लक्षणे - ४१ ते ४५

समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.  


४१
देव त्वां घेतला मत्स्यअवतार । कासव डुकर कासयासी ॥१॥
कासयासी देवें कपट करावें । खुजटची व्हावें बळीचेथें ॥२॥
बळीचेथें नाना कपट करावें । मतेसी मारावे कासयासी ॥३॥
कासयासी वाळी उगाची मारिला । मिथ्या शोक केला वनांतरीं ॥४॥
वनांतरी शोक चोरी घरोघरीं । देव परद्वारी म्हणताती ॥५॥
म्हणताती बोध्य जाला निःसंगळ । कलंकी दुरूळ दास म्हणे ॥६॥

४२
निरूपणीं जनीं लाभे सर्व काहिं दुजे ऐसें नाहिं पाहों जातां ॥१॥
साराचेंही सर वेदां अगोचर । ते लाभे साचार निरूपणें ॥२॥
दाखवीतां नये बोलिलें न जाये । त्याची कळे सोये निरूपणें ॥३॥
मनासी नाकळे मीपणा नाडळे । तें गुज निवळे निरूपणें ॥४॥
व्यत्पत्तीचें कोडें तर्काचें सांगडें । तें जोडें रोकडें निरुपणें ॥५॥
मन हें चंचळ तें होय निश्चळ । साधनाचें फळ साद म्हणे ॥६॥

४३
तूं काय जालासी अगा निरंजना । आम्हां भक्तजना सांभालावें ॥१॥
सांभाळावें सदा बाह्यअभ्यंतरीं । आम्हां क्षणभरी सोडूं नये ॥२॥
सोडूं नको वायांगुप्त कां जालासि । देवा देखिलासी संतसंगें ॥३॥
संतसंगें गुप्त होउनी पाहिलें । संगत्यागें जालें दरूशण ॥४॥
दरूशण जालें तेची ते जाणती । नसोनी असती कल्पकोडी ॥५॥
कल्पकोडी जाडी जाली निर्गुणाची । दास म्हणे कैची देहेबुद्धी ॥६॥

४४
माणसाचें ब्रह्म होतें कोणेपरी । ऐसं तूं विचारीं आलया रे ॥१॥
आलया माणुस हें कोणा म्हणावें । बरें हें जाणावें शोधूनीयां ॥२॥
शोधूनीयां पाहतां स्थूळाचा चाळक । सूक्ष्माचा येक मनप्राण ॥३॥
मनप्राणेंविण हें कांहिं घडेना । हेंच आणा मना विवेकी हो ॥४॥
विवेकी हो तुम्ही विवेक पाहावा । संसाराचा गोवा कोण करी ॥५॥
कोण करीतसे सर्वहि करणी । दास निरूपणीं सावधान ॥६॥

४५
सावधान व्हावे विवेका पाहावें । वायोच्या स्व्भावें सर्व कांहिं ॥१॥
सर्व कांहिं घदे वायोची करीतां । वायो पाहां जातां आडळेना ॥२॥
आडळेना वायो आकाशीं विराला । कर्ता काय जाला अंतरीचा ॥३॥
अंतरीचा सर्व विवेक पाहातां । ब्रह्मरूप आतां सहजची ॥४॥
सहजची जालें विचारानें केलें । माणूस पाहीलें शोधुनीयां ॥५॥
शोधुनी या जीत माणूस पाहावें । वर्म पडे ठावें दास म्हणे ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : November 05, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP