मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|सार्थ श्रीएकनाथी भागवत|अध्याय दुसरा|
श्लोक २७ वा

एकनाथी भागवत - श्लोक २७ वा

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


तान्‍रोचमानान्स्वरुचा ब्रह्मपुत्रोपमान्नव ।

पप्रच्छ परमप्रीतः प्रश्रयावनतो नृपः ॥२७॥

निजांगींच्या निजप्रभा । अंगासी आणिली शोभा ।

काय ब्रह्मविद्येचा गाभा । शोभे नवप्रभा शोभायमान ॥६॥

निजहृदयींचें ब्रह्मज्ञान । परिपाकें प्रकाशलें पूर्ण ।

तेंचि निजांगा मंडण । इतर भूषण त्यां नाहीं ॥७॥

मुगुट कुंडलें कंकण । मूर्खाअंगीं बाणलीं पूर्ण ।

ते शोभा लोपूनि मूर्खपण । बाहेर संपूर्ण प्रकाशे ॥८॥

तैसे नव्हती हे ज्ञानघन । ब्रह्मपूर्णत्वें विराजमान ।

तेंचि त्यांसी निजांगा मंडण । इतर भूषण त्यां नाहीं ॥९॥

ब्रह्मानुभवें पूर्णत्व पूर्ण । इंद्रियद्वारा विराजमान ।

तें त्यांसी निजशांतिभूषण । मुगुट कंकण तें तुच्छ ॥२१०॥

मागां वाखाणिले सनकादिक । त्यांसमान कीं अधिक ।

ऐसा विचारितां परिपाक । त्यां यां वेगळीक दिसेना ॥११॥

त्यांची यांची एक गती । त्यांची यांची एक स्थिती ।

त्यांची यांची एक शांती । भेदु निश्चितीं असेना ॥१२॥

त्यांच्याऐसे हे सखे बंधु । त्यांच्याऐसा समान बोधु ।

त्यांच्याऐसा हा अनुवादु । सर्वथा भेदु असेना ॥१३॥

ते चौघे हे नव जण । अवघ्यां एकचि ब्रह्मज्ञान ।

त्यांची यांची शांती समान । हें विदेहासी पूर्ण कळूं सरलें ॥१४॥;

ऐसें परिपूर्णत्व जाणोनी । राजा सुखावे स्थिति देखोनी ।

मग अतिविनीत होऊनी । मृदु मंजुळ वचनीं विनवीत ॥१५॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP