मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी संत साहित्य|संत निळोबांचे अभंग|आपल्या स्थितीसंबंधानें जनाशीं उद्गार| ८६१ ते ८७० आपल्या स्थितीसंबंधानें जनाशीं उद्गार ७४८ ते ७६० ७६१ ते ७७० ७७१ ते ७८० ७८१ ते ७९० ७९१ ते ८०० ८०१ ते ८१० ८११ ते ८२० ८२१ ते ८३० ८३१ ते ८४० ८४१ ते ८५० ८५१ ते ८६० ८६१ ते ८७० ८७१ ते ८७४ उद्गार - ८६१ ते ८७० निळोबा महाराजांनी बाराशेच्यावर अभंग लिहीले आहेत. सर्व अभंगांतून त्यांनी विठ्ठल भक्ती गायलेली आहे. निळोबा महाराज विठोबाप्रमाणेच कृष्णाची भक्ती करीत. निळोबारायांनी श्रीकृष्ण चरित्र अतिशय उत्तम प्रकारे रचले आहे.Sant Niloba Maharaj wrote more than 1200 Abhanga in praise of Vitthala. Sant Niloba was a devotee of Vitthala. Niloba Maharaj composed Krishna character in his abhangs in very devotional manner. Tags : abhanggaulannilobasantअभंगगौळणनिळोबासंत ८६१ ते ८७० Translation - भाषांतर ८६१नेदी करुं काज काम । स्मरवि नाम आपुलें ॥१॥मागें पुढें उभाचि असे । लाविलें पिसें श्रीरगें ॥२॥खातां जेवितां जवळिच रोहे । परताचि नोहे काय करुं ॥३॥निळा म्हणे घातलि मिठी । आपणासाठीं मज केलीं ॥४॥८६२रुप देखतांचि लोचनीं । राहिलें तें ध्यानीं मनीं ॥१॥माझिया जिवाचें जीवन । विठ्ठल नामाचें मोहन ॥२॥चित्त विगुंतलें पायीं । देहभावहि नुरोचि देहीं ॥३॥निळा म्हणे जीवप्राण् । तेथेंचि राहिला इ जडोन ॥४॥८६३माझिये मनीचा फिटला बेहो । देखताचि नाहो रुक्मीणीचा ॥१॥कळिकाळ ते काय बापुडें रंक । होऊनि मशक ठेलें पुढें ॥२॥कामक्रोधां कैंची उरी । दोषां महामारी हो सरली ॥३॥निळा म्हणे नि:संदेहो । देहीं देंहो हारपला ॥४॥८६४नेणों काय पुर्वार्जित । होतें सुकृत निक्षेपिचें ॥१॥तेंणें हातीं धरोनियां । संती ठाया पावविलों ॥२॥विटेवरी दाविलें धन । होते पोटाळुन महर्षी ज्या ॥३॥निळा म्हणे बैसला ध्यानीं । ज्याचिये चिंतनी सदाशिव ॥४॥८६५अवगुणीं देखिलें । म्हणोनियां उपेक्षिलें ॥१॥माझें वोढवलें कर्म । करी आळी नेणें धर्म ॥२॥तेणेंचि नेणों संतापली । क्षोमें करुणा हारविली ॥३॥निळा म्हणे नये । मोहें पाळावया माय ॥४॥८६६सुफळ जिणें हरिच्या भजनें । चुकलीं पतनें यमजाच ॥१॥नित्य करितां हरिकीर्तन । गातां गुण निजआवडी ॥२॥घडतां संतसमागम । हरीचें प्रेम दुणावलें ॥३॥निळा म्हणे साधिली वेळ । सकळाही मंगळ मंगळाची ॥४॥८६७ब्रम्हानंदे गर्जे वाणी । हरिच्या गुणीं मातली ॥१॥आंवरिताही नावरती । पूरचि लोटति अक्षरांचे ॥२॥अवतारचरित्रें जन्मकर्मे । क्रीडा संभ्रमें केलीं ते ॥३॥निळा म्हणे घडघडाट । चालती लोट नावरती ॥४॥८६८माझा बोल खरा चाल खरा । मती विस्तारा फांकविली ॥१॥विठ्ठल देवें केली कृपा । दाविला सोपा निज पंथ ॥२॥यावें जावें पंढरपुरा । आपुल्या माहेरा वस्तिसी ॥३॥निळा म्हणे घातली सुती । माझिये हातीं कृपाघनें ॥४॥८६९संती केला अंगिकार । मज हा निर्धार बाणला ॥१॥त्यांचिया बोलें अभयदानें । नि:शंक वचनें हीं ऐशीं ॥२॥नाहीं कोठें गोंवागुंती । अक्षरें चालती गुंफिलीं ॥३॥निळा म्हणे सत्यासाठी । जाणती चावटी माझी ते ॥४॥८७०संतकृपावरदबळें । माझीं वचनामृतफळें ॥१॥स्वीकारिजे पंढरीनाथें । बैसोनियां सादर चितें ॥२॥म्हणती गोड हे तुझी वाणी । सद्गुरुकृपेचीं बोलणीं ॥३॥निळा म्हणे श्रोते संत । प्रसन्नपणें दत्तचित्त ॥४॥ N/A References : N/A Last Updated : August 23, 2026 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP