प्राणवहस्त्रोतस् - उपवास शोष

धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चतुर्विध पुरूषार्थांच्या प्राप्तीकरितां आरोग्य हे अत्यंत आवश्यक असते.


तत्र पुनर्वातलाहारसेविनोऽतिव्यायामव्यवायाध्ययनभयशोक
ध्यानरात्रिजागरणपिपासाक्षुत्कषायाल्पाशनप्रभृतिभिरुपशो-
षितो रसधातु: शरीरमनुक्रामन्नल्पत्वान्न प्रीणाति, तस्मादति-
कार्श्य भवति; सोऽतिकृश: क्षुत्पिपसाशीतोष्णवातवर्ष -
मारादानेष्वसहिष्णुर्वातरोगप्रायोऽल्पप्राणश्च क्रियासु भवति,
श्वासकाशोषप्लीहोदराग्निसादगुल्मरस्त्रपित्तानामन्यतममासाद्य
मरणमुपयाति ।
सू.सु. १५-३३, पान ७४

घट्टते सहते शब्दं नोच्चैर्द्रवति शूल्यते ।
हृदयं ताम्यति स्वल्पचेष्टस्यापि रसक्षये ॥
च.सू. १७-६४, पान २१७

शूलारत्याध्मानगुदप्रकोपज्वराड्गसादश्रममोहतृष्णा: ॥
शय्यासनस्त्रीविषयेष्वभक्तिर्भवन्ति रुपाण्यपतर्पितस्य ।
का.सं, पान २०३

पर्वभेदोऽड्गमर्दश्च कास: शोषो मुखस्य च ।
क्षुत्प्रणाशोऽरुचिस्तृष्णा दौर्बल्य श्रोत्रनेत्रयो: ॥
मनस: संभ्रमोऽभीक्ष्णमूर्ध्ववातस्तमो हृदि ।
देहाग्निबलनाशश्च लड्वनेऽतिकृते भवेत् ॥
च.सू. २२-३६, ३७, पान २५४-५५

ज्याला शारीरिक वा मानसिक श्रमाचीं कामें करावी लागतात अशा मनुष्यानें पुरेसा स्निग्ध, बृंहण आहार न घेणें, अगदीं थोडें खाणें; आहारामध्यें रुक्ष, लघु, वातकर अशीं द्रव्यें अधिक असणें, वरचेवर उपवास करणें असा मिथ्याचार केल्यास रसधातु क्षीण होऊन उपवासशोष उप्तन्न होतो. या व्याधीमध्यें रोगी कृश होतो. त्याच्या शारीरिक व मानसिक क्रियेंत अशक्तपणा येतो. तहान, भूक, शीत, उष्ण, श्रम या गोष्टी मुळींच सहन होत नाहींत. श्वास, कास, शब्दासहत्व, हृदय धडधडणें, शरीर कापणें, थकवा येणें, तृष्णा, अंगसाद्‍, थोडयाशा श्रमानेंहि हृदयामध्यें वेदना अशीं लक्षणें असतात. चरक व काश्यप यांनीं सांगितलेलीं अपतर्पित वा अतिलंघित यांचीं लक्षणें उपवास शोषांत समाविष्ट करण्यासारखीं आहेत सांधे दुखणें, अंग ठणकणें, शूल, मुखशोष, भूक न लागणें, अरुचि, ऊर्ध्ववात (हिक्का, कर्णस्वन, जृंभा, उद्गारबाहुल्य), अंधारी येणें, आध्मान, गुदवेदना, ज्वर, झोप न येणें, मैथुनेच्छा नसणें, अस्वस्थता हीं लक्षणें उपवासशोषी व्यक्तीमध्यें असूं शकतात. सुश्रुतानें उपवास शोष असा व्याधि शोषाचे प्रकार व संख्या सांगत असतांना उल्लेखिलेला असला तरी त्याचीं व्याधिलक्षणें प्रत्यक्षपणें सांगितलेलीं नाहींत. टीकाकारानें केलेल्या सूचनेप्रमाणें `दोषधातुमलक्षयविज्ञानीय' या सुश्रुत सूत्रस्थान अध्याय १५ मधील वर्णनाप्रमाणें उपवास शोष व्याधीचें विवेचन केलें आहे. माधवादि ग्रंथांनीं उपवास शोष असा प्रकारच सांगितलेला नाहीं.

चिकित्सासंदर्भानें लक्षणें
हृद्रोग, पाण्डु, ग्रहणीं, प्लीहा वृद्धि, छर्दि, अतिसार, शूल, मूढवात, (वंगसेन राजयक्ष्मा ६६ पृ. २३२)
स्वरभेद, श्वास, गुल्म, अर्श, छर्दि, कंठरोग (वंगसेन राजयक्ष्मा ७९ पृ. २३३)
अपस्मार, ज्वर, उन्माद, (वंगसेन,
ऊर्ध्वजत्रुगत विकार, उन्माद, अर्श भगंदर, उरुस्तंभ, हनुग्रह (वंगसेन राजयक्ष्मा ७३ पृ.२३२
दाह, कण्डु, विस्फोट, शिरोरोग, नेत्रदाह, (यो.र. राजयक्ष्मा पृ. ३२५)
ग्रहणी, पाण्डु, गुल्म, उदर (यो.र. राजयक्ष्मा पृ. ३२७)

वृद्धिस्थान क्षय
त्रिरुपाचा षड्‍रुप, षड्‍रुपाचा एकादशरुप होणें किंवा आठ प्रकारचे वर्णिलेले जे शोष त्यांना संपूर्णलक्षणता येणें, ज्वर तीव्रवेगी व सतत टिकून रहाणें; कास, रक्तप्रवृत्ति यांचें प्रमाण वाढणें, बलमांस परिक्षय होणें ही यक्ष्म्याच्या वृद्धिची अवस्था समजावी. यक्ष्मा हा व्याधि चिरकारी असल्यानें लक्षणें आहेत त्याच स्थितींत दीर्घकाळ टिकून रहातात. कित्येक वेळां एकादशरुपांपैकीं निरनिराळीं रुपें आलटून पालटून होत असतात. भूक लागणें, वजन वाढणें, ज्वर अगदीं मंदावणें, कास नष्ट होणें हीं लक्षणें राजयक्ष्मा व्याधि क्षीण होत असल्याची आहेत. शरीर पुष्ट होणें, वजन वाढणें, ज्वर वेग मुळींच नसणें, बल वाढणें, हीं लक्षणें दीर्घकालपर्यंत प्रत्ययास येत राहिली म्हणजे मग राजयक्ष्मा बरा झाला असें समजावें.

परं दिनसहस्त्रं तु यदि जीवति मानव: ।
सुभिषग्भिरुपक्रान्तस्तरुण: शोषपीडित: ॥
यो.र. राजयक्ष्मा, पान ३१३

एक हजार दिवस-साधारणपणें ३ वर्षेपर्यन्त - राजयक्ष्मा पीडित रुग्णाची स्थिती चांगली राहिली, योग्य रीतीचे उपचार तो घेत राहिला, कोणतीहि लक्षणें प्रादुर्भूत झाली नाहींत म्हणजे तो पूर्णपणें बरा झाला असें समजावें.

उपद्रव
तेषामुपद्रवान् विद्यात्कण्ठोद्‍ध्वंसमुरोरुजम् ॥
जृम्भाड्गमर्दनिष्ठीववह्निसादास्यपूतिता: ।
वा.नि. ५-१५, पान ४७८

कंठोध्वंस, उर:शूल, अंगमर्द, कफनिष्ठीवन, अग्निमांद्य, मुखदुर्गंधी किंवा मुखावाटें पूयसदृश कफप्रवृत्ति असे राजयक्ष्म्याचे उपद्रव आहेत. राजयक्ष्म्यामध्यें उत्पन्न होणारीं लक्षणें विविध प्रकारचीं असून तीं सर्व उपद्रव सदृशच आहेत. विशेषत: श्वास, उन्माद, मूर्च्छा, अपस्मार, गुल्म, मूत्रकृच्छ्र, अतिसार असे उपद्रव होतात. असाध्य लक्षणांतील उल्लेखावरुन शोथ, उदर, अतिसार, मूत्रकृच्छ्र हे उपद्रव राजयक्ष्म्यांत होतात असें म्हणतां येते.

उदर्क
कार्श्य, अग्निमांद्य, उर:शूल, श्रमासहत्व.

साध्यासाध्यविवेक
एकादशभिरेभिर्वा षड्‍भिर्वाऽपि समन्वितम् ।
कासातीसारपार्श्वार्तिस्वरभेदारुचिज्वरै: ॥
त्रिभिर्वा पीडितं लिड्गै: कासश्वासासृगामयै: ।
जह्याच्छोषार्दितं जन्तुमिच्छन् सुविमलं यश: ॥
सवैंरर्धैस्त्रिभिर्वाऽपि लिड्गैर्मासबलक्षये ।
युक्तो वर्ज्यश्चिकिस्त्यस्तु सर्वरुपोऽप्यतोऽन्यथा ॥
महाशनं क्षीयमाणमतीसारनिपीडितम् ।
शूनमुष्कोदरं चैव यक्ष्मिणं परिवर्जयेत् ।
शुक्लाक्षमन्नद्वेष्टारमूर्ध्वश्वासनिपीडितम् ।
कृच्छ्रेण बहुमेहन्तं यक्ष्मा हन्तीह मानवम् ॥
मा.नि. राजयक्ष्मा, ८ ते १२ पान १२८

ज्वरानुबन्धरहितं बलवन्तं क्रियासहम् ।
उपक्रमेदात्मवन्तं दीप्ताग्निमकृशं नरम् ॥
मा.नि. राजयक्ष्मा १३, पान १२८

आ.-बहुरुपो राजयक्ष्माऽसाध्यस्तमाह -एकादशभिरिति ।
एतैरिति स्वरभेदोऽनिलाच्छूलमित्यादिकैरेकादशभि: ।
षड‍भिर्वापीति भक्तद्वेषोज्वर इत्यादिभि: षड‍भि:, अपि
शब्दात् त्रिभिर्वा अंसपार्श्वाभितापश्च्येत्यादिकै:, समन्वितं
जह्यात् त्यजेत् । शोषान्वितं पुरुषं यक्ष्मिणमिति शेष: ।
वशिमांसबलक्षये सतीति बोध्यम् ॥
असाध्यलक्षणमाह-सर्वैरिति सर्वै: एकदशभि: ।
ननु, सर्वाणि रुपाण्येकादश, एकादशानामर्ध सार्धपञ्च
भवन्ति, तत्र कतमरुपस्यार्धत्वं किंभूतं वा भवति ?
उच्यते एकस्य रुपस्यार्धासंभवे षट्‍पञ्चरुपयोरर्धयोरुत्कृष्टत्वात्
षड्‍रुपमात्रार्धो ग्राह्य: ।
एतैलिड्गैर्मासबलक्षयैर्युक्तो वर्ज्य इति संबन्ध: ।
मामंसबलयो: क्षयलिड्गानि सुश्रुतेनोक्तानि । तद्यथा -
मांसक्षयेऽस्थिगण्डोपस्थोरुवक्ष: कक्षापिण्डिकोदरग्रीवाशुष्कता
रुक्षता सादो गात्राणां धमनीशैथिल्यं च'' इति । बलं ओज: ।
``मूर्च्छो मांसक्षयो मोह: प्रलापोऽज्ञानमेव च ।
पूर्वोक्तानि च लिड्गानि मरणं च बलक्षये'' - इति ।
अपरे मांसबलाक्षये इति पठन्ति, तत्र मांसबलक्षये सतीति योज्यम् ।
अतोऽन्यथेति मांसबलक्षयेऽसतीति । एतेन बलमांसाग्नियुक्त:
प्रत्याख्येय चिकित्स्य: सर्वरुपोऽपि ।
अपरमसाध्यलक्षणमाह - महाशनमिति । -
महाशनं बह्वशनमपि क्षीयमाणं मांसबलाभ्यां क्षीणमरिष्टत्वात् ।
अतीसारनिपीडितं अतीसारयुक्तम् ।
उक्तं च ``मलायत्तं बलं पुंसां शुक्रायत्तं तु जीवितम् ।
तस्माद्यत्नेन संरक्षेद्यक्ष्मिणो मलरेतसी'' इति; शूनमुष्को-
दरं शोफयुक्तमुष्क उदरं च यस्त्य तं; मुष्कशोथस्य
विरेकसाध्यत्वेन विरुद्धोपक्रमत्वात् ।
महाशनं क्षीयमाणमित्येकमसाध्यलक्षणं, अतीसारनिपीडितमिति
द्वीतीयं, शूनमुष्कोदरमिति तृतीयम् ।
अपरमपि वर्ज्यमाह - शुक्लाक्षमित्यादि ।
कृच्छ्रेण बहुमेहन्तमिति कष्टेन बहुतरं मेहन्तं `मलं' इति शेष: ।
एतेनाहारस्य मलभाव: कथित: । यस्य चातिशयो मलो निष्पद्यते
तस्य मांसक्षयो भवति स पुनरसाध्य: स्यात् ।
इत्थंभूतं नरं शुक्लाक्षत्वाद्युपद्रवसहितं यक्ष्मा हन्तीति संबन्ध: ।
इहेत्यस्मिन् शास्त्रे । शुक्लाक्षत्वादय एकैकशौऽप्यसाध्यलक्षणानि
बोद्धव्यानि ।
म.नि. राजयक्ष्मा, ८ ते १२ आ. टीका, पान १२९

