प्राणवहस्त्रोतस् - अध्वशोष
धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चतुर्विध पुरूषार्थांच्या प्राप्तीकरितां आरोग्य हे अत्यंत आवश्यक असते.
अध्वप्रशोषी स्त्रस्ताड्ग संभृष्टपरुषच्छवि: ।
प्रसुप्तगात्रावयव: शुष्कक्लोमगनान: ॥
अध्वशोषिणमाह - अध्वप्रशोषीत्यादि ।
स्त्रस्ताड्ग शिथिलगात्रावयव: ।
प्रसुप्तमात्रावयव इत्यनेन अकर्मण्यशरीरप्रदेश उक्त: ।
शुष्कशब्द: क्लोमादिभि: प्रत्येकं संबध्यते; क्लोम
तिलकम्, आननं मुखकुहरम् । संभृष्टपरुषच्छवि:'
`संसृष्टपरुषच्छवि:' इति पठित्वा संसृष्टा परुषा छवि:
यस्य स इति व्याख्यानयन्ति । यद्यपि जराशोष्यननतरं
व्यायामशोषी वाच्यो नाध्वशोषी, तथाऽप्यध्वशोषितलक्षाणां
व्यायामशोषी वाच्यो नाध्वशोषी, तथाऽप्यशोषिणि नातिदिश्यन्ते
सत्यम्, उर: क्षतलिड्गानामधिकानां व्यायामशोषिणि सद्भावात् ।
केचिदत्र `तृडड्गमर्ददौर्बल्यपारुष्यैरर्दितोऽध्वना'
इति पाठं पठन्ति, तत्रापि स एवार्थ: ।
सु.उ. ४१-२१, सटीक पान ७१३
मांसक्षये विशेषणे स्फिग्ग्रीवोदरशुष्कता ॥
च.सू. १७-६५, पान २१७
मांसक्षये स्फिग्गण्डौष्टोपस्थोरुवक्ष:कक्षापिणिडिकोदरग्रीवा-
शुष्कता रौक्ष्यतोदौ गात्राणां सदनं धमनीशैथिल्यं च ।
सु.सू. १५-९, पान ६९
मांसेऽक्षग्लानिगण्डस्फिक्शुष्कतासन्धिवेदना: ।
वा.सू. ११-१८, पान १८५
मार्गक्रमणामुळें मांसक्षय निर्माण होतो. मार्गक्रमण हा व्यायामाचा सौम्य असा प्रकार असून त्याचे परिणाम पुष्कळ दीर्घकालानंतर प्रत्ययास येत असतात याठिकाणीं मांसक्षय अभिप्रेत आहे. कारण इतर सर्वत्र केवळ शोषी या शब्दाचा प्रयोग केला असला तरी याठिकाणीं प्रशोषी असा प्रकर्षार्थक शब्द वापरला आहे. मांसक्षयामुळें येणारी कृशताच येथें अभिप्रेत असावी असें वाटतें. खरी कृशता मांसधातु क्षीण झाला म्हणजेच येते. अध्वशोषामुळें सर्व शरीर गळून जाणें, त्वचा निस्तेज, काळवंडलेली व खरखरीत होणें, अवयवांचे स्पर्शज्ञान कमी होणें, अंग दुखणें, रुक्षता येणें, तोंड-घसा कोरडें पडणें, उरामध्येंहि तोठरा बसल्याप्रमाणें कोरडेपणा जाणवणें (शुष्क क्लोम), सांधे दुखणें, शिरा शिथिल होणें, दौर्बल्य अशीं लक्षणें दिसतात.
N/A
References : N/A
Last Updated : July 22, 2020
TOP