बडबड गीत - चाळणी म्हणे गाळणीला मी त...
बडबड गीत
चाळणी म्हणे गाळणीला
मी तर तुझी मोठी बहीण
गाळणी म्हणे चाळणीला
आणि मी लहान बहीण
चाळणी म्हणे चाळू का पीठ
गाळणी म्हणे चाल कि नीट
गाळणी म्हणे गाळू का चहा
चालणी म्हणे सांडतोय पहा
भांडता भांडता भांडण विसरले
आईने त्यांना कपाटात ठेवले
- दिलीप खापरे
N/A
N/A
Last Updated : January 17, 2018

TOP