ज्या रुग्णामध्यें ज्वरानुबंध नाहीं (ज्वर अल्प वा मुक्तानुबंधी आहे, सतत टिकून रहात नाहीं), रोग्याचें बल चांगलें आहे, रोगी योग्य ते उपचार घेतो आहे, अग्नि त्यांतल्यात्यांत चांगला आहे, रुग्णाचें शरीर विशेषसें कृश झालें नाहीं, प्रकृतीला सर्व प्रकारचे उपचार सोसतात; असें असेल त्यावेळीं रोगी साध्य असतो. ह्या गोष्टी उण्या असतील त्या प्रमाणांत राजयक्ष्मा कष्टसाध्य वा असाध्य होतो. राजयक्ष्म्याचीं सांगितलेलीं लक्षणें अत्यल्पप्रमाणांत असलीं तरे राजयक्ष्मा साध्य असतो असें योगरत्नाकरानें म्हटलें आहे.

किंचिल्लिंगयुतं साध्यलक्षणम् ।
यो.र. राजयक्ष्मा पृ. ३१४

षड्‍रुप, एकादशरुप राजयक्ष्म्यासह कास, अतिसार, पार्श्वशूल, स्वरभेद, अरुचि आणि ज्वर हीं लक्षणें असतील तर व्याधि असाध्य होतो. कास, श्वास आणि रक्तप्रवृत्ति या लक्षणांची तीव्रता असल्यास राजयक्ष्मा असाध्य होतो. राजयक्ष्म्यांतील लक्षणें संख्येनें कितीहि कमी असली तरी मांस आणि बल यांची अतिशय क्षीणता असल्यास राजयक्ष्मा असाध्य असतो. उलत बलमांस परिक्षय नसल्यास एकादशरुप राजयक्ष्माहि बरा होण्याची शक्यता असतें. पुष्कळ आहार घेत असून रोगी क्षीण होत जाणें हें असाध्यतेचें लक्षण आहे. अतिसार वा वृषणशोथ वा उदरशोथ या लक्षणांनीं पीडित रुग असाध्य होतो. डोळे अत्यंत पांढरे होणें, अन्नद्वेष होणें, ऊर्ध्वश्वास लागणें, वरचेवर पण अत्यंत कष्टानें मूत्रप्रवृत्ति होणें या लक्षणांनीं युक्त रोगी जगत नाहीं.

रिष्ट लक्षणें
यक्ष्मा पार्श्वरुजानाहरक्तच्छर्द्यसतापिनम् ।
वा.शा. ५-७७, पान ४२५

पार्श्वशूल, आनाह, रक्तच्छर्दी, असंताप, हीं लक्षणें मारक असतात. असाध्य लक्षणांत उल्लेखिलेली ऊर्ध्वश्वास, मूत्रकृच्छ्र हीं लक्षणेंहि रिष्ट लक्षणेंच होत.

चिकित्सा सूत्र
तस्मात् पुरीषं संरक्ष्यं विशेषाद्राजयक्ष्मिण: ।
सर्वधातुक्षयार्तस्य बलं तस्य हि विड्‍बलम् ॥
च.चि. ८-४२, पान १०७३

मलायत्तं बलं पुंसां शुक्रायत्तं तु जीवितम् ।
तस्माद्यत्नेन संरक्षेद्यक्ष्मिणो मलरेतसी ॥
यो.र. राजयक्ष्मा, पान ३१३

राजयक्ष्म्यामध्यें इतर धातूंचें पोषण नीटसें होत नाहीं. त्यामुळें शरीराला स्थिरता देणार्‍या पुरीषाचें शोधन होणार नाहीं अशी दक्षता घ्यावी. सर्वधातूंचें सारभूत, ओजाचा आधार, जीवनीय असें जें शुक्र त्याचेंहि रक्षण करावें.

बलिनो बहुदोषस्य स्निग्धस्विन्नस्य शोधनम् ।
ऊर्ध्वायो यक्ष्मिण: कुर्यात्सस्नेहं यन्न कर्शनम् ॥
वा.चि. ५-१, पान ६०९

दोषाधिकानां वमनं शस्यते सविरेचनम् ।
स्नेहस्वेदोपपन्नानां सस्नेहं यन्न कर्शनम् ॥
शोषी मुञ्चति गात्राणि पुरीषसंस्नसनादपि ।
अबलापेक्षिणीं मात्रां किं पुनर्यो विरिच्यते ॥
च.चि. ८-८७; ८८, पान १०७९

रोगी बलवान असेल, दोष प्रभूत व उत्क्लिष्ट असतील तरे स्नेहस्वेदपूर्वक सौम्य स्वरुपाचें वमन विरेचन हे शोधनोपचार करावेत. त्यानें थकवा होणार नाहीं अशी काळजी घ्यावी. रोगी कृश, दुर्बल असेल तर शोधनोपचार मुळींच करुं नयेत.

शुद्धकोष्ठस्य युञ्जीत विधिं बृंहणदीपनम् ॥
हृद्यानि चान्नपानानि वातघ्नानि लघूनि च ।
वा.चि.५-४, पान ६०९

कोष्ठशुद्धी झाल्यानंतर बृंहणीय, दीपनीय, हृद्य, वातघ्न व लघु अशीं आहार द्रव्यें वापरावीत.

व्यवायशोषिणं क्षीररसमांसाज्यभोजनै: ।
मुकुलैर्मधुरैर्गन्धैर्जीवनीयैरुपाचरेत् ॥
रो.र. राजयक्ष्मा पान ३१४

व्यवाय शोषी मनुष्याला दूध मांसरस तूप यांनीं युक्त असें भोजन द्यावें. सुगंधीं फुलें व जीवनीय गणांतील द्रव्यें वापरावींत.

दीपनैर्लघुमिश्चान्नै: शोकशोषमुपाचरेत् ॥
हर्षणाश्वासनै: क्षीरै: स्ग्धैर्मधुरशीतलै: ।
यो.र. राजयक्ष्मा, पान ३१४

शोकशोषी रोग्यास आनंद होईल, धीर येईल असें करावें. दीपन व लघु गुणाचीं आहार द्रव्यें वापरावींत. स्निग्ध, मधुर, शीतगुणात्मक अशीं औषधें व दूध यांचा उपयोग करावा. जराशोषासाठीं रसायन प्रयोग करावा. लघु, दीपन, बृंहण असे उपचार करावेत.

व्यायामशोषिणं स्निग्धै: क्षतक्षयहितैर्हिमै: ।
उपचारैर्जीवनीयैर्विधिना श्लेष्मिकेण तु ॥
यो.र. राजयक्ष्मा पान ३१४

व्यायामशोषी मनुष्यास स्निग्ध, शीत, जीवनीय, कफाचा उपचय करणारे असे उपचार करावेत.

आस्यासुखैर्दिवास्वप्नशीतैर्मधुरबृंहणै: ।
तक्रमांसरसाहारैरध्वशोषिणमाचरेत् ॥
वंगसेन, राजयक्ष्मा २७, पान २२९

अध्वशोषी मनुष्यास फारशी हालचाल करुं न देतां नेहमीं सुखकारक आसनावर बसून राहण्यास सांगावें. दिवसाहि झोंप घ्यावी. मधुर, शीत, बृंहण द्रव्यें वापरावींत. ताक व मांसरस यांचा उपयोग करावा.

व्रणशोषं जयेत्स्निग्धैदापनै: स्वादुशीतलै: ।
ईषदम्लैरनम्लैर्वा यूषमांसरसादिभि: ॥
वंगसेन, राजयक्ष्मा २८, पान २२९

व्रणशोषी रुग्णास स्निग्ध, दीपन, मधुर, शीत, किंचित् अम्ल अशा यूष रसादींनीं उपचार करावेत.

यद्यत् संतर्पणं शीतमविदाहि हितं लघु ।
अन्नपानं निषेव्यं तत्क्षतक्षीणै: सुखार्थिभि: ॥
यच्चोक्तं यक्ष्मिणां पथ्यं कासिनां रक्तपित्तिनाम् ।
तच्च कुर्यादवेक्ष्याग्निं व्याधिसात्म्यबलं तथा ॥
च.चि. ११-९३, ९४ पान ११२०

संतर्पण, शीत, अविदाही, लघु अशा हितकर द्रव्याचा उपयोग अग्नीचे बलाबल पाहून आणि सात्म्यासात्म्य विचारांत घेऊन करावा.

क्षीरदधिघृतमांसशालिषष्टिकयवगोधूमांनां च,
दिवास्वप्नब्रह्मचर्याव्यायामबृंहणबस्त्युपयोगश्चेति ।
सु.सू. १५-३३, पान ७४

उपवास शोषासाठीं जीवनीय, शीतवीर्य, मधुररसात्मक द्रव्यांचा उपयोग करावा. दूध, दही, वृत, मांस रस, साठेसाळी, गहूं अशीं द्रव्यें आहारांत वापरावींत. दिवसा झोप घ्यावी. ब्रह्मचर्य पाळावें व्यायाम करुं नये. बृंहण बस्तीचा उपयोग करावा.

सर्वस्त्रिदोषजो यक्ष्मा दोषाणां तु बलाबलम् ।
परीक्ष्यावस्थिकं वैद्य: शोषिणं समुपाचरेत् ॥
च.चि. ८.६३, पान १०७६

राजयक्ष्मा हा स्वरुपत:च त्रिदोषज व्याधि आहे. क्षयरोग्याची चिकित्सा करतांना वैद्यानें दोषांचें बलाबल व अवस्थाविशेष यांचा विचार अवश्य केला पाहिजे.

पीनसे स्वेदमभ्यड्गं धूममालेपनानि च ।
परीषेकावगाहांश्च यावकं वाट्यमेव च ॥
लवणाम्लकटूष्णांश्च रसान् स्नेहोपबृंहितान् ।
च.चि. ८-६५१,पान १०७७

पीनसे स्वेदमभ्यड्गं धूममालेपनानि च ।
परीषेकावगाहांश्च यावकं वाटयमेव च ॥
लवणाम्लकटूष्णांश्च रसान् स्नेहोपबृंहितान् ।
च.चि. ८-६५१, पान १०७७

पीनसासाठीं स्वेद अभ्यंग, धूम, आलेपन परिषेक, अवगाहस्वेद द्यावा. सातूंचा वाट्‍य (पेयेचा एक प्रकार); लवण, अम्ल, कटु या रसांनीं युक्त व उष्णवीर्य असें मांसरस स्नेह घालून द्यावेत.

कृशरोत्कारिकामाषकुलत्थयवपायसै: ।
संकरस्वेदविधिना कण्ठं पार्श्वमुर; शिर: ॥
स्वेदयेत् पत्रभड्गेन शिरश्च परिषेचयेत् ।
बलागुडूचीमधुकश्रृतैर्वा वारिभि: सुखै: ॥
च.चि. ८-७१, ७२, पान १०७७

उडीद, हुलगे, सातु व दूध हे एकत्र शिजवुन त्यांचे पानगे वा पोटली करावी व त्यानें कण्ठ, पार्श्व, उर, शिर हे अवयव शेकावेत किंवा वातहरे अशा पानांच्या काढ्यांनीं वा पोटलीनें शेकावें. बला, गडूची, यष्टिमधु याच्या काढ्यांनीं शिरावर परिषेक द्यावा किंवा तैलघृत युक्त कांजीचा नाडी स्वेद वापरावा.

शस्ता: संसृष्टदोषाणां शिर: पार्श्वासशूलिनाम् ॥
नावनं धूमपानानि स्नेहाश्चौत्तरभक्तिका: ।
तैलान्यभ्यड्गयोगानि बस्तिकर्म तथा परम् ॥
च.चि. ८-८०, ८१, पान १०७८

दोषांचें स्वरुप संमिश्र असतांना शिर:शूल, पार्श्वशूल, अंसशूल या उपद्रवांसाठीं नस्य, धूमपान, भोजनानंतर स्नेहपान, तैलाचा अभ्यंग आणि निरनिराळ्या स्वरुपांचे बस्ति असे उपाचर करावेत.

शृड्गालाबुजलौकोभि: प्रदुष्टं व्यवनेन वा ।
शिर: पार्श्वासशूलेषू रुधिरं तस्य निर्हरेत् ॥
च.चि. ८-८२, पान १०७८

शिर, पार्श्व, अंस यांच्या शूलामध्यें रक्तमोक्षहि करावा.

श्लेष्मणोऽतिप्रसेकेन वायु: श्लेष्माणमस्यति ।
कफप्रसेकं तं विद्वास्निग्धोष्णेनैव निर्जयेत् ॥
क्रिया कफप्रसेके या वम्यां सैवाप्रशस्यते ।
हृद्यानि चान्नपानानि वातघ्नानि लघूनि च ।
च.चि. ७-१२१, १२२, पान १०८२

तस्याग्निदीपनान् योगानतीसारनिबर्हणान् ।
वक्त्रशुद्धिकरान् कुर्यादरुचिप्रतिबाधकान् ॥
च.चि. ८-१२३, १२४, पान १०८२

राजयक्ष्म्यामध्यें कफनिष्ठीवन दोन प्रकारांनीं होतें. एक स्वतंत्रपणें प्रवृद्ध अशा कफामुळें व दुसरें वातानें कफ स्थानभ्रष्ट होऊन, ज्यावेळी कफप्रसेकामुळें वाढलेल्या वायूनें अधिकच कफस्त्राव होऊं लागतो त्यावेळीं स्निग्ध व उष्ण अशा द्रव्यांचा उपयोग करावा. छर्दीसाठींहि असेच दोन प्रकारचे उपचार करावेत. हृद्य, वातघ्न, लघु असें अन्नपान द्यावें. राजयक्ष्म्यामध्यें बहुधा अग्निमांद्य झालेले असल्यामुळें चिकट, बुळबुळीत द्रव, अशी मलप्रवृत्ति होते. तोंडाला चव नसते. अन्न खावेसें वाटत नाहीं, अशा स्थितींत अग्निदीपन, रुचिकर व मुखशोधक उपचार करावेत.

शुष्यतां क्षीणमांसानां कल्पितानि विधानवित् ।
दद्यान्मांसादमांसानि बृंहनानि विशेषत: ॥
च.चि. ८-१४९, पान १०८४

तस्माच्छद्मोपसिद्धानि मांसान्येतानि दापयेत् ॥
च.चि. ८-१५७, पान १०८५

राजयक्ष्म्यामध्यें मांसक्षीण झालेल्या रोग्यास मांसाहारी प्राण्यांचे मांस निरनिराळ्या प्रकारानें सुसंस्कृत करुन खाण्यासाठीं द्यावें. कोणत्या प्रकारचें मांस दिलें जात आहे हें रोग्यास कळूं देऊं नये, गुप्तता राखावी म्हणजे किळस वाटत नाहीं,

मांसमेवाश्नत: शोषो माध्वीकं पिबतोऽपि च ।
नियतानल्पचित्तस्य चिरं काये न तिष्ठति ॥
वारुणीमण्डनित्यस्य बहिर्मार्जनसेविन: ।
अविधारितवेगस्य यक्ष्मा न लभतेऽन्तरम् ॥
च.चि. ८-१६३; १६४; पान १०८५

मांसाहार करुन किंवा स्निग्ध, बृंहण सहज पचणारीं अशीं द्रव्यें आहारासाठीं घेऊन वर द्राक्षा (मोहा) पासून उत्पन्न झालेलें आसव प्यावें. वागणूक संयमाची असावी. मन प्रसन्न ठेवावें. पुढें सांगितलेले बहिर्मार्जनाचे उपचार करावेत आणि वेग विधारण करुं नये. असें वागलें असतां रोगाला शरीरांत स्थानसंश्रय राहात नाहीं.

बहि: स्पर्शनमाश्रित्य वक्ष्यतेऽत: परं विधि:
स्नेहक्षीराम्बुकोष्ठेषु स्वभ्यक्तमवगाहयेत् ॥
स्त्रोतोविबन्धमोक्षार्थ बलपुष्ट्यर्थमेव च ।
उत्तीर्ण मिश्रकै: स्नेहै: पुनराक्तै: सुखै: करै: ॥
मृदनीयात्सुखमासीनं सुखं चोत्सादयेन्नरम् ।
च.चि. ८-१७३, १७४ पान १०८६

प्रथम स्नेहाभ्यंग करुन स्नेह व जल यांनीं भरलेल्या सुखोष्ण अशा डोणीमध्यें अवगाह स्वेद घ्यावा. यामुळें स्त्रोतोरोध दूर होऊन बल व पुष्टि वाढते. अवगाह स्वेदानंतरहि स्नेह अंगास लावून रुग्णाला सुखासींन स्थितींत झोपवून सुखकर होईल अशा रीतीनें मर्दन करावें व नंतर उत्सादन करावें.

अभ्यड्गोत्नादत्सोश्चैव वासोभिरहतै प्रियै: ।
यथर्तुविहितै: स्नानैरवगाहौर्विमार्जनै: ।
बस्तिभि: क्षीरसर्पिर्भिर्मासैर्मासरसौदनै: ।
इष्टैर्मद्यैर्मनोज्ञानां प्रमदानां च दर्शनै: ।
गीतवादित्रशब्दैश्च प्रियश्रुतिभिरेव च ॥
हर्षणाश्वासनैर्नित्यं गुरुणां समुपासनै: ।
ब्रहचर्येण दानेन तपसा देवतार्चनै: ॥
सत्येनाचारयोगेन मड्गल्यैरप्यहिंसया ।
च.चि. ८-१८४ ते १८८, पान १०८७

अभ्यंग करावा, उटणीं लावावीं, आवडती अशी सुखकारक वस्त्रें नेसावीं, ऋतुमानानुरुप परिषेक, अवगाह या पद्धतीनें स्नान करावें; शमन, बृंहण बस्ति घ्यावें; दूध, तूप, मांस, मांसरस, रसौदन, आसव, सुगंधीं द्रव्यें, फुलें यांचें सेवन करावें. सभोंवतींचे परिचारक स्वच्छ, प्रेमळ, टापटीपीचे व दर्शनीय असावेत. गायन, वादन, कथाश्रवण इत्यादींनीं मन प्रसन्न ठेवावें. आदरणीय व्यक्तींच्या संगतींत असावें. ब्रह्मचर्याचें पालन करावें. श्रद्धा असेल त्याप्रमाणें दान, धर्म, पूजा, अर्चा असे उपचार करावेत.

छागमासं पयश्छागं छागं सर्पि: सनागरम् ।
छागोपसेवा शयनं छागमध्ये तु यक्ष्मनुत् ॥
वंगसेन, राजयक्ष्मा ४६, पान २३०

अजाशकृनमूत्रपयोघृतासृड्मासालयानि प्रतिसेवमान: ।
स्नानादिनानाविधिना जहाति मासादशेषं नियमेन शोषम् ॥
सु.उ. ४१-५६, पान ७१६

शेळीचें मांस खावें, शेळीचेच दूध प्यावें, शेळीचें तूप सुंठ घालून घ्यावें; रहाणें, बसणें, झोपणें हें सर्व शेळ्यांच्या समुदायांत करावें. या उपचारानें राजयक्ष्मा बरा होतो. राजयक्ष्मा रोगावरील हा एक उत्तम उपाय आहे यांत शंका नाहीं. ज्या जागीं रहावयाचें ती भूमीहि शेळीच्या लेढयांनीं वा मूत्रानें सारविलेली असावी. भिंतीचा गिलावाहि शेळीच्या लेंड्यांचा करावा. इतकेच नव्हें तर अभ्यंगोत्सादनासाठींहि शेळीचेंच मल, मूत्र वापरावें.

कल्प व द्रव्यें
अश्वगंधा, शतावरी, भुइकोहळा, वाराहिकंद, वासा, बला, अतिबला, द्राक्षा, यष्टिमधु, पिंपळी, सुंठ, लसुण, अभ्रक, सुवर्ण, रौप्य, त्रिवंग, मौक्तिक, प्रवाळ, अकीक, अजास्थितभस्म, शृंग, सुवर्णमालिनीवसंत, मधुमालिनीवसंत, वसंतकुसुमाकर, त्रैलोक्यचिंतामणी, लक्ष्मीविलास, सुवर्णपर्पटी, नारीकेलकुसुमवटी, द्राक्षासव, अश्वगंधारिष्ट.

अन्न
रुचकर, बृंहण अन्न, दूध, गहूं, बदाम, अक्रोड, मनुका, पिस्ते, चारोळी, गोडंबी, मांसाहारी लोकांसाठीं कुक्कुटाड, अज, हरीण, शश, मयूर यांचें मांस.

विहार
विश्रांति, व्यायाम-श्रम-मैथुन वर्ज्य.

पथ्य
शालिषष्टिकगोधूमयवमुद्गादय: शुभा: ॥
मद्यानि जाड्गला: पक्षिमृगा: शस्ता विशुष्यत: ।
मूलकानां कुलत्थानां यूषैर्वा सूपसंस्कृतै: ॥
यो.र. राजयक्ष्मा, पान ३१५

वृन्ताकं कारवेलं च तैलं बिल्वं च राजिकाम् ॥
मैथुनं च दिवानिद्रां क्षयी कोपं च वर्जयेत् ।
यो.र. राजयक्ष्मा ३१४

येथें टेबल आहे. पान नं. १६८ ते १७१

व्याधिविनिश्चय-प्राणवहस्त्रोतस
प्रकरण पहिलें
समाप्त.
A

N/A

References : N/A
Last Updated : July 22, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP