लक्षणे - ८१ ते ८५
समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.
८१
दुर्जना दुर्जना होय समाधान । येकांमेकां मानें भेटताती ॥१॥
दुधगा चालीला वृंदावना भेटी । काळकुट पोटीं भरूनियां ॥२॥
आगीयाचे भेटी मिरगोड चालिलें । येकमेकां आलें प्रेम दुणें ॥३॥
आरांटी बोरांटी रिंगणी सराटीं । काचकुहिरी भेटी भेटों आल्या ॥४॥
सेबी सागरगोटी निवडंग वाघांटी । कांटी आली भेटी दास म्हणे ॥५॥
८२
सोहं हंसा म्हणिजे तो मी तो मी ऐसें । हें वाक्य विश्वा विवरावें ॥१॥
विवरावें अहं ब्रह्मास्मि वचन । ब्रह्म सनातन तूंची येक ॥२॥
तूंचि येक ब्रह्म हेंचि महावाक्य । परब्रह्मीं ऐक्य अर्थबोध ॥३॥
अर्थबोध रामी रामदास जाला । निर्गुण जोडला निवेदनें ॥४॥
८३
राघवाची कथा पतीतपावन । गाती भक्तजन आवडीनें ॥१॥
राघवाच्या गुणा न दिसे तुळणा । कैलासीचा राणा लांचावला ॥२॥
देवांचे मंडण भक्तांचें भूषण । धर्मसंरक्षण राम येक ॥३॥
रामदास म्हणे धन्य त्यांचें जीणें । कथानिरूपणे जन्म गेला ॥४॥
८४
संगती सज्जन कतानिरूपण । सगुणे पाविजेतें ॥१॥
सगुणाची भक्ती केल्या होय मुक्ती । ऐसें वेदश्रुती बोलतसे ॥२॥
भक्तिविणें ज्ञान कदा पाविजेना । हें वाक्य सज्जना अंतरीचें ॥३॥
रामदास म्हणे साराचेंहि सार । सर्वांसी आधार भक्तिभाव ॥४॥
८५
घडेना नसे भाव त्या भक्ति कांहीं । नसे भक्ति न्या मुक्ति होणार नाहीं । म्हणोनी मना भक्ति ते सार आहे । विवेकें अती शांतिं होऊनि राहे ॥१॥
N/A
References : N/A
Last Updated : November 05, 2017
TOP