बडबड गीत - ह्त्ती आणि मुंग...
बडबड गीत
ह्त्ती आणि मुंगी त्यांची झाली मैत्री
खाऊ लागले दोघे छान छान संत्री
माऊ आणि चिऊ करतात गडबड
दोघे मग खाती लाल लाल कलिंगड
कासव आणि बदक करतात कुजबूज
म्हणून तर खातात गोड गोड टरबूज
उंदराची मांजराला खोटी खोटी साक्ष
हळू हळू खातात हिरवी हिरवी द्राक्ष
कोण कोण खातंय कांहीच न कळे
एकमेका देऊन कशी खाती पहा फळे
- दिलीप खापरे
N/A
N/A
Last Updated : January 17, 2018

TOP