प्राणवहस्त्रोतस् - उदावर्त

धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चतुर्विध पुरूषार्थांच्या प्राप्तीकरितां आरोग्य हे अत्यंत आवश्यक असते.


जृम्भा निरोधज उदावर्त
``मन्यागलस्तम्भशिरोविकारा जृम्भोपघातात्पवनात्मक: स्यु: ।
तथाऽशिनासावदनामयाश्च भवन्ति तीव्रा: सह कर्णरोगै: ॥''
मा.नि.उदावर्त ५ पान २२७

जृंभोपघातामुळें मन्यास्तंभ, गलस्तंभ, वातज शिरोरोग, डोळे, नाक, कान, तोंड यामधील विविध रोग होतात.

चिकित्सा
सर्वश्च अनिलाजित् विधि: ।
वा.सू. ४-१५ पान ५५

वाताचे अनुलोमन होईल अशी चिकित्सा करावी.

क्षवथु निरोधज उदावर्त
मन्यास्तम्भ: शिर: शूलमर्दितार्धावभेदवेगे ।
इन्द्रियाणां च दौर्बल्यं क्षवथो: स्याद्विधारणात् ॥७॥
मा.नि. उदावर्त ७ पृ. २७७

मन्यास्तंभ, अर्दित, शिर:शूल, अर्धावभेदक, इंद्रियदौर्बल्य (विशेषत: श्रवक नयन, नासा यांचे,) अशीं लक्षणें होतात.

चिकित्सा
``तीक्ष्णधूमाञ्जनाघ्राणनावनार्कविलोकनै: ।
प्रर्वतयेत्क्षुतिं सक्तां स्नेहस्वेदौ च शीलयेत् ।''
वा.सू. ४-९ पृ.५४

तीक्ष्ण अंजन, धूम, तीक्ष्ण गंध, सूर्याकडे पहाणें अशा उपचारानें शिंका आणल्यानंतर स्नेह, स्वेद करावा. (ऊर्ध्व जत्रुभागीं) शोधन शमन नस्याच्याहि उपयोग करावा. (च.सू.७)

श्वास निरोधज उदावर्त
``श्रांतस्य निश्वासविनिग्रहेण हृद्रोगमोहावथवाऽपि गुल्म: ।''
मा.नि. उदावर्त १२

श्रमामुळें उत्पन्न होणार्‍या श्वासाचें वेग धारण केल्यामुळें गुल्म, हृद्रोग, मोह, असे विकार होतात.

चिकित्सा
``हितं विश्रमणं तत्र वातघ्नश्च क्रियाक्रम: ।''
वा.सू. ४-१५ पृ. ५५

विश्रांती आणि वातघ्न उपचार करावें.

कास निरोधज उदावर्त
कासस्य रोधात्तद्‍वृद्धि: श्वासारुचिहृदामय: ।
शोषो हिक्ष्मा च कार्योऽत्र कासहा सुतरां विधि: ॥
वा.सू. ४-१३ पान ५५

कासाचा वेग आवरण्याचा प्रयत्न केल्यामुळें कास वाढतो. श्वास, अरुचि, हृद्रोग, शोष (कृशता यक्ष्मा) हिक्का, असें विकार उत्पन्न होतात.

चिकित्सा -
यावर उपचार म्हणून कासघ्न चिकित्सा करावी.

N/A

References : N/A
Last Updated : July 21, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP