मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री रामदासस्वामींचे साहित्य|रामदासी संप्रदायाची वीस लक्षणें| १ ते ३ रामदासी संप्रदायाची वीस लक्षणें १ ते ३ ४ ते ६ ७ ते ९ १० ते १३ १४ ते १७ १८ ते २१ २२ ते २५ २६ ते ३० ३१ ते ३५ ३६ ते ४० ४१ ते ४५ ४६ ते ५० ५१ ते ५५ ५६ ते ६० ६१ ते ६५ ६६ ते ७० ७१ ते ७५ ७६ ते ८० ८१ ते ८५ ८६ ते ९० ९१ ते ९५ ९६ ते १०० १०१ ते १०५ १०६ ते ११० १११ ते ११५ ११६ ते १२० ११६ ते १२४ लक्षणे - १ ते ३ समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला. Tags : abhangramdassamarthaअभंगरामदाससमर्थ लक्षणे - १ ते ३ Translation - भाषांतर १प्रथम लिहीणें दुसरें वाचणें । तिसरें सांगणें अर्थातर ॥१॥आशंकानिवृत्ति ऐसी चौथी स्थिती । पांचवी प्रचीती अनुभवें ॥२॥साहावें तें गाणें सातवें नाचणें । ताळी वाजवणें आठवें तें ॥३॥नवां अर्थभेद दहावा प्रबंध । आक्रावा प्रबोध प्रचीतीसीं ॥४॥बारावें वैराग्य तेरावा विवेक । चौदावा तो लोक राजी राखे ॥५॥पंध्रावें लक्षण तें राजकारण । सोळावें तें जाण अव्यग्रता ॥६॥प्रसंग जाणावा हा गुण सत्रावा । काल समजावा सर्वां ठाईं ॥७॥आठ्रावें लक्षण वृत्ती उदासीन । लोलंगता जाण तेथें नाहीं ॥८॥येकोणीसावें चिन्ह सर्वांसी समान । राखे समाधान ज्याचें त्याचें ॥९॥विसावें लक्षण रामउपासना । वेध लावी जना भक्तिरंगें ॥१०॥भक्तिरंगें देव देवाल्यें शिखरें । वोटे मनोहरें वृंदावनें ॥११॥बावी पोखरणी रम्य सरोवरें । मंडप विवरें धर्मशाळा ॥१२॥धर्मशाळा नाना ना दीपमाळा । तेथें रविकुळा वाखाणावें ॥१३॥तरूवर पुष्पवाटिका जीवनें । पावनें भुवनें होमशाळा ॥१४॥उदंड ब्राह्मण ब्रह्मसंतर्पण । पुराणश्रवण आध्यात्मीक ॥१५॥जन्मासी येउनी अध्यात्म साधावें । नित्य विवरावें सारासार ॥१६॥असार संसार येणें साधे सार । पाविजेतो पार भवसिंधु ॥१७॥आयुष्य हें थोडें फार आटाआटी । कठीण सेवटीं वृद्धपण ॥१८॥येकलेंची यावें येंकलेंची जावें । मध्येंची स्वभावें मायाजाळ ॥१९॥मायाजाळ तुटे तरी देव भेटे । दास म्हणें खोटें भक्तीहीण ॥२०॥२संसार करावा जीवें सर्व भावें । तुज विसंभावें अंतरंगा ॥१॥ऐसें मज नको करूं रे राघवा । माझा सावाधावा तूंचि येक ॥२॥स्वयें महापापी पापची वर्तावें । सज्जना निंदावें सावकास ॥३॥दोष राहाटणें । या पोटाकारणें । सज्जनाचें उणें काढूं पाहे ॥४॥कर्म करवेना धारणा धरवेना । भक्ती उपासना अंतरली ॥५॥विषयांचें ध्यान लागलें अंतरीं । दंभ लोकाचारी खटाटोप ॥६॥निष्ठा भ्रष्ट जाली स्नानसंध्या गेली । दुराशा लागली कांचनाची ॥७॥देव धर्म घडे ते ठाईं वेंचीना । पुण्य तें सांचीना कदाकाळीं ॥८॥स्वधर्म बुडाला परिग्रहे नेला । वेवादीं दादुला भंडरूपी ॥९॥अशक्त दुर्जन पाहे परन्यून । अभिलाषीं मन गुंतलेंसें ॥१०॥कीर्तनीं बैसला पाहे परनारी । परद्रव्यापरी मन गेलें ॥११॥न दिसे अंतरीं देवाची आवडी । पापरूपी जोडी पापरासी ॥१२॥काम क्रोध दंभ लोभ मोहो माया । कीर्तनाच्या ठाया समागम ॥१३॥घातला उदकीं न भिजे पाषाण । हृदय कठीण तयापरी ॥१४॥स्वये नेणे हित श्रवणीं दुश्चित । चंचळ हे चित्त स्थिर नाहीं ॥१५॥तुझीये रंगणीं राहे अभीमान । नाहीं समाधान दास म्हणे ॥१६॥३देहे हें असार कृमींचें कोठार । परी येणें सार पाविजेतें ॥१॥लागवेग करी लागवेग करी । स्वहित विचारी आलया रे ॥२॥देहेसंगें घडे संसारयातना । परी हा भजना मूळ देहो ॥३॥देहोचेनि संगें हिंपुटि होईजे । विचारें पाविजे मोक्षपद ॥४॥जन्मास कारण मूळ देहबुद्धी । परी ज्ञानसिद्धी देहसंगे ॥५॥देहसंगें उठे स्वयातीमत्सर । आणी पैलपार देहेसंगें ॥६॥देहेसंगे जीव होतसे चांडाळ । आणी पुण्यसीळ देहेसंगे ॥७॥देहेसंगे प्राणी अधोगती जाती । आणी धन्य होती देहेसंगे ॥८॥देहेसंगें बद्ध देहेसंगे मुक्त । देहेसंगे भक्त होत असे ॥९॥देहेसंगें देव आणी भावाभाव । पाप पुण्य सर्व देहेसंगें ॥१०॥देहेसंगें वृत्ती होतसे निवृत्ती । गती अवगती देहेसंगें ॥११॥देहेसंगें भोग देहेसंगें रोग । देहेसंगें योग साधनाचा ॥१२॥देहेसंगें देही विदेही संसारी । सद्भाव अंतरीं देहेसंगें ॥१३॥देहेसंगें तारी देहेसंगें मारी । संतसंग धरी देहेसंगें ॥१४॥देहेसंगे गती रामदासीं जाली । संगती जोडली राघवाची ॥१५॥ N/A References : N/A Last Updated : November 05, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP