मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|सार्थ श्रीएकनाथी भागवत|अध्याय दुसरा|
श्लोक ३४ वा

एकनाथी भागवत - श्लोक ३४ वा

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


ये वै भगवता प्रोक्ता उपाया ह्यात्मलब्धये ।

अञ्जः पुंसमविदुषां विद्धि भागवतान् हि तान् ॥३४॥

न करितां वेदशास्त्रव्युत्पत्ती । ऐशिया अज्ञानां निजात्मप्राप्ती ।

सुगम जोडे ब्रह्मस्थिती । यालागीं हरिभक्ती प्रकाशिली देवें ॥११॥

न करितां वेदशास्त्रपठण । जड मूढ म्हणाल तरले कोण ।

उन्मत्तगजेंद्रउद्धरण । गर्भसंरक्षण परीक्षितीचें ॥१२॥

अंबरीषगर्भनिवारण । करावया भक्तीच कारण ।

’अहं भक्तपराधीनः’ । स्वमुखें नारायण बोलिला ॥१३॥

वनचर वानर नेणों किती । उद्धरले भगवद्भक्तीं ।

अस्वलें तारावया निश्चितीं । विवरीं जांबवती भक्तीस्तव वरिली ॥१४॥

जाण पां अविवेकी केवळ । गौळी गोधनें गोपाळ ।

तेही उद्धरिले सकळ । श्रीकृष्णसखे प्रबळ अनन्यप्रीतीं ॥१५॥

शास्त्रविरुद्ध अविवेकस्थिती । जारभावें श्रीकृष्णप्रीती ।

गोपी उद्धरिल्या नेणों किती । अनन्यभक्तिसख्यत्वें ॥१६॥

न करितां नाना व्युत्पत्ती । सुगमोपायें ब्रह्मप्राप्ती ।

अबळें तरावया निश्चितीं । भगवंतें निजभक्ति प्रगट केली ॥१७॥;

तें हें राया भागवत जाण । मुख्यत्वें भक्तिप्रधान ।

भावें करितां भगद्भजन । अज्ञान जन उद्धरती ॥१८॥

हें भागवत नव्हे नव्हे । अज्ञानालागीं निजपव्हे ।

भवाब्धि तरावया भजनभावें । महानाव देवें निर्माण केली ॥१९॥

भागवताचे महानावे । जे रिघाले भजनभावें ।

त्यांसी भवभयाचे हेलावे । भजनस्वभावें न लागती ॥३२०॥

स्त्रीशूद्रादि आघवे । घालूनियां ये नावे ।

एकेच खेपे स्वयें न्यावे । भजनभावें परतीरा ॥२१॥

जे आवलितां भावबळें । तोडी कर्माकर्मक्रूरजळें ।

स्वबोधाचेनि पाणीढाळें । काढिती एक वेळे निजात्मतीरा ॥२२॥

वैराग्याचे निजनावाडे । अढळ बसले चहूंकडे ।

विषयांचे आदळ रोकडे । चुकवूनि धडपुडे काढिती कांठा ॥२३॥

संचितक्रियमाणांच्या लाटा । मोडोनि लाविती नीट वाटा ।

वेंचूनि प्रारब्धाचा सांठा । निजात्मतटा काढिती ॥२४॥

तेथ गुरुवचन साचोकारें । सांभाळीत उणेंपुरें ।

भूतदयेचेनि दोरें । निजनिर्धारें वोढिती ॥२५॥

तंव एकाएकीं एकसरीं । काढिली परात्परतीरीं ।

तंव प्रत्यावृत्ती येरझारी । आत्मसाक्षात्कारीं खुंटली ॥२६॥

येथ धरिला पुरे भावो । तैं बुडणेंचि होय वावो ।

मग टाकावो जो ठावो । तो स्वयमेवो आपण होय ॥२७॥

येथ पव्हणयावीण तरणें । प्रयासेंवीण प्राप्ति घेणें ।

सुखोपायें ब्रह्म पावणें । यालागीं नारायणें प्रकाशिली भक्ती ॥२८॥

भागवतधर्माचिये स्थिती । बाळीं भोळीं भवाब्धि तरती ।

सुखोपायें ब्रह्मप्राप्ती । तेचि श्लोकार्थी विशद सांगे ॥२९॥;

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP