व्यायामभाराध्ययनैरभिघातातिमैथुनै: ।
कर्मणा चाप्युरस्येन वक्षो यस्य विदारितम् ॥
तस्योरसि क्षते रक्तं पूय: श्लेष्मा च गच्छति ॥
कासमानश्छर्दयेच्च पीतरक्तासितारुणम् ।
संतप्तवक्षा: सोऽत्यर्थ दूयनात्परिताम्यति ।
दुर्गन्धवदनोच्छ्वासो भिन्नवर्णस्वरो नर: ॥
उर; क्षतशोषिणमाह - व्यायामेत्यादि । कर्मणा चाप्युरस्ये-
नेति धनुराकर्षणादिनेत्यर्थ: । क्षते अतिदारिते ।
असितम् ईषत्कृष्णम्, अरुणम् ईषद्रक्तम् ।
दूयनात् अतिवेदनात्, परिताम्यति मोहं याति ।
दुर्गन्धशब्दो वदनोच्छ्वासाभ्यां संबध्यते ।
सु.उ. ४१-२४, सटीक, पान ७१३
अव्यक्तं लक्षणं तस्य पूर्वरुपमिति स्मृतम् ॥
उरोरुक्शोणीतच्छर्दि: कासो वैशेषिक: क्षते ।
क्षीणे सरक्तमूत्रत्वं पार्श्वपृष्ठकटिग्रह: ॥
च.चि. ११-१२, १३, पान १११२
उपेक्षिते भवेत्तस्मिन्ननुबन्धो हि यक्ष्मण: ।
प्रागेवागमनात्तस्य तस्मात्तं त्वरया जयेत् ॥
च.चि. ११-९५, पान ११२०
साहसज राजयक्ष्म्यांत वर्णिलेल्या कारणाप्रमाणें निरनिराळ्या साहसामुळें उरामध्यें क्षत उत्पन्न होतें. रक्तकफाची दुष्टी होऊन पूय निर्माण होतो. कास अतिशय येतो. पीत, रक्त, अरुण, श्याव अशा वर्णाची छर्दि होते. छाती दुखते, कढत झाल्यासारखी वाटते, मोह होतो, तोंडाला व श्वासाला घाण येते. त्वचेचा रंग पालटतो, आवाज बसतो. या उर:क्षताचें पूर्वरुप म्हणून वर रुपामध्यें जीं लक्षणें वर्णिलेली आहेत तीच अल्पप्रमाणांत होतात. विशिष्टस्वरुपाचा कास हें पूर्वरुपांतील विशेष महत्त्वाचें लक्षण असतें. छातींत दुखणें, थुंकींतून रक्त पडणें, शुक्र क्षीण झालें असल्यास सरक्त मूत्रप्रवृत्ति होणें, पार्श्व, पृष्ठ, कटि याठिकाणीं जखडल्यासारखें वाटणें, अशीं लक्षणें होतात. उर:क्षताच्या उपेक्षेनें राजयक्ष्मा हा उपद्रव होतो. सर्व शोषांच्या बाबतींत असें घडतें. उपेक्षेनें वा व्याधीच्या बलामुळें सर्वच शोष राजयक्ष्म्यांत परिणत होतात. उर:क्षत ही व्रणशोषाचीच पुढची अवस्था आहे.