मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|बालसाहित्य|बाल गीते|संग्रह १|
टप टप टप काय बाहेर व...

बालगीत - टप टप टप काय बाहेर व...

बालगीत हे लहान मुलांचे शब्दभांडार समृद्ध करण्यासाठी रचलेले गद्य अथवा पद्यात्मक काव्य होय.

Balgeet is a traditional or composed song or poem taught to children for development of vocabulary.


टप टप टप काय बाहेर वाजतंय्‌ ते पाहू

चल्‌ ग आई, चल्‌ ग आई, पावसात जाऊ !

भिरभिरभिर अंगणात बघ वारे नाचतात !

गरगरगर त्यासंगे, चल गिरक्या घेऊ !

आकाशी गडगडते म्हातारी का दळते ?

गडाड्‍गुडुम गडाड्‍गुडुम ऐकत ते राहू !

ह्या गारा आल्या सटासटा आल्या चल चटाचटा

पट्‌ पट्‌ पट्‌ वेचुनिया ओंजळीत घेऊ !

फेर गुंगुनी धरू, भोवऱ्यापरी फिरू

"ये पावसा, घे पैसा", गीत गोड गाऊ !

पहा फुले, लता, तरू - चिमणी, गाय, वासरू

चिंब भिजती, मीच तरी का, घरात राहू ?

गीत - श्रीनिवास खारकर

N/A

References : http://aathavanitli-gani.com/
Last Updated : January 17, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP