मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|बालसाहित्य|बाल गीते|संग्रह १|
धाड् धाड् खाड् खाड् च...

बालगीत - धाड् धाड् खाड् खाड् च...

आकाश अंगण होऊन येतं व ढगातले उंट, ससे, मोर यांचा खेळ रंगतो आणि या काव्यकथा मुलांना भावतात.


धाड् धाड् खाड् खाड्

चाले माझी रेलगाडी

झपाटयाने मागे जाती

रानेवने खेडीपाडी ॥

वेग आता मंदावला

आला डोंगराचा घाट

शीळ घुमे पहाडात

शिरे बोगदयात वाट ॥

काळोख हा चहूकडे

नका कोणी भिऊ पण

गाडी धावे धिटाईने

शांत रहा सारेजण ॥

सरे बोगदयाची वाट

गाडी उजेडात येई

दिसे दर्‍यांतील पुन्हा

जंगलाची हिरवाई ॥

धपाधपा चाले गाडी

रेलतळ आता आला

सिग्नलाचा लाल हात

हवे इथे थांबायाला ॥

याच गावी जायचे ना ?

गाडी लागे फलाटास

झाला नाही कोणास ना

प्रवासाचा काही त्रास ॥

सावकाश उतरावे

नका करु घाई फार

पुन्हा भेटू केव्हा तरी

नमस्कार नमस्कार ॥

N/A

References :

कवी - कुसुमाग्रज

Last Updated : December 26, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP