मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी संत साहित्य|संत निळोबांचे अभंग|आपल्या स्थितीसंबंधानें जनाशीं उद्गार| ८०१ ते ८१० आपल्या स्थितीसंबंधानें जनाशीं उद्गार ७४८ ते ७६० ७६१ ते ७७० ७७१ ते ७८० ७८१ ते ७९० ७९१ ते ८०० ८०१ ते ८१० ८११ ते ८२० ८२१ ते ८३० ८३१ ते ८४० ८४१ ते ८५० ८५१ ते ८६० ८६१ ते ८७० ८७१ ते ८७४ उद्गार - ८०१ ते ८१० निळोबा महाराजांनी बाराशेच्यावर अभंग लिहीले आहेत. सर्व अभंगांतून त्यांनी विठ्ठल भक्ती गायलेली आहे. निळोबा महाराज विठोबाप्रमाणेच कृष्णाची भक्ती करीत. निळोबारायांनी श्रीकृष्ण चरित्र अतिशय उत्तम प्रकारे रचले आहे.Sant Niloba Maharaj wrote more than 1200 Abhanga in praise of Vitthala. Sant Niloba was a devotee of Vitthala. Niloba Maharaj composed Krishna character in his abhangs in very devotional manner. Tags : abhanggaulannilobasantअभंगगौळणनिळोबासंत ८०१ ते ८१० Translation - भाषांतर ८०१नाहीं लौकिकाशीं काज । माझें गुज तो जाणें ॥१॥अंतर्बाह्य ठावें तयां । येईल बाह्य पसरुनी ॥२॥हाचि निश्चय माझा मनीं । विश्वास वचनीं संतांच्या ॥३॥निळा म्हणे निर्भय चित्तें । भेटी त्यातें पाचारी ॥४॥८०२निजध्यास लागला मनीं । हाचि चिंतनीं दिवसरात्रीं ॥१॥न सुटेचि करुं कैसें । लाविलें पिसें गोवळें ॥२॥येऊनि जाऊनि पुढेंचि उभा । लाविलें भांवा मन माझें ॥३॥निळा म्हणे नवचें दुरि । भरला शरीरीं न सुटेचि ॥४॥८०३नीत नवा प्रेमा कृपेचिया बळें । अंतरीं हा वोळे आनंदघन ॥१॥नाचतीं मयूरें रोमांचीत दाटी । अमृताची वृष्टी जीवनकळा ॥२॥आकाशें दुमदुमी गर्जे अनुहत । सुनीळ तळपत विदयुल्लता ॥३॥पिकली भूमिका बीज आलें फळा । अव्दय निजकळा सवंगिलें ॥४॥भाग्यवंत निळा सांठवी निराळीं । आत्मया जवळी निकटवासें ॥५॥८०४नुठेचि मन वरुनियां । जडोनी ठेलें हरीच्या पायां ॥१॥बुध्दि निश्येंसी राहिली । परम विश्रांति पावली ॥२॥डोळे न धाती पाहतां । चरणीं विगुंतले तत्वतां ॥३॥निळा म्हणे न पुरे धणी । करीन जीवें बोवाळणी ॥४॥८०५नुरवूनि दुसरें आतां ठेलों चरणीं । नित्यानंद भोगीतुंचि दिनरजनीं ॥१॥आळवूनि वाचें याचीं उत्तम नामें । सारिन काळ याचिपरि सुखसंभ्रमें ॥२॥धरुनियां रुप दृष्टीं हदयभुवनीं । सांठवीन आपुलिया मनाचे मननीं ॥३॥निळा म्हणे जन्मोनियां केली हे जोडी । विठोबाचि सेवा नित्य नविये आवडी ॥४॥८०६नेघों आम्ही कदा भुक्ति आणि मुक्ति । हरिनामीं विश्रांति सर्व जोडे ॥१॥काय कराव्या त्या रिध्दी आणि सिध्दी । वाउग्या उपाधी भजना गोंवा ॥२॥नलभे आम्हां कांही मान्यता बहुमान । जेणें अभिमान खवळे अंगीं ॥३॥निळा म्हणे दुरी दुरावूं जाणीव । नलगे शहाणीव नाडील ते ॥४॥८०७नेटकेंचि दैव उघडलें आजीं । तो हा मजमाजीं संचरला ॥१॥आतां कैसें करुं मी यासी । नावरेंचि मनासी आवरितां ॥२॥सुदिन घटका सांपडली होती । ते पडिली अवचितीं हातीं याचे ॥३॥निळा म्हणे मी मज माझें । हिरोनियां वोझें नेलें सकळ ॥४॥८०८पडतांचि तें वचन कानीं । धरिती मनीं अत्यादरें ॥१॥सुकृताचीं उत्तम फळें । आलीं एक वेळे ओढवोनि ॥२॥सुखीं सांठवलें सुख । हरिखा हरिख भेटला ॥३॥निळा म्हणे कल्प कोटी । पडली गांठीं हरीसवें ॥४॥८०९पायीं लीन होता निळा । दिधला कळा प्रेमाची ॥१॥निववूनियां केला सुखी । ठेउनी मुखीं निज नाम ॥२॥माउलीची ऐशी जाती । बालकां प्रीति समजावी ॥३॥निळा म्हणे कृपावंत । साक्षभूत अंतरींची ॥४॥८१०पुरातन मी शरणांगत । आहे स्थापित सद्गुरुचा ॥१॥म्हणोनि संत पाळिती मातें । देउनी भातें प्रेमरस ॥२॥जेउनी उरला प्रसाद देती । निकट बैसविती जवळिकें ॥३॥निळा म्हणे क्षणक्षणां । देती स्मरणा श्रीहरिच्या ॥४॥ N/A References : N/A Last Updated : August 23, 2026 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP