एका हरणाच्या पाठीमागे पारध्याचे कुत्रे लागले. तेव्हा ते भयाने पळत सुटले व शेवटी एका गुहेत शिरले. तेथे एक सिंह होता. त्याने लगेच त्याच्यावर झडप घातली व त्याचा जीव घेतला. प्राण सोडतेवेळी हरीण म्हणाले, 'देवा रे देवा, किती मी दुर्दैवी. पारधी आणि त्याचे दुष्ट कुत्रे यांच्या तावडीतून सुटण्यासाठी मी या गुहेत शिरलो, तोच अत्यंत क्रूर अशा सिंहाच्या हाती सापडलो !
तात्पर्य - विधिलिखित हे कधीही टाळता येत नाही.