बडबडगीत - तांदूळ घ्या हो पसा पसा , ...
मुलांना शब्दांचा अर्थ कळ्ण्यापूर्वीच बडबडगीतांच्या स्वरांची भाषा समजू लागते.
तांदूळ घ्या हो पसा पसा,
धुऊन टाका खसा खसा
भात शिजेल रटा रटा,
खाऊन टाका मटामटा ॥
पीठ चाळा सरासरा,
कणीक भिजवा भराभरा
लाटया करा गरागरा,
पुर्या लाटा सरासरा
तळून काढा पटापटा,
खाऊन टाका मटामटा ॥
मटकी घ्या भिजत टाका,
दुसर्या दिवशी उपसून टाका
मटकीला येतील मोडच मोड,
उसळ लागेल गोडच गोड
वास सुटेल घम् घम् ,
खायला लागेल चम्चम् ॥
N/A
References : N/A
Last Updated : January 17, 2018

TOP