लक्षणे - ९६ ते १००

समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.  


९६
ठकाराचें ठाण करीं चापबाण । माझें ब्रह्मज्ञान ऐसें आहे ॥१॥
रामरूप देहो जाला निःसंदेहो । माझें मनीं राहो निरंतर ॥२॥
मुखी रामनाम चित्तीं घनश्याम । होतसे विश्राम आठवितां ॥३॥
रामदास म्हणे रामरूपावरी । भावें मुक्ती चारी वोवाळीन ॥४॥

९७
जीव शीव पिंडब्रह्मांडरचना । उभारूनी पुन्हां संव्हारावी ॥१॥
सर्व खटपट सांडुनियां मागें । भक्तिचेनि योगें समाधान ॥२॥
वेदीं कर्मकांड बोलिलें उदंड । आटणीचें दंड आटाआटी ॥३॥
व्रतें तपें दानें योग धूम्रपानें । नाना तीर्थाटणें दास म्हणे ॥४॥

९८
ब्रह्मादिक देव ब्रह्मज्ञान आड । करीती पवाड निघ्नरूपें ॥१॥
यालागी सगुण भावें उपासना । करीजे निर्गुणा पावावया ॥२॥
सगुणाकरितां इंद्राचा आघात । होती वाताहात येकसरां ॥३॥
रामी रामदासी विश्वासी सगुण । कळों आलें ॥४॥

९९
इंद्रनीळरंग राम श्यामधाम योगियां । नाम पूर्णकाम सार फार भवरोगियां ॥१॥


१००
रामाचें भजन तेंचि माझें ज्ञान । तेणें समाधान पावईन ॥१॥
रामासी वर्णितां देहीं विदेहतां । जाली तन्मयता सहजची ॥२॥
राघवाचें रूप तें माझें स्वरूप । तेणें सुखरूप निरंतर ॥३॥
रामदास म्हणें मज येणें गती । राम सीतापतीचेनि नामें ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : November 05, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP