मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी संत साहित्य|संत निळोबांचे अभंग|आपल्या स्थितीसंबंधानें जनाशीं उद्गार| ७८१ ते ७९० आपल्या स्थितीसंबंधानें जनाशीं उद्गार ७४८ ते ७६० ७६१ ते ७७० ७७१ ते ७८० ७८१ ते ७९० ७९१ ते ८०० ८०१ ते ८१० ८११ ते ८२० ८२१ ते ८३० ८३१ ते ८४० ८४१ ते ८५० ८५१ ते ८६० ८६१ ते ८७० ८७१ ते ८७४ उद्गार - ७८१ ते ७९० निळोबा महाराजांनी बाराशेच्यावर अभंग लिहीले आहेत. सर्व अभंगांतून त्यांनी विठ्ठल भक्ती गायलेली आहे. निळोबा महाराज विठोबाप्रमाणेच कृष्णाची भक्ती करीत. निळोबारायांनी श्रीकृष्ण चरित्र अतिशय उत्तम प्रकारे रचले आहे.Sant Niloba Maharaj wrote more than 1200 Abhanga in praise of Vitthala. Sant Niloba was a devotee of Vitthala. Niloba Maharaj composed Krishna character in his abhangs in very devotional manner. Tags : abhanggaulannilobasantअभंगगौळणनिळोबासंत ७८१ ते ७९० Translation - भाषांतर ७८१जयाचेनि कृपामृतें । पोखें माझें जीवन भातें ॥१॥कैसा विसरों मी यासी । एकानेक नाहीं ज्यासी ॥२॥नेणोनियां आपपर । केला माझा अंगिकार ॥३॥निळा म्हणे शिकवा बोल । बोली बोलणें सुढाळ ॥४॥७८२जाणीवचि माझी गिळूनि ठेला । नेणीवेतें प्याला निपटूनियां ॥१॥निढळवाणें मज करुनि ठेविलें । जीवाचेंही हरिलें जीवपण ॥२॥ज्ञानासी तो हा वाढोचि नेदी । ग्रासिल्या उपाधी परमार्थिका ॥३॥निळा म्हणे येणें नेलें आपपर । मोडियेली थार दोहिंकडे ॥४॥७८३जाणोनियां मनींचा हेत । केलें सनाथ मजलागीं ॥१॥कृपावंत संत सद्गुरु । भवार्णव तारुं मजलागी ॥२॥बोलविली आरुषवाणी । श्रीहरिच्या गुणीं आपुलिये ॥३॥निळा म्हणे नवलचि केलें । अंकिता गौरविलें निज अंकीं ॥४॥७८४जिवाचाही जीव माझया शिवाचा शिव । पंढरीचा देव मन बुध्दी इंद्रियें ॥१॥आईका हो श्रोते तुम्ही संत सज्जन । मी माझें हें जतन कोण करी यावरी ॥२॥नयनाचेंही नयन माझया घ्राण । श्रवणाचेंहि श्रवण तोचि रसनेची रसना ॥३॥त्वचेचीही त्वचा माझे वाचेची वाचा । बोलविसी बोलचा तोची अर्थ तात्पर्य ॥४॥कराचेहि कर माझा चरणचे चरण । चैतन्याचें चैतन तोचि रसनेची रसना ॥५॥त्वचेचीही त्वचा माझे वाचेची वाचा । बाकलविसी बोलचा तोची अर्थ तात्पर्य ॥६॥कराचेहि कर माझया चरणाचे चरण् । चैतन्याचें चैतन्य तोचि मनांचे मन ॥७॥निळा म्हणे भुक्ति मुक्ति विरक्ति ज्ञान । शांति क्षमा दया तोचि सिध्दी साधन ॥८॥७८५जीवभाव ठेवूं पायीं । तरी तो काय लटिकाचि ॥१॥याचिलागीं लिगटलों । पायीं जडलों न ढळेसा ॥२॥जेथें संतचरणरज । पडती सहज मी तेथें ॥३॥निळा म्हणे याविण आतां । न दिसे अर्पितां उत्तीर्णपणा ॥४॥७८६जेणें माझी वाचस्पती । आपुल्या कृपें केली सरती ॥१॥त्याचें उत्तीर्ण होउं म्हणतां । जीवा जीवपण नुमसे आतां ॥२॥अवघेंचि त्यांचे घेणें देणें । मी हें माझें कांहीचि नेणें ॥३॥निळा म्हणे ठेविलों ऐसा । जाळींचा बुदबुद जळींचि जैसा ॥४॥७८७जेणें छत्र सिंव्हासन । दिधलें आसन त्रिणाचें त्या ॥१॥काय उर्त्तीण होईजे रंकें । तेंचि म्यां मशकें संतचरणा ॥२॥ज्याचिया कृपें ब्रम्हानंद । पावलों अगाध अक्षयी तो ॥३॥निळा म्हणे साम्राज्यें लेणें । लेवविलें ईक्षणें कृपेचिया ॥४॥७८८ज्याचा आहे त्या अभिमान । मी तों रंक अनाथ दीन ॥१॥नजगे देणें हा परिहार । होईल सत्याचा आदर ॥२॥जेणें केलेसेल पुढारें । त्याचे तया उणें पुरें ॥३॥निळा म्हणे मी मापारी । उभा धणी शिरावरीं ॥४॥७८९झालें डोळियां पारणें । इंद्रियांही पुरलेपणें ॥१॥विठो देखतांचि दिठीं । जिवीं जिवा पडली मिठी ॥२॥बुध्दिनिश्चयाचें घर । तेहि झाली तदाकार ॥३॥निळा म्हणे काया वाचा । मना संकल्प हा तयाचा ॥४॥७९०डोळियाचाही डोळा बुध्दी । माझी उघडूनियां कृपानिधी । देखणी करुनियां त्रिशुध्द । निजात्मपदीं स्थापिली ॥१॥तेणें दिसती ठायां ठावो । हदय सकळांचेही भाव । संत दावी जे अनुभव । आणखीही सर्व मायाकृत ॥२॥नवल कृपेची हें जाती । फिटली मोह ममता भ्रांती । उत्पत्ति स्थिती प्रळय होती । तें तें निगुती आटलें ॥३॥देखणें झालें नयनानयन । देखती आपुलेंही वर्तन । राहिलें ठायींच ते जडोन । अभेद होऊन देखती ॥४॥निळा स्वामी सद्गुरुनाथा । देखणा तूंचि मी नाहीं आतां । तोडूनी मी हे माझी ममता । आपण आतौता मेळविलों ॥५॥ N/A References : N/A Last Updated : August 23, 2026 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP