मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी संत साहित्य|संत निळोबांचे अभंग|आपल्या स्थितीसंबंधानें जनाशीं उद्गार| ८५१ ते ८६० आपल्या स्थितीसंबंधानें जनाशीं उद्गार ७४८ ते ७६० ७६१ ते ७७० ७७१ ते ७८० ७८१ ते ७९० ७९१ ते ८०० ८०१ ते ८१० ८११ ते ८२० ८२१ ते ८३० ८३१ ते ८४० ८४१ ते ८५० ८५१ ते ८६० ८६१ ते ८७० ८७१ ते ८७४ उद्गार - ८५१ ते ८६० निळोबा महाराजांनी बाराशेच्यावर अभंग लिहीले आहेत. सर्व अभंगांतून त्यांनी विठ्ठल भक्ती गायलेली आहे. निळोबा महाराज विठोबाप्रमाणेच कृष्णाची भक्ती करीत. निळोबारायांनी श्रीकृष्ण चरित्र अतिशय उत्तम प्रकारे रचले आहे.Sant Niloba Maharaj wrote more than 1200 Abhanga in praise of Vitthala. Sant Niloba was a devotee of Vitthala. Niloba Maharaj composed Krishna character in his abhangs in very devotional manner. Tags : abhanggaulannilobasantअभंगगौळणनिळोबासंत ८५१ ते ८६० Translation - भाषांतर N/A८५१आठवला तो माझिये मनीं । कटीं कर दोन्ही वसविता ॥१॥न गमे दिवस न गमे राती । लागते खंती फुटे ॥२॥जीवही होतो कासावीस । कैं तें रुप देखेन ॥३॥निळा म्हणे भेटवा आतां । ठेवितों माथ चरणवरीं ॥४॥८५२आठवितां याचे पाय । गेलें निरसोनि संसारभय ॥१॥अवघा काळ अवघी वेळ । स्मरणें याचिया सुमंगळ ॥२॥सदैव आम्हीं भूमंडळीं । पढो हरिच्या नामावळी ॥३॥निळा म्हणे यावरी आतां । नेणों जन्ममरणचिंता ॥४॥८५३आठवितां नामें सुखची संतुष्टी । लाभें लाभ कोटी सुकृताचा ॥१॥म्हणऊनि हाचि घेऊनियां छंद । गातुसे गोविंद विठ्ठल हरी ॥२॥ज्याचिया व्दैतबाध । अवघाचि उपाध माया भ्रांती ॥३॥निळा म्हणे नित्य वैष्णवां साधन । हेंचि अनुसभान दिवसराती ॥४॥८५४आम्ही स्वामीचिया बळें । येथें असों खेळेमेळें ॥१॥नामें गाऊनी आवडी । करुं पदांच्या घडामोडी ॥२॥करुन कीर्तन सोहळा । रंजवूं नारीनरबाळां ॥३॥निळा म्हणे दिवसराती । केव्हां नेणों येती जाती ॥४॥८५५आतींचें आर्त होतें माझया मनीं । बहुत दिवस नयनीं प्रकाशलें तें ॥१॥भरोनियां कोदंली चौदाहि भुवनें । सुतेज केलीं गगनें याचेनि तेजें ॥२॥आवडीचें निज प्रकाशलें गुज । आतां नाचेन भोज येणें छंदें ॥३॥निळा म्हणे दिशा व्यापूनियां मही । प्रकाश माझया देहीं संचरला तो ॥४॥Hinduism८५६आर्त माझें पूर्ण झालें । यांची पाउलें देखतां ॥१॥आतां कोठें न धांवे मन । राहिलें होऊन अचंचळ ॥२॥याविण कांहीं नलगे जोडी । पुरली आवडी विषयाची ॥३॥निळा म्हणे ध्यानीं मनीं । राहो चिंतनी हेंचि रुप ॥४॥८५७वदविली आरुषवाणी । वैदिक पुराणीं मिश्रित ॥१॥म्हणोनियां संतसज्जन । करिती श्रवण बैसोनी ॥२॥अर्थ तात्पर्याचे घेती । आणि डोलविती मस्तक ॥३॥निळा म्हणे ऐसें केलें । मज या विठठलें दयाघनें ॥४॥८५८होतें पूर्वार्जित । उत्तम संग्रहीं संचित ॥१॥तेंचि उत्तीर्णत्वालागीं । झालें सन्मुख ये प्रसंगीं ॥२॥भोग मोक्ष फळें । निवारलीं शांतिबळें ॥३॥निळा म्हणे सहजचि आला । ओघ अमृताचा हा जिव्हाळा ॥४॥८५९होवोनियां निश्चळ । स्थिर राहिलों अढळ ॥१॥नाहीं भय शंका मनीं । विश्वास मानियला वचनीं ॥२॥ज्याचें तया पुढें । बोलेन वेडेही वांकडें ॥३॥निळा म्हणे देवें । वदविलें तें वदेन भावें ॥४॥८६०उपाधीचा उबग आला । मनिं आवडला सत्संग ॥१॥तयासी देवेंचि कृपा केली । भ्रांति निरसली बुध्दीची ॥२॥कल्पनेचा पुसला ठाव । देहभाव हारपला ॥३॥निळा म्हणे निरभिमान । झालें उन्मन मनाचें ॥४॥ N/A References : N/A Last Updated : August 23, 2026 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP