उंट व त्याचा मालक

इसापने रचलेल्या गोष्टी केवळ उपदेशपर नसून अत्यंत रंजक आहेत.

Many stories included in Aesop's Fables, are distinguished by its own special characteristics and moral.


उंट व त्याचा मालक

एका माणसाने आपल्या उंटाच्या पाठीवर ओझे लादून त्याला विचारले, 'काय रे, तुला डोंगरावरून चढून जाणं योग्य वाटतं की उतरून जाणं योग्य वाटतं ?' उंटाने सरळ उत्तर न देता पर्यायाने आपल्या मालकाला उलट विचारले, 'महाराज मैदानातून जाण्याचा रस्ता बंद झाला की काय ?'

तात्पर्य - राजमार्ग सोडून मुद्दाम वाकड्या वाटेने जाण्याची काही लोकांना सवय असते.

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2008-01-11T19:58:31.5270000