट प्राप्ती ।

ऐकतां विदेहचक्रवर्ती । आश्चर्यें चित्तीं चमत्कारला ॥२५॥

म्हणे धन्य धन्य भगवद्भजन । हरिखें कवीस लोटांगण ।

घालितां चालिलें स्फुंदन । रोमांचित नयन अश्रुपूर्ण जाहले ॥२६॥

आनंदस्वेदें कांपत । नावेक राहिला तटस्थ ।

सवेंचि जाहला सावचित्त । म्हणे झणीं महंत न पुसतां जाती ॥२७॥

ऐशिया अतिकाकुलतीं । नेत्र उघडोनि पाहे नृपती ।

बैसली देखोनि मुनिपंक्ती । अतिशयें चित्तीं सुखावला ॥२८॥

तेणें संतोषें डोलत । म्हणे ’पूर्णप्राप्त’ भगवद्भक्त ।

जगीं कैसे कैसे विचरत । तीं चिन्हें समस्त पुसों पाहों ॥२९॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP