प्राणवहस्त्रोतस् - मेदोज स्वरभेद

धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चतुर्विध पुरूषार्थांच्या प्राप्तीकरितां आरोग्य हे अत्यंत आवश्यक असते.


न्यायेन तान् वमनरेचनबस्तिभिश्च ।
नस्यावपीडमुखधावनधूमलेहै:
संपादयेच्च विविधै: कवलग्रहैश्च ॥
स्वरभेदस्य सामान्यचिकित्सामाह - स्निग्धानित्यादि ।
यद्यपि कफजमेदोयो: स्वरभेदयोरपतर्पणसाध्यत्वात् स्नेहनं न
युक्तं, तथाऽपि यथादोषप्रत्यनीकैर्यथादोष प्रत्यनीकसाधितैश्च
स्नेह: स्नेहनं युक्तमेव, अथवा मेद: कफजयोरपि वायुसम्भवात्
स्नेहनोपदेश: । अपकृष्टदोषान् आकृष्टदोषान्; अत्र
वमनविरेचनबस्तिभिरिति संबध्यते । न्यायेन यथाविधीत्यर्थ: ।
वमनादिभिरपकृष्टदोषान् स्वरभेदातुरान् किं कुर्यादित्याह-
नस्यावपीडेत्यादि । अवपीडय दीयते इत्यवपीडो नस्यभेद: ।
मुखधावनं गण्डूषादि । संपादयेत् योजयेत् ।
विविधै: दोषप्रत्यनीकत्वेन नानाप्रकारै: । कवलग्रहै: गण्डूषभेदै: ।
तथा च- ``सुखं संचार्यते या तु गण्डूषे सा प्रकीर्तिता ।
असंचार्या तु या मात्रा कवले सा प्रकीर्तिता'' - इति ।
सु.उ. ५३-८ सटीक, पान ७७१

स्वरभेद या व्याधींतील दोषदुष्य़ांचा विचार करुन रोग्याला प्रथम स्नेहन द्यावें व त्यानंतर वमन, विरेचन, बस्ति या शोधनोपचारानें यथायोग्यपणें दोष नाहींसे करावेत. जरी कफज व मेदोज स्वरभेद लंघनसाध्य असतो तरी तेथेंहि वायु हाच मूळ प्रेरक असल्यामुळें थोडेसें स्नेहन करणें आवश्यक असतें. कफभेद अधिक प्रमाणांत असतील तर मात्र स्नेहन करुं नये. दोषांचें शोधन झाल्यानंतर अवपीड नस्य मुखधावन करणारें गण्डूष धूम, लेह, कवलग्रह यांचा उपयोग करावा. औषधी द्रव्यांचें प्रमाण तोंडांत चांगलें खुळखुळतां येईल अशा प्रमाणांत, घेणें याला गण्डूष म्हणतात आणि तोंडामध्यें घेतलेलें औषध मुळींच खुळखुळतां येणार नाहीं अथवा हलवितां येणार नाहीं इतक्या मोठया प्रमाणांत तोंड भरुन घेतलें असतांना त्याला कवलग्रह असें म्हणतात. स्वरभेदासाठीं हे दोन्ही उपचार करावेत.

य: श्वासकासविधिरादित एव चोक्त
स्तं चाप्यशेषमवतारयितुं यतेत ।
सु.उ. ५३-९ पान ७७१

श्वास कासावर जे उपचार सांगितलेले आहेत ते यथायोग्य रीतीनें स्वरभेदासाठींहि वापरावेत.

द्रव्यें व कल्प
कंखोल, यष्टिमधु, पिंपळी, लवंग, वेलदोडे, दालचिनी, तालीसपत्र, वंशलोचन, खदिर, तुळस, हरिद्रा, केशर, गुंजेचा पाला, आंब्याचीं पानें, बेलाचीं पानें, अडुळसा, रिंगणी, तालिसादीचूर्ण, खदिरादिगुटी, त्वक्गुटी, सधृतदुग्ध, उष्णजल, द्राक्षासव, वासकासव, बकुलचंपकावलेह, कंटकार्यावलेह, नागगुटी, चतुर्भुज, अभ्रकभस्म.

आहार
द्रव, स्निग्ध, उष्ण, बृंहण, असा आहार.

विहार
मौन पाळावें.

पथ्य-अपथ्य
धूम्रपान, धुळींत जाणें, तळलेलें, विदाही, अम्ल, शीत पदार्थ वर्ज्य, जागरण व श्रम वर्ज्य.

द्राक्षा पथ्या मातुलुड्गं लशुनं लवणार्द्रकम् ।
ताम्बूलं मरिचं सर्पि: पथ्यानि स्वरभेदिनाम् ॥
यो.र. स्वरभेद, पान ३७७

N/A

References : N/A
Last Updated : July 21, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP