मराठी मुख्य सूची|विधी|कर्म विधी|ऋग्वेदीय अन्त्येष्टि विधी|
शय्यादान

शय्यादान

अंत्येष्टि म्हणजे शेवटचा होम.


“ सर्व पापांचें क्षालन होऊन स्वर्गांत अप्सरांची सेवा मिळावी व साठ हजार वर्षें पर्यंत स्त्रियांसहवर्तमान क्रीडा करण्यास मिळावी, त्यापुढें साठ योजनें पर्यंत ज्याचा विस्तार आहे, असें राज्य उपभोगल्या नंतर शेवटी सायुज्यमुक्ति मृतास मिळावी म्हणून शय्यादान करितों. ” असा संकल्प करावा. शय्या सर्व साहित्यासह असावी; व तीवर सुवर्णाच्या लक्ष्मीनारायणाच्या मूर्ति ठेऊन त्यांची पूजा करावी, व तीस सपत्नीक ब्राह्मणासह प्रदक्षिणा करोन चारहि दिशांनां नमस्कार करावा. वर दशदानांत दानमंत्र ‘ यथा न कृष्णशयनं ’ इ. आला आहेच. शय्येवर दान घेणार्‍या ब्राह्मणानें पत्नीसह निजावें, व त्याचे हातावर अक्षता, दर्भ यांसह पाणी सोडावें व सांगतेकरितां सोन्याची दक्षिणा द्यावी. व इतर ब्राह्मणांसही भूयसी वांटावी.

N/A

References : N/A
Last Updated : May 24, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP