व्यायामशोषी भूयिष्टमेभिरेव समन्वित: ।
उर:क्षत:कृतैर्लिड्गई: संयुक्तश्च क्षतद्विना ॥
सु.उ. ४१-२२, पान ७१३
व्यायामशोषिणो लक्षणमाह - व्यायामेत्यादि ।
एभिरध्वशोष लक्षणै:, अध्वनो व्यायाममात्रसामान्यात् ।
भूयिष्टमत्यर्थ, अध्वशोषेऽल्पानि लक्षणानि व्यायामजे तु महान्तीत्यर्थ ।
तथा `उर:क्षतकृतैर्लिड्गै: संयुक्त: क्षतवर्जितै:' इति सुगम: पाठ: ।
गदाधरस्तु,- ``लिड्गैरुर:क्षतकृत: संयुक्तश्च क्षतं विना -''
इति पठति, व्याचष्ठे च - उर:क्षतेन व्यायामभाराध्ययनद्रुतयानादिहेतुना
य: कृत: शोष: सोऽप्येभिरे वाध्वशोषिड्गैर्भूयिष्ठं संयुक्त:, क्षतं क्षतकार्य विना ।
क्षतकार्य तु सुश्रुते यथा, - ``तस्योरसि क्षते रक्तं पूय: श्लेष्मा च गच्छति -''
इत्यारभ्य ``भिन्नवर्णस्वरो नर:'' (सु.उ.तं.अ.४१)
इत्यन्तमेतान्येव लक्षणानि क्षतेऽधिकानि, उर:क्षतकारणव्यायामभारादिकृतशोषस्य
लक्षणमेव भूयिष्ठं यत्तदेवोर:क्षतकारणमात्रत्वादध्वनोऽपीत्यर्थ: ।
अथवा क्षतं विना, उर:क्षतनिमित्तभाराध्ययनादिनाऽतिमात्रेण य: कृत:
शोष: सोऽप्येभिरेवात्यर्थाध्वशोषलिड्गै: समन्वित इति प्रकृतेन
संबन्ध:; सव्रणस्य तु वक्ष्यमाणमेव लक्षणमिति ।
मा.नि. राजयक्ष्मा - १९ म. टीका, पान १३१
सन्धीनां स्फुटनं ग्लानिरक्ष्णोरायास एव च ।
लक्षणं मेदसि क्षीणे तनुत्वं चोदरास्य च ॥
च.सू. १७-६६, पान २१७
मेदसि स्वपनं कटया: प्लीह्नोवृद्धी: कृशाड्गता ॥
वा.सू. ११-१८, पान १८५
अतिव्यायामुळें मेदो धातूचा क्षय होऊन व्यायामशोध व्याधि उत्पन्न होतो. या व्याधीमध्यें अध्वशोषी व उरक्षती रुग्णांचीं लक्षणें दिसतात, असे वर्णन केलें आहे. त्यादृष्टीनें विचार करतां कृशता, कटिवेदना, अंग गळून जाणें, त्वचा काळवंडणें, हातापायास मुंग्या येणें, स्पर्शज्ञान कमी होणें, तोंड कोरडें पडणें, दौर्बल्य येणें, छातींत दुखणें, आवाज बसणें, खोकला येणें अशीं लक्षणें होतात. साक्षात् उर:क्षताशीं संबद्ध अशीं दिसणारी जी रक्तनिष्ठीवन, दुर्गंधी, पूयप्रवृत्ति ही वगळून इतर लक्षणें येथें होतात. उर:क्षतालाहि अतिव्यायाम हें कारण असल्यामुळें वा मार्गक्रमणानें एक प्रकारचा व्यायाम घडत असल्यामुळें लक्षण दृष्टीनें व्यायमशोषाचा संबंध उर:क्षती व अध्वशोषी रुग्णाशीं लक्षणसाधर्म्यानें असणें स्वाभाविक आहे. उर:क्षताला कारणीभूत होणारा व्यायाम हा केवळ अतियोगात्मक नसून व्यायामाचा हा अतियोग फारच थोडया कालामध्यें व्हावा लागतो. व्यायामशोषास कारणीभूत होणारा व्यायामाचा अतियोग अधिक दीर्घकालीन असतो.