बडबडगीत - ’ मराठीचा’ तास येतो व...

मुलांना शब्दांचा अर्थ कळ्ण्यापूर्वीच बडबडगीतांच्या स्वरांची भाषा समजू लागते.


वर्गाची गंमत

’मराठीचा’ तास येतो

वर्ग खूश होतो

हसर्‍या मुखाने त्याला -

डोक्यावर घेतो.

’इंग्रजीचा’ तास येतो.

वर्ग चिंताक्रांत

बसे स्तब्ध, कपाळाला

लावुनीया हात

’हिंदी’ तासाची वर्गाला

कधी नाही सजा

क्या कहूँ मैं, क्या है उसकी -

छोटी बडी मजा

’गणिताचा’ तास येतो

आणि थक्क होतो

सारा वर्ग भरलेला

चक्क झोपी जातो !

Translation - भाषांतर
N/A

References :

कवी - मा. गो. काटकर

Last Updated : 2018-01-17T19:11:49.0770000