अश्वदान
अंत्येष्टि म्हणजे शेवटचा होम.
हें दान राजेराजवाडे, सरदार, शेटसावकार वगैरे श्रीमंत लोक देतात. त्यांत ‘ मृताचे सर्व पापांचें क्षालन, होऊन घोड्याच्या अंगावर जितके केस आहेत, तितकी वर्षें मृतानें सूर्यलोकी राहावें, यासाठी यथाशक्ति अलंकार अश्वास घालून दान करतों ’ असा संकल्प करावा; व घोड्याचा कान धरून ब्राह्मणास दक्षिणेसह दान करावें. त्यावेळी म्हणण्याचे मंत्र :- “ अश्वामध्यें तूं उच्चैःश्रवा नांवाचा आहेस; तुझे योगानें राजे विजयी होतात. हे सूर्यास वाहणार्या अश्वा, तुला नमस्कार असो. मृतास तूं सुखी कर; ” इ. मंत्र म्हणून अश्व अलंकृत करून ब्राह्मणास द्यावा.
N/A
References : N/A
Last Updated : May 24, 2018
TOP