मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|बालसाहित्य|बडबड गीते|
डोंगर पोखरुन उंदीर निघाला...

बडबडगीत - डोंगर पोखरुन उंदीर निघाला...

मुलांना शब्दांचा अर्थ कळ्ण्यापूर्वीच बडबडगीतांच्या स्वरांची भाषा समजू लागते.


डोंगर पोखरुन उंदीर निघाला

मिशा फेंदारुन मांजराला म्हणाला,

"दगड पचवून मला आली मस्ती

आहेस का तयार खेळायला कुस्ती ?"

उंदराचे तसले बोलणे ऐकून

बिचारे मांजर गेले टरकून

उंदराची स्वारी हसतच सुटली

तेवढयात मांजराने तिथून धूम ठोकली.

मांजर धावत दूर दूर गेले

जिथे डोंगर नाहीत तिथे जाऊन राहिले !

N/A

References :

कवी - मा. गो. काटकर

Last Updated : January 17, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP