लाडू लाडू लाडवांचा कोट
खाऊन गणोबाचे गोल झाले पोट
चिवडा चिवडा चिवडयाचा घास
घेताना चिंतोबाला लागली ढास
करंज्या करंज्या करंज्याच बघुनी
रंगोबाच्या तोंडाला सुटले पाणी
कडबोळी कडबोळी कडबोळ्यांच्या ठसका
लागताच सदोबाने घेतला त्यांचा धसका
जिलेबी जिलेबी जिलेब्यांचे ताट
पाहून राघोबाजी बसले ताठ
चकल्या चकल्या चकल्यांचा थाट
चकल्यांनी पाडले पांडोबाचे दात
अनारसे अनारसे अनारशांची रास
अंतोबाने फस्त केली. अंतोबा, शाबास !