मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी संत साहित्य|संत निळोबांचे अभंग|आपल्या स्थितीसंबंधानें जनाशीं उद्गार| ८२१ ते ८३० आपल्या स्थितीसंबंधानें जनाशीं उद्गार ७४८ ते ७६० ७६१ ते ७७० ७७१ ते ७८० ७८१ ते ७९० ७९१ ते ८०० ८०१ ते ८१० ८११ ते ८२० ८२१ ते ८३० ८३१ ते ८४० ८४१ ते ८५० ८५१ ते ८६० ८६१ ते ८७० ८७१ ते ८७४ उद्गार - ८२१ ते ८३० निळोबा महाराजांनी बाराशेच्यावर अभंग लिहीले आहेत. सर्व अभंगांतून त्यांनी विठ्ठल भक्ती गायलेली आहे. निळोबा महाराज विठोबाप्रमाणेच कृष्णाची भक्ती करीत. निळोबारायांनी श्रीकृष्ण चरित्र अतिशय उत्तम प्रकारे रचले आहे.Sant Niloba Maharaj wrote more than 1200 Abhanga in praise of Vitthala. Sant Niloba was a devotee of Vitthala. Niloba Maharaj composed Krishna character in his abhangs in very devotional manner. Tags : abhanggaulannilobasantअभंगगौळणनिळोबासंत ८२१ ते ८३० Translation - भाषांतर ८२१वाउग्या खटपटा । नावडती तैशा चेष्टा ॥१॥जेणें पांवे भ्रंश बुध्दी । न पावती स्वरुपसिध्दि ॥२॥घालिती घालणी । काय करुं ते बोलणीं ॥३॥निळा म्हणे मिथ्यावाद । काय करावे ते छंद ॥४॥८२२वाचे बोलविलें देवें । मज हें काय होतें ठावें ॥१॥सहज नामें आळवितां । ओघ आला हा अवचिता ॥२॥संत जाणती अंतर । कीं हा रखुमाईचा वर ॥३॥निळा म्हणे पुसिलि गोठी । नये सांगतां तें गोमटी ॥४॥८२३वाचा वेधलां हरिकीर्तनीं । श्रवण श्रवणीं गोडावले ॥१॥नेत्रीं बैसलें हरीचें रुप । पूजनीं पडप उभय करां ॥२॥प्रदक्षणें सोकलें चरण । आष्टांग आलिगंन नमस्कारा ॥३॥निळा म्हणे हेंचि कोड । अवघिया चाड विठठलीं ॥४॥८२४वेडा नव्हे मुका चतुर शहाणा । बोले अबोलणा मौनावस्था ॥१॥विष्णुदासा निळा वाचा विदेहता । अंगी सप्रेमता आवडीची ॥२॥ह्रदयीं चतुर्भुज मेघशाम मूर्ती । मुखीं नामकीर्ति ब्रीदावळी ॥३॥नेणता म्हणोनि संत आपंगिला । निळा निरविला पांडुरंगा ॥४॥८२५व्यापूनियां ठायां ठावो । अवघाचि देवो प्रगटला ॥१॥संतकृपा फळा आली । ते वरुषली स्वानंदें ॥२॥अंकुरली भावबीजें । विस्तारलीं सहजें गुणचर्या ॥३॥निळा म्हणे कणिसें दाटे । नाहीं फलकट कणभारें ॥४॥८२६सत्यासाठीं माझी चाली । संती केली आज्ञा ते ॥१॥विठ्ठल विठ्ठल म्हणों मुखें । वाणूं सुखें गुण त्याचे ॥२॥काय आम्हां दासा चिंता । धणी पुरवितां शिरावरीं ॥३॥निळा म्हणे निश्चतीनें । असों वचनें एकाचिया ॥४॥८२७सर्वकाळ तेंचि वाटे । रुप पहावें गोमटें ॥१॥जें कां पुंडलिकाचे व्दारी । उभें ठेलें विटेवरी ॥२॥पितांबराचें परीधान । मुगुट कुंडले विराजमान ॥३॥निळा म्हणे कौस्तुभ गळां । नाना पुष्पें तुळसीमाळा ॥४॥८२८सदाचा हा धाला सदाचा भुकेला । सदाचा निजेला जागा सदा ॥१॥ऐसिये परिचा अंबुला साजणी । वरिला सुवासिणी सदाचि मी ॥२॥सदाचा बोलिका सदाचा हा मुका । सदाचा हा लटिका खरा सदां ॥३॥सदाचा हा वेडा सदाचा हा कुडा । सदाचा हा निर्भिडा भीड सदा ॥४॥सदाचा हा दाता सदाचा मागता । सदाचा हा रिता भरला सदा ॥५॥निळा म्हणे सदा जवळी ना हा दुरी । सदा सर्वांतरीं नसोनि वसे ॥६॥८२९सहजचि होतों उभा । संत सेवेचिया लोभा ॥१॥तंव काढिला निक्षेप । हातीं दिला तो अमूप ॥२॥नाहीचिं अंत जया । किती माप लाऊं तया ॥३॥निळा म्हणे दिवसरातीं । न पुरे करितां गणती ॥४॥८३०सांपडली वाट । आम्हां वैकुंठाची नीट ॥१॥सहज वचनीं विश्वसतां । संतसंगती लांगता ॥२॥वारलें दुर्घट । होतें भ्रांतीचें कचाट ॥३॥निळा म्हणे सुखी । झालों पूर्विली ओळखी ॥४॥ N/A References : N/A Last Updated : August 23, 2026 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP