लक्षणे - ११६ ते १२०
समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.
११६
पतितपावना जानकीजीवना । वेगीं माझ्या मना पालटावें ॥१॥
वैराग्याचा लेश नाहिं माझा आंगीं । बोलतसें जगीं शब्दज्ञान ॥२॥
देह हें करणी लावावे नावडे । आळस आवडे सर्व काळ ॥३॥
रामदास म्हणे लाज तुझी तुज । कोण पुसे मज अनाथासी ॥४॥
११७
पतीतपावना जानकीजीवना । वेगीं माझ्या मना पालटावें ॥धृ०॥
भक्तीची आवडीं नाहिं निरंतर । कोरडें अंतर भावेंविण ॥१॥
माझें मींतूंपण गेलें नाहिं देवा । काय करूं ठेवा संचिताचा ॥२॥
रामदास म्हणे पतीताचें उणें । पतीतपावनें सांभाळावे ॥३॥
११८
पतीतपावना जानीकीजीवना । वेगीं माझ्या मना पालटावें ॥धृ०॥
मुखे बोल ज्ञान पोटीं अभिमान । पाहे परन्यून सर्वकाळ ॥१॥
दृढ देहबुद्धी तेणें नाहिं शुद्धी । जाहालों मी क्रोधी अनावर ॥२॥
रामदास म्हणे ऐसा मी अज्ञान । सर्व ब्रह्मज्ञान बोलोनीयां ॥३॥
११९
पतीतपावना जानकीजीवना । वेगीं माझ्या मना पालटावें ॥धृ०॥
मिथ्या शब्दज्ञान तुज अंतरलों । संदेहीं पडलों मीपणाचे ॥१॥
सदा खळखळ निर्गुणाची घडे । सगुण नावडे ज्ञानगर्वें ॥२॥
रामदास म्हणे ऐसा मी पतीत । मीपणे अनंत पाहों जातां ॥३॥
१२०
श्रोत्रीं अंतःकर्ण त्वचेमध्यें मन । चक्षुमधें जाण बुद्धी आहे ॥१॥
जिव्हेमध्ये चित्त नाना स्वाद पाहे । घ्राणामधें आहें अहंकार ॥२॥
सुक्षमाचें मूळ शोधूनि पाहावें । वर्म पडे ठावें दास म्हणे ॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : November 05, 2017
TOP